नवी दिल्ली : तीन कृषी कायद्यांच्या विरोधात गेले ६० दिवस दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करणाऱ्य
ताज्या घडामोडी
परभणीत राज्यस्तरीय दुष्काळ शेतकरी मराठी साहित्य संमेलन
परभणी : येथे छत्रपती शिवाजीराजे प्रतिष्ठाणतर्फे रविवारी (ता.१६) एकदिवसीय राज्यस्तरीय दुष्काळ शेतकरी मराठी साहित्य संमेलन आयोजन करण्यात आले आहे. कवी श्रीकांत देशमुख राहेरीकर यांची संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे, तर ज्येष्ठ पत्रकार अमर हबीब यांच्या हस्ते उदघाटन होणार आहे.
परभणी : येथे छत्रपती शिवाजीराजे प्रतिष्ठाणतर्फे रविवारी (ता.१६) एकदिवसीय राज्यस्तरीय दुष्काळ शेतकरी मराठी साहित्य संमेलन आयोजन करण्यात आले आहे. कवी श्रीकांत देशमुख राहेरीकर यांची संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे, तर ज्येष्ठ पत्रकार अमर हबीब यांच्या हस्ते उदघाटन होणार आहे.
आयोजक तथा स्वागताध्यक्ष अॅड. विष्णू नवले पाटील यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.दुष्काळी स्थितीमुळे संकटात सापडलेल्या राज्यातील शेतक-यांच्या समस्यांवर विचारमंथन करून शेती, माती, शेतकरी यांच्या सर्वंकष उत्थानासाठी देशाचे माजी कृषिमंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त या राज्यस्तरीय दुष्काळ शेतकरी मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन परभणी येथील बी. रघुनाथ सभागृहामध्ये (स्व. आर. आर. आबा पाटील साहित्य नगरी) करण्यात आले आहे. संमेलनाच्या अध्यक्षपदी साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त कवी श्रीकांत देशमुख-राहेरीकर यांची निवड करण्यात आली. ज्येष्ठ पत्रकार तथा शेतकरी चळवळीतील कार्यकर्ते अमर हबीब यांच्या हस्ते उदघाटन होणार आहे.
कवी प्रा. इंद्रजित भालेराव, डॅा. आसाराम लोमटे, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॅा. अशोक ढवण आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. शेती-शेतकरी-दुष्काळ व साहित्य आणि कार्यकर्त्यांची भूमिका या विषयावरील परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॅा. अशोक ढवण राहणार असून साहित्यिक सदानंद देशमुख, शेषराव मोहिते, डॅा. शिवाजी दळणर, डॅा. आसाराम लोमटे यांचा सहभाग असणार आहे.
राजेंद्र गहाळ यांच्या अध्यक्षतेखाली कथाकथन आणि रेणू पाचपोर यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. पत्रकार परिषदेस अरुण चव्हाळ, कवी केशव खटींग, राजेंद्र गहाळ, सुनील तुरुकमाने, यशवंत मकरंद, बबन आव्हाड आदी उपस्थित होते.
- 1 of 1027
- ››