Agriculture news in Marathi, Drought-free Maharashtra is our agenda: Chief Minister Fadnavis | Agrowon

दुष्काळमुक्त महाराष्ट्र हा आमचा अजेंडा ः मुख्यमंत्री फडणवीस
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019

सोलापूर ः सोलापूरसह अन्य नजीकच्या जिल्ह्याला दुष्काळातून बाहेर काढण्यासाठी भाजप-शिवसेना महायुती कटिबद्ध आहे. कोल्हापूर, सांगली या भागातील पुराचे पाणी सोलापूरकडे वळवण्यासाठी योजना आखत आहोत. या जिल्ह्याचा दुष्काळ कायमस्वरूपी हटवण्यासाठी कृष्णा भीमा स्थिरीकरण योजना महत्त्वाची आहे आणि ती आम्ही राबवणारच, असे आश्‍वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिले. 

सोलापूर ः सोलापूरसह अन्य नजीकच्या जिल्ह्याला दुष्काळातून बाहेर काढण्यासाठी भाजप-शिवसेना महायुती कटिबद्ध आहे. कोल्हापूर, सांगली या भागातील पुराचे पाणी सोलापूरकडे वळवण्यासाठी योजना आखत आहोत. या जिल्ह्याचा दुष्काळ कायमस्वरूपी हटवण्यासाठी कृष्णा भीमा स्थिरीकरण योजना महत्त्वाची आहे आणि ती आम्ही राबवणारच, असे आश्‍वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिले. 

भाजप-शिवसेना, रिपाइं, शिवसंग्राम आणि रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार सुधाकर परिचारक यांच्या प्रचारासाठी मंगळवेढा येथे गुरुवारी (ता. १०) आयोजित प्रचारसभेत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. माजी खासदार विजयसिंह मोहिते पाटील, आमदार प्रशांत परिचारक, उमेदवार सुधाकर परिचारक, माजी आमदार शहाजी पाटील, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार आदी उपस्थित होते. 

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘‘महायुतीच्या सरकारने पाच वर्षात केलेला पारदर्शी कारभार आणि विकासकामाच्या जोरावर पुन्हा एकदा आम्ही सत्तेत येऊ. या पाच वर्षात अनेक निर्णय आम्ही घेतले. ५० लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली. दुष्काळ निधी दिला. अतिवृष्टीत मदत केली. ट्रॅक्‍टरसाठी अनुदान दिले. जनावरांसाठी छावण्या सुरू केल्या. सामान्यांच्या उपचारासाठी मदत केली. जलयुक्त शिवारसारख्या योजनेतून मोठे काम उभे राहिले. अनेक निर्णय सांगता येण्यासारखे आहेत. शेतकरी आणि सामान्य माणूस पहिल्यापासूनच आम्ही केंद्रबिंदू मानला. पण विरोधी पक्ष आज गलितगात्र झाला आहे. सोलापूरच नव्हे, तर आगामी काळात महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी आमचा अजेंडा असेल, असेही ते म्हणाले. ’’

इतर ताज्या घडामोडी
नगर जिल्ह्यात ६५.१६ टक्के मतदाननगर : नगर जिल्ह्यामध्ये विधानसभेच्या बारा मतदार...
कोल्हापूर जिल्ह्यात ७४.०८ टक्के मतदानकोल्हापूर ः गेल्या महिन्याच्या कालावधीतील...
४७ वर्षांत प्रथमच ऑक्टोबरमध्ये मुळा...राहुरी, जि. नगर : मुळा धरणात १९७२ पासून पाणी...
खानदेशात जोरदार पाऊस, वाघूर, हतनूर...जळगाव  ः खरिपातील ज्वारी, सोयाबीन आदींची...
जळगाव जिल्ह्यातील बाजार समित्यांमधील...जळगाव  ः पावसामुळे जिल्ह्यातील अमळनेर, चोपडा...
अकोल्यासह बुलडाणा जिल्ह्यात पावसाचा...अकोला : या भागात अकोला तालुक्यात तसेच...
रब्बी हंगामात अकोला जिल्ह्यात होणार...अकोला  ः यंदा जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला...
मराठवाड्यात पावसामुळे शेतकऱ्यांचे...औरंगाबाद, नांदेड : मराठवाड्यात ४२१ पैकी ३०१...
परभणीत गेल्या रब्बीतील ज्वारी,...परभणी : गतवर्षी (२०१८-१९) च्या रब्बी हंगामात...
मुसळधारेमुळे रब्बी हंगाम लांबण्याची...सांगली, कोल्हापूर  : जिल्ह्यात सोमवारी...
हमीभाव खरेदी केंद्राकडे शेतकऱ्यांची पाठसोलापूर  : मूग, उडीद, सोयाबीनची हमीभावाने...
भोर तालुक्यात रात्रभर मुसळधार पाऊसपुणे : जिल्ह्यात सोमवारी (ता. २१) दिवसभराच्या...
सोलापूर जिल्ह्यात पावसामुळे टॅंकरच्या...सोलापूर  : गेल्या वर्षीच्या दुष्काळानंतर...
सातारा जिल्ह्यात सोयाबीन काढणीत पावसाचा...सातारा ः जिल्ह्यात अतिवृष्टी आणि सध्या सुरू...
मराठवाडी धरणावर पुन्हा यंत्रणा सज्जढेबेवाडी, जि. सातारा ः पावसाळ्यात थांबविलेले...
परभणीत अतिवृष्टीमुळे बाधित पिकांची...परभणी ः जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या...
स्वाभिमानीच्या विदर्भ अध्यक्षांवरील...अमरावती ः स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ...
सततच्या पावसाने नगर जिल्ह्यात पिकांचे...नगर ः जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून पडत...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस; भात...सिंधुदुर्ग  ः जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरूच...
खाद्यउद्योगासाठी जंगली बुरशींचे...क्विण्वनयुक्त पदार्थांच्या चवीमध्ये त्यामध्ये...