बार्शी तालुक्यातील बॅंकांत दुष्काळी निधी
बार्शी तालुक्यातील बॅंकांत दुष्काळी निधी

बार्शी तालुक्यातील बॅंकांत दुष्काळी निधी

वैराग : ‘‘बार्शी तालुक्यातील १३८ गावांतील ६४ हजार लाभार्थी शेतकऱ्यांना दुष्काळ निधी मिळण्याची आशा आता पूर्ण होत आहे. ३८ कोटी ५६ लाख ९७ हजारांचा हा निधी मंजूर झाला आहे. पहिल्या टप्प्यात ७२ गावांतील २१ हजार ५५१ लाभार्थी शेतकऱ्यांना २२ कोटी २ लाख रुपये मंजूर झाले आहेत. हा निधी आरटीजीएसद्वारे बॅंकांत जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे’’, अशी माहिती तहसीलदार ऋषिकेत शेळके यांनी दिली. 

तालुक्यात ६६ हजार लाभधारक शेतकरी आहेत. त्यात जिरायतीसाठी हेक्टरी ६८०० रुपये, बागायती क्षेत्रासाठी हेक्टरी १३ हजार ५०० व फळबागांसाठी हेक्टरी १८ हजार या निकषाद्वारे मदत मिळेल. दुष्काळाची दखल घेऊन या पहिल्या टप्प्यातील ७२ गावांतील २१ हजार ५५१ शेतकऱ्यांसाठी उपकोशागार कार्यालयाने तातडीने २२ कोटी २ लाख रुपये मंजूर करून ती रक्कम बँकेत जमा करण्यासाठी पाठवली आहे.

राहिलेल्या उर्वरित बाधित शेतकऱ्यांची बँक खाती उपलब्ध होतील, तशा पद्धतीने हा दुष्काळ निधी जमा करण्यात येत असल्याचे बार्शी महसूल प्रशासनाकडून सांगण्यात आले.

पहिल्या टप्प्यातील निधी खातेदार गावे
१ कोटी १४ लाख २२ हजार रुपये  १ हजार २३१ उपळाई ( ठोंगे ), गौडगाव, रऊळगाव व बांगरवाडी
२ कोटी २८ लाख ८८ हजार १२४ रुपये  २ हजार ८६० श्रीपतपिंपरी, जळगाव, अंबाबाईचीवाडी, जोतिबाचीवाडी, खामगाव, आंबेगाव, पिंपळवाडी, तांदुळवाडी, गोरमाळे, कासारवाडी, फपाळवाडी, गाताचीवाडी 
५ कोटी ८४ लाख ५१ हजार रुपये  ७ हजार २३४ धामणगाव, चिंचखोपन, कोरपळे, अलिपूर, सूर्डी, इंदापूर, रस्तापूर, सर्जापूर, रातंजन, उपळे -दुमाला, बोरगाव, साकत, झरेगाव, येळंब, जामगाव, राळेरास , धोत्रे 
४ कोटी ६३ लाख ९ हजार २६४ रुपये   ४ हजार ८५१ धोत्रे, पिंपळगाव, मळेगाव, जामगाव, मालेगाव, खडकोणी, सासुरे, भानसळे, शिराळे, चारे, वालवड, कांदलगाव 
३ कोटी १७ लाख १६ हजार ७६६ रुपये  ३ हजार ९४२  वैराग, झाडी, खांडवी, चुंब, मानेगाव, जामगाव, हिंगणी, पांगरी, भातंबरे, तांबेवाडी, मळेगाव.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com