बुलडाण्यात दुष्काळ निधीचे १९५ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा ः डॉ. कुटे

बुलडाण्यात दुष्काळ निधीचे १९५ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा ः डॉ. कुटे
बुलडाण्यात दुष्काळ निधीचे १९५ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा ः डॉ. कुटे

बुलडाणा ः मागील वर्षामध्ये जिल्ह्यावर ओढावलेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी संकटात सापडला होता. अशा शेतकऱ्यांना शासनाने आर्थिक मदत देत मोठा दिलासा दिला. दुष्काळाच्या नुकसानीपोटी जिल्ह्यात ३ लाख २० हजार ३०८ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात १९५ कोटी २४ लाख रूपयांची आर्थिक मदत थेट जमा करण्यात आली आहे, अशी माहिती पालकमंत्री डॉ. संजय कुटे यांनी दिली.   स्वातंत्र्य दिनाच्या ७२ व्या वर्धापन दिनाच्या मुख्य शासकीय सोहळ्यात ते  बोलत होते. याप्रसंगी आमदार हर्षवर्धन सपकाळ, उमा तायडे, माजी आमदार विजयराज शिंदे, धृपदराव सावळे, तोताराम कायंदे, जिल्हाधिकारी डॉ. निरूपमा डांगे, मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराजन आदींची उपस्थिती होती. या वेळी डॉ. कुटे म्‍हणाले,  प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून २ लाख ४८ हजार ९८७ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ४९.७४ कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. जलयुक्त शिवार अभियानातंर्गत जिल्हाभरात सन २०१८-१९ साठी ३०३ गावांची निवड करण्यात आली. यात ४ हजार २४५ कामे पूर्ण करण्यात आली आहेत. या कामांमुळे ५ हजार १४४ टीसीएम पाणीसाठा निर्माण झाला आहे. तसेच ४ हजार ११५ हेक्टर क्षेत्रावर संरक्षित सिंचनाची सुविधा उपलब्ध झाली आहे. शेततळे योजनेतंर्गत ५ हजार ५९८ शेततळी पूर्ण झाली असून शेतकऱ्यांना २४ कोटी ८६ लाख रुपयांचे अनुदान अदा करण्यात आले आहे. प्रधानमंत्री पीकविमा योजनेत सन २०१८-१९ मध्ये खरीप हंगामात १.९६ लाख शेतकऱ्यांना ५९.४२ कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे. यावर्षी २.९१ लाख शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग घेऊन पिकांचा विमा उतरविला आहे. केंद्र शासन पुरस्कृत बळिराजा जलसंजीवनी योजना जिल्ह्यात कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यानुसार जिगाव मोठा प्रकल्प व अन्य ८ लघु प्रकल्पांना मोठ्या प्रमाणावर निधी मिळत आहे. त्यामुळे नजिकच्या काळात जिल्हा सिंचनयुक्त झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नरेंद्र लांजेवार यांनी केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com