Agriculture news in marathi; Drought funds in Buldana: Rs. 195 cr. transfer to farmers account t | Agrowon

बुलडाण्यात दुष्काळ निधीचे १९५ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा ः डॉ. कुटे
टीम अॅग्रोवन
शनिवार, 17 ऑगस्ट 2019

बुलडाणा ः मागील वर्षामध्ये जिल्ह्यावर ओढावलेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी संकटात सापडला होता. अशा शेतकऱ्यांना शासनाने आर्थिक मदत देत मोठा दिलासा दिला. दुष्काळाच्या नुकसानीपोटी जिल्ह्यात ३ लाख २० हजार ३०८ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात १९५ कोटी २४ लाख रूपयांची आर्थिक मदत थेट जमा करण्यात आली आहे, अशी माहिती पालकमंत्री डॉ. संजय कुटे यांनी दिली.  

बुलडाणा ः मागील वर्षामध्ये जिल्ह्यावर ओढावलेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी संकटात सापडला होता. अशा शेतकऱ्यांना शासनाने आर्थिक मदत देत मोठा दिलासा दिला. दुष्काळाच्या नुकसानीपोटी जिल्ह्यात ३ लाख २० हजार ३०८ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात १९५ कोटी २४ लाख रूपयांची आर्थिक मदत थेट जमा करण्यात आली आहे, अशी माहिती पालकमंत्री डॉ. संजय कुटे यांनी दिली.  

स्वातंत्र्य दिनाच्या ७२ व्या वर्धापन दिनाच्या मुख्य शासकीय सोहळ्यात ते  बोलत होते. याप्रसंगी आमदार हर्षवर्धन सपकाळ, उमा तायडे, माजी आमदार विजयराज शिंदे, धृपदराव सावळे, तोताराम कायंदे, जिल्हाधिकारी डॉ. निरूपमा डांगे, मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराजन आदींची उपस्थिती होती.

या वेळी डॉ. कुटे म्‍हणाले,  प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून २ लाख ४८ हजार ९८७ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ४९.७४ कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. जलयुक्त शिवार अभियानातंर्गत जिल्हाभरात सन २०१८-१९ साठी ३०३ गावांची निवड करण्यात आली. यात ४ हजार २४५ कामे पूर्ण करण्यात आली आहेत. या कामांमुळे ५ हजार १४४ टीसीएम पाणीसाठा निर्माण झाला आहे. तसेच ४ हजार ११५ हेक्टर क्षेत्रावर संरक्षित सिंचनाची सुविधा उपलब्ध झाली आहे.

शेततळे योजनेतंर्गत ५ हजार ५९८ शेततळी पूर्ण झाली असून शेतकऱ्यांना २४ कोटी ८६ लाख रुपयांचे अनुदान अदा करण्यात आले आहे. प्रधानमंत्री पीकविमा योजनेत सन २०१८-१९ मध्ये खरीप हंगामात १.९६ लाख शेतकऱ्यांना ५९.४२ कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे. यावर्षी २.९१ लाख शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग घेऊन पिकांचा विमा उतरविला आहे. केंद्र शासन पुरस्कृत बळिराजा जलसंजीवनी योजना जिल्ह्यात कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यानुसार जिगाव मोठा प्रकल्प व अन्य ८ लघु प्रकल्पांना मोठ्या प्रमाणावर निधी मिळत आहे. त्यामुळे नजिकच्या काळात जिल्हा सिंचनयुक्त झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नरेंद्र लांजेवार यांनी केले.

इतर बातम्या
खानदेशात लष्करी अळीकडून ४० टक्के मका...जळगाव  ः खानदेशात मका पिकावर अमेरिकन लष्करी...
औरंगाबाद, जालना जिल्ह्यांत पावसाचा कमी-...औरंगाबाद  : मराठवाड्यातील ४२१ पैकी तब्बल २७५...
कोल्हापूर, सिंधुदुर्गात पावसाची रिपरिपकोल्हापूर, सिंधुदुर्ग : सप्टेंबरच्या पहिल्या...
शेतीमाल तारण कर्ज योजनेसाठी एक कोटीपरभणी : ‘‘परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे...
पाचोरा, जामनेरातही १०० टक्के पाऊसजळगाव ः खानदेशात जळगाव, धुळ्यात या...
‘टेंभू‘चे पाणी आटपाडीत, शेतकऱ्यांना...आटपाडी जि. सांगली :  टेंभू पंपगृहातील पंपात...
‘शेतकरी सन्मान योजने‘च्या अनुदानासाठी...कळमनुरी : प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेंतर्गत...
तीन कारखान्यावरील कारवाई अंतिम टप्प्यातसोलापूर : ‘‘सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी...
विषबाधितांवरील उपचाराबाबत वैद्यकीय...अकोला  ः कृषी विभाग, जिल्हा परिषद व सिंजेंटा...
संत्र्याला जागतिक बाजारपेठेत पोचवण्याचे...अमरावती : जिल्ह्यात उत्पादित होणाऱ्या...
पुणे जिल्ह्याच्या दुष्काळी भागात...पुणे ः गणपतीच्या विसर्जनानंतर पुन्हा पावसाने जोर...
बागलाण तालुक्यात शेतातून चंदनाची चोरीनाशिक  : बागलाण तालुक्यातील नवे निरपूर येथील...
तोलाई परिपत्रक होणार रद्द पुणे ः बाजार समित्यांमध्ये शेतमालाच्या...
भात, सोयाबीन पिके बहरलीचास, जि. पुणे ः खेड तालुक्‍याच्या पश्‍चिम...
‘शेतकरी सन्मान’साठी २० हजार कोटी दिले...नाशिक : शेतकऱ्यांना सन्मान मिळवून देत त्यांना मदत...
‘मी शेतकरी’ आंदोलनाला गांधी जयंतीपासून...नगर : शेतकऱ्यांच्या शेतीमालाला दीडपट हमीभाव तसेच...
शेतीपूरक व्यवसायांना राज्य शासनाची...सांगली ः अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास...
थकीत बिलासाठी मुंबईत दुग्धविकास आयुक्त...परभणी ः शासकीय दूध योजनेअंतर्गत परभणी येथील दुग्ध...
नाशिक जिल्ह्यात मका लष्करी अळीच्या...नाशिक  : जिल्ह्यात यंदा अमेरिकन लष्करी अळीचा...
आर्थिक मंदीमुळे देशातील शेती क्षेत्राला...नांदेड ः सध्या प्रचंड मंदी आहे. गुंतवणूक केली जात...