खानदेशात दादरला दुष्काळाचा फटका

खानदेशात दादरला दुष्काळाचा फटका
खानदेशात दादरला दुष्काळाचा फटका

जळगाव : खानदेशातील प्रमुख कोरडवाहू पीक असलेल्या दादरला (रब्बी ज्वारी) दुष्काळाचा फटका बसत आहे. पुरेसा ओलावा जमिनीत नसल्याने वाढ कमी आहे. दाणे भरण्याची प्रक्रियादेखील मंदावली आहे. 

जळगाव जिल्ह्यात अमळनेर तालुक्‍यात मारवड, गोवर्धन, बोरगाव, करणखेडा, धानोरा, खेडी, वासरे, जैतपीर, निम, कलाली, जळगावात आसोदा, भादली, नशिराबाद, आव्हाणे, ममुराबाद, चोपडा तालुक्‍यात कठोरा, सनपुले, गरताड, विटनेर, विरवाडे, चौगाव, लासूर, चहार्डी, अडावद, यावलमध्ये डांभुर्णी, किनगाव, साकळी, विरावली, कोरपावली, मुक्ताईनगरात चांगदेव, नायगाव, अंतुर्ली, पाचोरामधील गाळण, बाळद, नगरदेवळा, कुऱ्हाड, कुरंगी, एरंडोलात उत्राण, तळई आदी गावे दादरच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत.

दिवाळीच्या वेळेस कोरडवाहू दादरची पेरणी केली जाते. परंतु यंदा सप्टेंबरमध्ये फक्त दोन दिवस पाऊस झाला. परंतु काळ्या कसदा जमिनीत काही शेतकऱ्यांनी पेरणीचे धाडस केले. पुरेसा वाफसा नसल्याने उगवण अपेक्षित झाली नाही. पिकात तूट आली. नंतर थंडी पडल्याने पीक वाढू लागले, पण आता जेथे पीक निसवले आहे, तेथे त्याची वाढ खुंटली आहे. पुरेसा ओलावा नसल्याने दाणे भरत नसल्याची स्थिती आहे.  

यंदा इतर कोरडवाहू रब्बी पिकांचीही अवस्थाही खराब आहे. दादरचा फक्त चाराच येईल, अशी स्थिती अमळनेर, जळगाव भागांत आहे. काही शेतकऱ्यांनी नजीक सिंचनाचे स्रोत असलेल्या शेतकऱ्यांकडून पाणी विकत घेतले आहे. एका दिवसासाठी दोन हजार रुपये त्यासाठी शेतकऱ्यांना द्यावे लागत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com