दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना मदतीची आस

दुष्काळ जाहीर झाल्यानंतर टॅँकर मंजुरीचे अधिकार तालुका पातळीवर तहसीलदारांना असतात, परंतु अजूनही टॅँकर मंजुरीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रस्ताव पाठवले जातात. त्यामुळे १० ते १२ दिवसांचा अवधी निघून जातो. तसेच शासन मानसी २० लिटरप्रमाणे पाणी देते. ते कमी पडत असल्याने शासनाने दर व्यक्ती ४५ लिटरप्रमाणे पाणी द्यावे. दुष्काळी तालुक्यात चारा डेपो, चारा छावण्या, रोजगार हमी योजनेची कामे आदींसह शासकीय उपाययोजना तत्काळ सुरू करण्यात याव्यात. - अरुण वाघ, माजी सभापती, कृ. उ. बा. सिन्नर
दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना मदतीची आस
दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना मदतीची आस

सिन्नर, जि. नाशिक : पावसाच्या अनियमिततेमुळे खरीप हंगामातील अनेक पिके शेतकऱ्यांच्या हातातून गेली. परतीचा पाऊसही वेळेवर न झाल्यामुळे सिन्नर तालुक्यात रब्बी हंगाम धोक्यात आला आहे. दुष्काळी तालुक्यांमध्ये विविध उपाययोजना शासनाने जाहीर केल्या. मात्र, आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी मदतीची घोषणा अद्याप करण्यात आली नाही. नुकसान भरपाईपोटी सरकारकडून मदत केव्हा जाहीर होणार, याबाबत शेतकऱ्यांना आस लागली आहे.

शासनाने ३१ आॅक्टोबर रोजी सिन्नर तालुका दुष्काळी जाहीर केला आहे. तरीही उपाययोजनेला मात्र अजूनही सुरवात नाही. शासनाकडून तालुक्यातील पिकांच्या नुकसानाचे सत्यमापन चाचणी करण्यात आली होती. त्यानंतर गतमहिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राज्याचे मृद व जलसंधारणमंत्री राम शिंदे यांनी तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला.

दुष्काळी परिस्थिती असलेल्या तालुक्यांमध्ये टंचाईनिवारणासाठी सरकारमार्फत जमीन महसुलात सूट, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषिपंपांच्या वीजदेयकात सूट, शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात सूट, पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात टॅँकरद्वारे पाणीपुरवठा, नळपाणी पुरवठा योजना, टंचाईग्रस्त गावातील शेतकऱ्यांच्या कृषिपंपांची वीजजोडणी खंडित न करणे आदी उपाययोजना लागू करण्याची घोषणा शासनाने केली आहे. या वर्षी सिन्नर तालुक्यात अत्यल्प पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना खरीप हंगामात पिके घेता आली नाहीत. असलेली पिके पाण्याअभावी करपून गेली. खरीप पिकांच्या उत्पादनात कमालीची घट झाल्याने शेतकऱ्यांना हमीभाव न मिळाल्याने बळिराजा आर्थिक संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा आहे.

चाऱ्याचा प्रश्न गंभीर तालुक्यात खरीप हंगामात शेतकऱ्यांना हिरवा चारा न झाल्याने दिवसेंदिवस दुष्काळी परिस्थिती गंभीर बनत चालली आहे. ग्रामीण भागात शेतीला जोडधंदा म्हणून शेतकरी दुग्धव्यवसायाला प्राधान्य देत आहेत. चाराही संपुष्टात आला आल्याने पशुधन धोक्यात आले आहे. चारा छावणी सुरू करण्याची मागणीही शेतकरी करत आहे.

टॅँकरद्वारे पाणीपुरवठा या वर्षी तालुक्यात पाणीटंचाईचे संकट मोठे आहे. सध्या ११ गावे व १२४ वाड्या, वस्त्यांना टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. तालुक्यातील प्रत्येक धरणात मोजकाच पाणीसाठा शिल्लक आहे. ते पाणी वर्षभर टिकविण्यासाठी प्रशासनाला कसरत करावी लागणार आहे, अन्यथा पाणीटंचाईची तीव्रता भयानक होण्याची चिन्हे  आहेत. दिवसेंदिवस नवीन गावांचेही व वाड्या, वस्त्यांचे टॅँकर मागणीचे प्रस्ताव पंचायत समिती स्तरावर प्राप्त होत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com