दुष्काळग्रस्त पुरंदरची शेततळे घेण्यात आघाडी

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे : पाणीटंचाईच्या काळात पाणी उपलब्ध होण्याच्या उद्देशाने सरकारने मागेल त्याला शेततळ्यांची योजना सुरू केली. या योजनेला शेतकऱ्यांचा कमी प्रतिसाद असला तरी दुष्काळी तालुक्यातील शेतकऱ्यांना काही प्रमाणात पिके घेता येणे शक्य झाले आहे. गेल्या दोन वर्षांत पुणे जिल्ह्यातील दुष्काळी पुरंदर तालुक्याने आघाडी घेत तब्बल ४५७ शेततळे घेऊन जिल्ह्यात अव्वल स्थान पटकावले आहे. शेतकऱ्यांना या शेततळ्यामुळे दिलासा मिळाला असून शाश्वत पिके घेऊ लागला आहे.

मागील पाच ते सहा वर्षांपासून पुणे जिल्ह्यातील पूर्वेकडील भागात दुष्काळजन्य परिस्थिती आहे. त्यामुळे दरवर्षी उन्हाळ्यात टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ शासनावर आली होती. मागील तीन ते चार वर्षांपूर्वी या भागातील टँकरच्या संख्येत चांगलीच वाढ झाली होती. त्यातच पिकांची शाश्वती कमी झाली होती. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना शाश्वत पिके घेण्यासाठी मागेल त्याला शेततळ्यांची योजना आणली. त्याअंतर्गत जिल्ह्यात अडीच हजार शेततळ्यांचे उद्दिष्ट ठरवून दिले.

शेतकऱ्यांनी शेततळे घेऊन त्याचा वापर पाणीटंचाईच्या काळात करणे गरजेचे असल्याचा मुख्य उद्देश होता. त्यासाठी शासनाकडून जास्तीत जास्त पन्नास हजार रुपयांचे अनुदान देण्यात येते.

जिल्ह्यात २०१६-१७ आणि २०१७-१८ या आर्थिक वर्षाच्या अडीच हजार शेततळ्यासाठी सुमारे साडे पाच हजार अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी गेल्या वर्षी ७९२ शेततळी पूर्ण झाली असून त्यावर सुमारे ३६५ कोटी ६ लाख रुपयांचा खर्च झाला आहे. यंदा ७३९ शेततळी पूर्ण झाली असून, उर्वरित शेततळ्यांची कामे सुरू आहेत. त्यासाठी ३१९ कोटी रुपयांचे वाटप केले आहे. तर ३०१ कोटी ९७ लाख रुपये खर्च झाले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण एक हजार ५३१ शेततळी पूर्ण झाली आहेत.  

जिल्ह्यात अजूनही शेततळ्यांची कामे सुरू असून त्यासाठी जवळपास दोनशे कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

मागेल त्याला शेततळ्यासाठी अनुदान कमी असले तरी अडचणीच्या वेळी पिकांना पाणी देण्यासाठी शेततळ्यातील पाणी वापरता येते. त्यामुळे शेततळ्यासाठी मागणी वाढत आहे. दोन वर्षांत जवळपास पंधराशे शेततळी पूर्ण झाली आहेत. त्याचा फायदाही शेतकऱ्यांना होत आहे. - बी. जी. पलघडमल,  जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

तालुकानिहाय झालेली शेततळी

पुरंदर ४५७, इंदापूर ३०३, बारामती २७४, शिरूर १७९, खेड ८७, जुन्नर ७६, आंबेगाव ४८, दौंड ४६, हवेली ३२, भोर २७, मुळशी १, मावळ १ .

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com