१११ कोटी दुष्काळ अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा

दुष्काळ अनुदान १११ कोटी  शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा
दुष्काळ अनुदान १११ कोटी  शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा

सांगली ः दुष्काळाने होरपळत असलेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाने ११० कोटी ६८ लाख २६ हजार २६८ रुपये १८ हजार ८०० शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले आहे. उर्वरित ५ कोटी १२ लाख ९१ हजार ७३२ रुपये लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतील, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सूत्रांनी दिली. 

शासनाकडून दुष्काळामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी मदत निधी दिली आहे. बागायत पिकांसाठी हेक्टरी १७ हजार रुपये तर जिराईत पिकांसाठी हेक्टरी ७ हजार रुपये मदत जाहीर करण्यात आली आहे. दोन हेक्टरपर्यंत शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना या मदतीचा लाभ मिळणार आहे. आतापर्यंत यासाठी शासनाकडून ११६ कोटी ११ लाख १८ हजार रुपये अनुदान प्राप्त झाले आहे. जत तालुक्यासाठी सर्वाधिक म्हणजे ४१ कोटी ५८ लाख ६७ हजार अनुदान प्राप्त झाले आहे. 

आटपाडी तालुक्यासाठी सर्वात कमी सहाकोटी ५२ लाख ६५ हजार ७१३ रुपये अनुदान आले आहे. शासनाने दुष्काळी तालुका म्हणून जाहीर केलेल्या २७७ गावांतील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येत आहे.  शेतकरी सन्मान योजनेचाही निधी जमा करण्यात येत आहे. यासाठी दोन लाख ५८ हजार शेतकरी पात्र आहेत.

तालुकानिहाय दुष्काळी अनुदान प्राप्त शेतकरी व रक्कम
तालुका प्राप्त अनुदान शेतकरी रक्कम जमा
जत ४१ कोटी ५८ लाख ४४०८९ ३५ कोटी ५४ लाख
कवठेमहांकाळ १३ कोटी ५० लाख ३९६१० १३ कोटी ५० लाख
खानापूर २४ कोटी १३ लाख ५२२६९ २४ कोटी १३ लाख
आटपाडी ६ कोटी ५२ लाख १७७२५ ६ कोटी ५२ लाख
तासगाव ३० कोटी ३५ लाख ६५१०७ ३० कोटी २६ लाख
एकूण ११६ कोटी ११ लाख २१८८०० ११० कोटी ९६ लाख

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com