agriculture news in marathi, drought relief work in Marathwada, Maharashtra | Agrowon

मराठवाड्यात दुष्काळी उपाययोजनांकडे लक्ष
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 2 नोव्हेंबर 2018

दुष्काळावर मात करण्यासाठी प्रशासनाकडून तयारी करण्यात आली आहे. टंचाई कृती आराखड्यानुसार योजना राबविल्या जाणार असून दुष्काळावर प्रामाणिकपणे काम करून सक्षमपणे मात केली जाईल.
- शिवानंद टाकसाळे, अतिरिक्‍त आयुक्‍त औरंगाबाद विभाग

औरंगाबाद : मराठवाड्यावर यंदा दुष्काळाचे संकट गंभीर असल्याची बाब शासनाच्या ३१ ऑक्‍टोबरच्या निर्णयाने अधोरेखित झाली आहे. ७६ पैकी तब्बल ४४ म्हणजे निम्म्यापेक्षा जास्त तालुक्‍यांत गंभीर तर तीन तालुक्‍यांत मध्यम स्वरूपाचा दुष्काळ असल्याचे ३१ ऑक्‍टोबरला शासनाने जाहीर केले आहे. त्यामुळे आता दुष्काळ निवारण्यासाठी तातडीने व परिणामकारक काय उपाययोजना राबविल्या जातात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मराठवाड्यातील ४७ तालुक्‍यांत शासनाने दुष्काळ जाहीर केला आहे. त्यामध्ये ४४ तालुक्‍यांत गंभीर तर ३ तालुक्‍यांत मध्यम स्वरूपाचा दुष्काळ असल्याचे शासनाने ३१ ऑक्‍टोबरच्या शासन आदेशात स्पष्ट केले आहे.
दुष्काळाची दुसरी कळ लागू झालेल्या मराठवाड्यातील तालुक्‍याचा गंभीर व मध्यम दुष्काळी तालुक्‍यात समावेश आहे. त्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील सर्वच्या सर्व ९, बीड जिल्ह्यातील सर्व ११, जालना जिल्ह्यातील ७, नांदेड जिल्ह्यातील ३, उस्मानाबाद जिल्ह्यातील ७, परभणी जिल्ह्यातील ६, हिंगोली जिल्ह्यातील ३ व लातूर जिल्ह्यातील एका तालुक्‍यांचा समावेश आहे.

 दुष्काळ जाहीर झालेल्या एकूण तालुक्‍यांपैकी नांदेड जिल्ह्यातील उमरी, हिंगोली जिल्ह्यांतील कळमनुरी व लातूर जिल्ह्यांतील शिरूर अनंतपाळ तालुक्‍यात मध्यम स्वरूपाचा दुष्काळ असल्याचे शासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. हा दुष्काळ जाहीर करताना शासनाने जून ते सप्टेंबर दरम्यान पर्जन्याची तूट, उपलब्ध असलेल्या भूजलाची कमतरता, दूरसंवेदनाविषयक निकष, वनस्पती निर्देषांक, मृदा आर्द्रता, पेरणीखालील क्षेत्र व पिकाची स्थिती आदी सर्व घटकांची स्थिती लक्षात घेतल्याचे स्पष्ट केले आहे.

परिस्थितीनुरूप दुष्काळ जाहीर केलेल्या तालुक्‍यांमध्ये प्रत्यक्ष पिकांच्या नुकसानीचे सत्यापनही करण्यात आले असून, त्यामधील निष्कर्षानुसार जिल्हा व राज्यस्तरीय दुष्काळ देखरेख समितीकडून प्राप्त प्रस्तावानुसार दुष्काळ जाहीर करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती हे विशेष. त्यामुळे आता दुष्काळाचा सामना करण्यासाठी टंचाई कृती आराखड्यासह इतर कोणत्या उपायोजना प्राधान्याने राबविल्या जाऊन दुष्काळी भागाला दुष्काळी स्थितीशी दोन हात करण्याचं बळ दिलं जातं हे महत्त्वाचं ठरणार आहे. 

‘ॲग्रोवन’ने नुकताच मराठवाड्यातील दुष्काळाचा आढावा जिल्हानिहाय मांडून वस्तुस्थिती शासनाच्या निदर्शनास आणून देण्याचे काम केले होते हे विशेष.

टंचाई कृती आराखडा तयार
मराठवाड्यातील दुष्काळी स्थिती लक्षात घेऊन प्रशासनाच्या वतीने ऑक्‍टोबर ते डिसेंबर २०१८ दरम्यान राबविण्याचा जवळपास १०८ कोटी ४३ लाख ३२ हजार रुपये अपेक्षित खर्चाचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. सुमारे ६४३३ योजना ३९०६ गावे व ९१७ वाड्यांवर राबविल्या जाणार असल्याची माहिती प्रशासनाच्या सूत्रांनी दिली. यामध्ये नवीन विंधन विहिरी, प्रादेशिक नळ योजनांची दुरुस्ती, विंधन विहिरींची विशेष दुरुस्ती, तात्पुरत्या पूरक नळ योजना, टॅंकरने बैलगाडीने पाणीपुरवठा, विहिरींचे अधिग्रहण, विहीर खोल करणे, गाळ काढणे आदी योजना राबविल्या जाणार आहेत.

इतर अॅग्रो विशेष
मंदीचा मारगेल्या वर्षभरापासून आर्थिक मंदीचे चटके देशाला बसत...
समस्यांच्या गर्तेत हरवलेली शेतीकाही वर्षांपूर्वी उत्तम शेती असण्याची अनेक कारणे...
शेततळ्याच्या प्लॅस्टिकला तूर्त अनुदान...पुणे  : शेततळ्याच्या अस्तरीकरणाकरिता...
वारणा-कृष्णा नदीकाठच्या शेतजमिनी कोसळू...सांगली ः सांगली जिल्ह्यातील कृष्णा आणि वारणा...
मार्केट केंद्रित शेडनेटची उत्कृष्ठ शेती अभ्यासवृत्ती, कायम नवे शिकण्याची आस, बाजारपेठांचा...
जालना जिल्ह्यात वीस हजार शेतकऱ्यांच्या...जालना : जिल्ह्यातील १२० गावांत हवामान अनुकूल...
दर्जाहीन शिक्षण संस्थांवर कारवाई होणार...पुणे: राज्यात दर्जाहीन कृषी महाविद्यालये...
पावसाळ्यात फुलले नागपुरातील मका मार्केट सध्या राज्यातील विविध बाजारपेठांत स्वीटकॉर्न (...
अवर्षणप्रवण, आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांत...अकोला ः राज्यातील अवर्षणप्रवण क्षेत्र,...
महिनाअखेरीस पावसाला पोषक हवामानपुणे : ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला राज्यात दमदार...
शासनाने दूध अनुदानाचे २५० कोटी थकविलेपुणे : राज्याच्या एका भागात चारा-पाणीटंचाई तर...
पूर व्यवस्थापन प्रकल्पात महाराष्ट्र...पुणे : केंद्र शासनाकडून देशात सुरू असलेल्या...
शेतकरी अपघात विमा योजनेची व्याप्ती...मुंबई: शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या...
कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात गाळाने...कोल्हापूर/सांगली : बारमाही नद्यांनी दक्षिण...
विदर्भ, मराठवाड्यात पावसाचा अंदाजपुणे : पाऊस थांबल्याने राज्याच्या अनेक भागांतील...
दुष्काळी भागातही दर्जेदार उत्पादनाचा...नगर जिल्ह्यात कासार पिंपळगाव (ता. पाथर्डी) येथील...
शेतात पिकवा ‘हिरवे सोने’केंद्र शासनाने ‘राष्ट्रीय बांबू मिशन’ची स्थापना...
‘पंचनामा’ पूरग्रस्त पशुधनाचाको ल्हापूर, सांगली, सातारा या भागांतील पूर जसजसा...
आले पिकाने दिली आर्थिक सक्षमता बुलडाणा जिल्ह्यात खल्याळ गव्हाण येथील दिनकर व...
क्षारयुक्त जमिनीत एकात्मिक शेतीचा आदर्श बारामती तालुक्यातील मळद (जि. पुणे) येथील प्रशांत...