मराठवाड्यात दुष्काळाची धग कायम

मराठवाड्यात दुष्काळाची धग कायम
मराठवाड्यात दुष्काळाची धग कायम

औरंगाबाद : पावसाळा सुरू होऊन महिना उलटला, तरीही मराठवाड्यातील दुष्काळाची धग कायम आहे. पावसाळ्यातही मराठवाड्यातील टंचाईग्रस्त गावे, वाड्यांची संख्या वाढत आहे. जवळपास ३६ लाख २८ हजारांवर लोकांची तहान टॅंकरवर अवलंबून आहे. पाच जुलैअखेरच्या स्थितीच्या तुलनेत सुमारे साडेसात लाख लोकांची टंचाईग्रस्तांमध्ये भर पडली आहे. त्यामुळे टॅंकरच्या संख्येतही जवळपास सव्वाचारशे टॅंकरची भर पडल्याची स्थिती आहे.

ढगांची ये-जा सुरू आहे. पण पावसाचा पत्ता नाही. मराठवाड्यात पाच जुलै अखेरपर्यंत २८ लाख ४३ हजार ८०३ लोकांसाठी १६८४ टॅंकर सुरू होते. आता बुधवारअखेरच्या (ता. १०) स्थितीनुसार टॅंचाईग्रस्त गावे, वाड्यांची संख्या १९५४ वर पोचली आहे. त्यामध्ये १५८३ गावे व ३७१ वाड्यांचा समावेश आहे. येथील जवळपास ३६ लाख २८ हजार ३८२ लोकांना टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. याशिवाय ५२६५ विहिरी अधिग्रहित आहेत. त्यामध्ये टॅंकरसाठी पाणीपुरवठा करणाऱ्या १००० विहिरींसह टॅंकरव्यतिरिक्‍त पाणीपुरवठा करणाऱ्या ४२६५ विहिरींचा समावेश आहे. 

काही ठिकाणी पावासाअभावी पेरणीच नाही, तर कुठे पेरणी मोडण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. मराठवाड्यातील ७६ पैकी केवळ ४ तालुक्‍यांत पावसाने अपेक्षित टक्‍केवारी गाठल्याचे आकडे सांगतात. उर्वरित एकाही तालुक्‍यात पावसाने अपेक्षेचा टक्‍का गाठलाच नाही.

उपलब्ध पाण्यातून तुषार सिंचनाद्वारे पिकांना पाणी देण्याचे काम सुरू असल्याची माहिती परतूर तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी दिली. दुसरीकडे प्रकल्पांमध्ये क्षमतेच्या तुलनेत केवळ ०.६८ टक्‍काच उपयुक्‍त पाणीसाठा आहे. ढग येतात आणि जातात. त्यामुळे सरकार मराठवाड्यात कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी हालचाली करतील का, हा खरा प्रश्‍न आहे. 

जिल्हानिहाय टंचाईग्रस्त नागरिक

औरंगाबाद  १२१७५२९
जालना ६६५९७१
परभणी १७४६७७
हिंगोली ८२०१७
नांदेड १९५१५०
बीड ६४७१००
लातूर  २२७३५०
उस्मानाबाद ४१८५८८

जिल्हानिहाय टंचाईग्रस्त गावे 

औरंगाबाद  ६३३
जालना ३८२
परभणी ७४
हिंगोली ४०
नांदेड १४१
बीड ४०४
लातूर १०५
उस्मानाबाद १७५

जिल्हानिहाय टॅंकरची संख्या

औरंगाबाद ७०७
जालना ३६५
परभणी ७६
हिंगोली ५०
नांदेड ५०
बीड ४२४
लातूर १०७
उस्मानाबाद  २३०

जिल्हानिहाय अधिग्रहित विहिरी  

औरंगाबाद २३२
जालना २७४
परभणी ४३८
हिंगोली ४९०
नांदेड ११९१
बीड ३२२
लातूर १२४९
उस्मानाबाद १०६९

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com