आढळा परिसरात दुष्काळी स्थिती

आढळा परिसरात दुष्काळी स्थिती
आढळा परिसरात दुष्काळी स्थिती

अकोले, जि. नगर : नगर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत सर्वाधिक पाऊस अकोले तालुक्‍याच्या पश्‍चिमेस झालेला असला तरी तालुक्‍यातील काही भागात मात्र दुष्काळी परिस्थिती आहे. आढळा परिसरात यावर्षी पावसाचे प्रमाण अत्यंत कमी असल्याने या परिसरातील पीक वाया जाऊ लागली आहेत. आढळा धरणही अजून यंदा भरलेले नाही. त्यामुळे या परिसरात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होऊ लागली आहे.

अकोले तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी तहसीलदारांना निवेदन दिलेले आहे. निवेदनात म्हटले आहे, की बिताका प्रकल्पासाठी वन विभागाकडे एक कोटी रुपये निधी पडून असून, त्यामध्ये चराचे अपूर्ण काम व प्रकल्पाचे उर्वरित काम पूर्ण करावे. यंदा या भागात अजून पुरेसा पाऊस झालेला नाही, त्यामुळे आढळा धरण पूर्ण क्षमतेने भरलेले नाही. शिवाय पावसाअभावी या भागातील पिके वाया गेलेली आहे.

जनावरांच्या चाऱ्याचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे. त्यामुळे दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी मीनानाथ पांडे, गिरजाजी जाधव, रामनाथ वाकचौरे, रावसाहेब वाकचौरे, अंजना बोंबले, सुनील दातीर, अरुण शेळके, बाबासाहेब उगले, अंबादास दातीर, रमेश वाकचौरे, जालिंदर आंबरे, बबन वाकचौरे, विठ्ठल उगले, शरद वाकचौरे, जनार्दन आंबरे, देवराम वाकचौरे, आर. के. उगले, अशोक उगले, अरुण नाईकवाडी, सुधाकर उगले, विठ्ठल कुमकर, अनिल वाकचौरे, रामदास आंबरे, संतोष आंबरे, अब्दुल इनामदार यांच्यासह शेतकऱ्यांनी निवेदन देऊन केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com