agriculture news in marathi, drought situation continue, nagar, maharashtra | Agrowon

नगर जिल्ह्यात ऐन पावसाळ्यातही दुष्काळाचे संकट कायम
टीम अॅग्रोवन
बुधवार, 17 जुलै 2019

जिल्ह्यासह शेवगाव तालुक्यात यंदा अजूनही पाऊस नाही. आता महिना उलटला तरी पाऊस नसल्याने खरिपाची पिके अडचणीत येत आहेत. त्याचा परिणाम यंदाच्या हंगामावर होणार आहे. गेल्या वर्षीच्या दुष्काळातून अजून शेतकरी सावरले नाहीत. मात्र, अजूनही पाऊस नसल्याने संकट कायम आहे.
- संदीप भागवत, शेतकरी, एरंडगाव, ता. शेवगाव, जि. नगर.

नगर  ः दुष्काळाने होरपळ झालेल्या नगर जिल्ह्यात यंदा पावसाळ्याचा सव्वा महिना उलटून गेला, तरी अजूनही दुष्काळाचे संकट कायम आहे. अकोले तालुक्याचा पश्चिम भाग वगळला, तर अजूनही जिल्ह्यातील बहुतांश भागात पुरेसा पाऊस नाही. त्याचा गंभीर परिणाम यंदाही खरीप पेरणीवर झाला आहे. आतापर्यंत सरासरीच्या तुलनेत ३५.६२ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. 

जिल्ह्यात गेल्या वर्षी पुरेसा पाऊस झाला नसल्याने खरीप आणि रब्बी हंगामाला मोठा फटका बसला होता. तीच परिस्थिती यंदाही होते की काय, अशी शंका आता निर्माण होऊ लागली आहे. जिल्ह्यामध्ये खरिपाचे सरासरी क्षेत्र ४ लाख ७८ हजार ६३८ हेक्टर आहे. त्या तुलनेत आतापर्यंत केवळ १ लाख ७० हजार ५११ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

यंदा आतापर्यंत पेरणीची टक्केवारी ३५.६२ आहे. गेल्या काही दिवसांत ज्या भागांत पेरणी झाली, तेथेही पाऊस गायब झाला असून, सध्या फक्त सोसाट्याचा वारा वाहतो आहे. त्यामुळे उगवलेले कोंब सुकू लागले आहेत. अजून काही दिवस पाऊस आला नाही, तर दुबार पेरणीचे संकट उद्भवणार असल्याने शेतकरी चिंतेत आहेत.  

चार तालुक्यांत पंचवीस टक्क्यांपेक्षा कमी पाऊस 
जिल्ह्यात गेल्या महिनाभराच्या तुलनेत अजूनही श्रीरामपूर, नगर, शेवगाव, कर्जत या चार तालुक्यांत पंचवीस टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे या तालुक्यात खरीप पेरण्यांचे प्रमाण अल्प आहे. याशिवाय अकोले तालुक्यातील ९० टक्के, तर संगमनेरमध्ये ५४ टक्के पावसाची सरासरी वगळता अन्य तालुक्यांत पावसाची टक्केवारी चाळीस टक्क्‍यांच्या आतच आहे.

जिल्ह्याचा विचार करता आतापर्यंत ३३ टक्के पाऊस झाला आहे. गेल्या वर्षी आजपर्यंत ३८ टक्के पाऊस झाला होता. सरासरीच्या तुलनेत यंदा प्रशासनाकडे काही भागात चांगला पाऊस झाला असल्याची नोंद असली, तरी एकाच वेळी तो न झाल्याने ओलावा झाला नाही. त्यामुळे पेरण्या करता आल्या नाहीत. 
 

सरासरी क्षेत्र (कंसात पेरणी झालेले क्षेत्र) भात ः ७८८३ (२२४), बाजरी ः १,८२,६३१ (४२,२००), रागी ः २९१२ (१९५), मका ः ५३,१४१ (१७,६२९), इतर तृणधान्ये ः ११,८७८ (१४८), तूर ः १२,०१८ (१३,०३७), मूग ः ९२५८ (९२५४), उडीद ः ८२२० (९३२३), इतर कडधान्य ः १०,१३३ (१९६२), भुईमूग ः ४४२० (१४३६), तीळ ः ४५७ (८४), कारळे ः ३६०५ (३१८), सोयाबीन ः ५८,२८२ (१४,२५५), इतर तेलबिया ः ५१४८(०), कापूस ः १,०५,४२७ (६०,४४१).
 

इतर ताज्या घडामोडी
वांग्यावरील शेंडा व फळे पोखरणाऱ्या...वांगी पिकामध्ये येणाऱ्या शेंडा व फळे पोखरणारी...
पूरस्थितीतील द्राक्ष बागेचे व्यवस्थापनसां गली, कोल्हापूर व कर्नाटक शेजारील काही भागांत...
अकोल्यातील प्रकल्पात अत्यल्पच साठाअकोला : यंदाच्या पावसाळ्याचे सुमारे अडीच महिने...
सांगलीत गूळ ३३०० ते ४४०० रुपये...सांगली : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी...
अकोला जिल्ह्यात ६० हजार हेक्टर क्षेत्र...अकोला ः यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात असमतोल...
सिंधुदुर्गात कालव, जिताडा मस्त्यबीज...मुंबई : राज्यात सागरी उत्पादनवाढीस...
ठिबकला ८० टक्के अनुदान; आंदोलनाला...भोसे, जि. सोलापूर : राज्य शासनाने कोरडवाहू...
मांडाखळीत संत्रा बागांत फळगळपरभणी : कमी पाण्यामुळे जमिनीमध्ये ओलाव्याची...
रश्‍मी बागल यांचा शिवसेनेत प्रवेशसोलापूर : जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसची...
माशांच्या पाच नव्या जातींचा घेतला शोध अरुणाचल प्रदेश राज्यातील इटानगर येथील राजीव गांधी...
कोल्हापुरात मोहीम स्वरूपात पंचनाम्यास...कोल्हापूर: महापुराच्या प्रलयानंतर आता...
सांगली जिल्हा बॅंकेच्या १२ शाखांचे...सांगली   ः महापुराचा फटका शेती आणि...
एकात्मिक शेती पद्धत वापरासाठी ‘कृषी’...मुंबई  : पीक उत्पादन वाढून शेतकऱ्यांचे...
पूरग्रस्तांसह अतिवृष्टीत पिके...कोल्हापूर   : पूरग्रस्तांसह अतिवृष्टीत...
युतीतील अनेक जण आमच्या संपर्कात ः अजित...यवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आणि...
मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन शरद पवार...मुंबई  ः कोल्हापूर, सांगली, सातारा या...
खानदेशात शेतीकामात मजूरटंचाईजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व...
पोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्यविटा, जि. सांगली : पोल्ट्रीधारकांना...
नाशिक जिल्ह्यात पावसामुळे पूर्वहंगामी...नाशिक : संततधार सुरू असलेल्या पावसामुळे...
नांदेड जिल्ह्यात पीककर्जाचे ७३ हजारांवर...नांदेड : चालू आर्थिक वर्षाच्या (२०१९-२०) पहिल्या...