नवी दिल्ली ः दिल्लीच्या सीमांवर कृषी कायद्यांविरोधात मागील ५६ दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या
ताज्या घडामोडी
पुणे विभागात पाणीटंचाई वाढण्याची शक्यता
पुणे : सप्टेंबर महिन्याच्या सुरवातीपासून पुणे विभागातील बहुतांशी भागात पावसाने उघडीप दिली आहे. पुणे, सातारा जिल्ह्यांतील कोरडवाहू पट्ट्यात पावसाने दडी मारल्याने पाणीटंचाई कायम आहे. पुण्यातील बारामती आणि साताऱ्यातील माण तालुक्यात पाणीटंचाई वाढत असून, पुढील काळात इतरही भागात टंचाई वाढण्याची शक्यता आहे. पुणे, साताऱ्यातील १७ गावे ९३ वाड्यांमध्ये पाणीटंचाई भासत असून, पाणीपुरवठ्यासाठी १५ टॅंकर सुरू असल्याची माहिती विभागीय आयुक्त कार्यालयातर्फे देण्यात आली.

जून ते आॅगस्ट या तीन महिन्यांच्या कालावधीत पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांच्या पश्चिम भागातील सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर पावसाची संततधार सुरू असल्याने सर्वच धरणे आेव्हर फ्लो झाली. त्याचवेळी पुणे, सातारा जिल्ह्यांच्या पूर्व भागासह सोलापूर, सांगली जिल्ह्यांच्या अनेक भागात पावसाची उघडीप होती. हलक्या सरी पडल्या तरी त्याचा भूजल पातळी वाढीसाठी फारसा उपयाेग झाला नाही. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत कोरडेच असल्याने पूर्व भागातील या कोरडवाहू पट्ट्यात पाणीटंचाई कमी झालीच नाही.
पुणे आणि सातारा जिल्ह्यातील बारामती, दौंड, खटाव आणि माण या तालुक्यांमध्ये पाणीटंचाई भासत आहे. पुणे जिल्ह्यातील ४ गावे ३६ वाड्यांना ५ टॅंकरने, तर साताऱ्यातील १३ गावे ५७ वाड्यांमध्ये १० टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. या चार तालुक्यांतील सुमारे २८ हजार लोकसंख्येची तहान टॅंकरच्या पाण्यावर भागात आहे. सांगली, सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यांत पाणीटंचाई भासत नसली तरी पावसाने ओढ दिलेल्या भागात पुढील काळात टंचाई वाढण्याची शक्यता आहे.
तालुके | गावे | वाड्या | टॅंकर |
बारामती | २ | २५ | ३ |
पुरंदर | १ | ७ | १ |
दौंड | १ | ४ | १ |
खटाव | ३ | ३ | ३ |
माण | १० | ५४ | ७ |