राज्यातील ७ जिल्ह्यांमध्ये अद्यापही पाणीटंचाई

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे : दुष्काळाने होरपळत असलेल्या भागात गेल्या महिनाभरात दमदार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे टंचाईग्रस्त भागाला दिलासा दिला असून, पाणीटंचाई कमी होण्यास सुरवात झाली आहे. मात्र अद्यापही मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या काही भागांत पाणीटंचाई भासत आहे. राज्यातील ७ जिल्ह्यांतील ३०३ गावे, ५९२ वाड्यांमध्ये लोकांची तहान भागविण्यासाठी ४५९ टॅंकर धावत असल्याचे राज्याच्या पाणीपुरवठा विभागातर्फे सांगण्यात आले. 

मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रातील नगर जिल्ह्यात पाणीटंचाई कायम असल्याचे चित्र आहे. पश्चिम विदर्भातील बुलडाण्यातही एक गावात टॅंकरने पाणी पुरवठा करावा लागत आहे. मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात सर्वाधिक ११६ गावे ४० वाड्यांना २८८ टॅंकरने पाणी देण्यात येत आहे. उस्मानाबाद आणि औरंगाबाद जिल्ह्यात अनुक्रमे ३२ आणि ३४ टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. मध्य महाराष्ट्रातील नगर जिल्ह्यातील ९८ गावे, ४८७ वाड्यांमध्ये १४० टॅंकर सुरू आहेत. त्या खालोखाल सोलापूर जिल्ह्यात १९ गावे, १० वाड्यांमध्ये १९ टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

सांगली, सोलापूर जिल्ह्यांतही कमी अधिक पाणीटंचाई भासत आहे. कोकण, नागपूर विभागातील पाणीटंचाई दूर झाली आहेत. नाशिक विभागातील नगर आणि अमरावती विभागातील बुलडाणा वगळता उर्वरित जिल्ह्यात पाणीटंचाई कमी झाली आहे. पुणे आणि औरंगाबाद विभागातील काही जिल्ह्यांमध्ये अद्यापही पाणीटचांई कायम आहे. मराठवाडा विभागात सर्वाधिक १८० गावे आणि ४२ वाड्यांना, नाशिक विभागातील ९८ गावे ४८६ वाड्यांना, तर पुणे विभागातील २४ गावे आणि ६३ वाड्यांना टॅंकरने पाणी द्यावे लागत आहे. 

राज्यातील पाणीटंचाईची विभानिहाय स्थिती 
विभाग गावे वाड्या टॅंकर
उत्तर महाराष्ट्र ९८ ४८७ १४०
पश्चिम महाराष्ट्र २४ ६३ २४
मराठवाडा १८० ४२ २८७
पश्चिम विदर्भ
एकूण ३०३ ५९२ ४५९ 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com