जनावरांची तडफड, लोकांचा पाण्यासाठी टाहो

चारा छावण्यांना मंजुरी तातडीने दिल्या पाहिजेत, पण मुळात छावणीपेक्षा दावणीला चारा देणे खूप सोईचे आहे. शेतकऱ्यांची वणवण आणि जनावरांचीही दगदग त्यामुळे थांबेल. - उदय नान्नजकर, शेतकरी, पानमंगरूळ, ता. अक्कलकोट
सोलापूर दुष्काळ
सोलापूर दुष्काळ

सोलापूर ः राज्य शासनाने दुष्काळ जाहीर करून जवळपास साडेतीन महिन्यांचा कालावधी उलटला; पण सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळाबाबत प्रशासन अद्यापही गंभीर नसल्याचे दिसून येते. जनावरांची चारा-पाण्यासाठी नुसती तडफड सुरू आहे, तर पिण्याच्या पाण्यासाठी लोकांच्या हातपंपांसह आड, विहिरींवर रांगा दिसत आहेत. प्रशासनाच्या लेखी प्रस्ताव, मागणी यात हा दुष्काळ अडकला आहे, तर मंत्र्यांचा दिवस केवळ बैठकांचा फार्स आणि भाषणबाजीने पुढे ढकलला जातो आहे. प्रत्यक्ष कृती मात्र शून्य आहे.

सोलापूर जिल्हा हा रब्बीचा म्हणून ओळखला जातो, हंगामातील उशिराचा पाऊस हा जिल्ह्यासाठी फायदेशीर ठरतो, पण गतवर्षी केवळ ३८ टक्के पाऊस झाल्याने खरीप तर गेलाच, रब्बीही हातचा गेला. त्यामुळे अॅाक्टोबर महिन्यापासूनच दुष्काळाच्या झळा जिल्ह्याला बसू लागल्या आहेत. त्यात वरचेवर वाढच होत आहे. गेल्या आठवडाभरापासून थंडीत चढ-उतार होत असला, तरी दिवसभर उन्हाचा कडाकाही तेवढाच वाढत आहे. तशी दुष्काळाची दाहकता आणखीनच तोंड वर काढत आहे. त्यातही पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या चाऱ्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. शंभराहून अधिक टँकरची मागणी आहे, पण प्रशासनाने आतापर्यंत जिल्ह्यात ४२ टँकर सुरू केले आहेत. पण त्याहूनही अधिक मागणी होते आहे. त्यासाठी गावातील पाण्याचे अन्य स्रोत, त्यासाठीचे मागणी प्रस्ताव, त्याची पडताळणी यामध्ये ते अडकले आहेत. 

मंत्र्यांकडून बैठका, भेटीचा फार्स गेल्या पंधरवड्यात आणि त्या आधीही जिल्हा स्तरावर पालकमंत्री विजयकुमार देशमुख, सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी टंचाईच्या किमान पाच-सहा बैठका घेतल्या, पण कृतिशून्य राहिली. पालकमंत्री विजयकुमार देशमुख हे तर गेल्या दोन दिवसांपासून मंगळवेढा, माळशिरस या भागात दुष्काळी दौरे करत फिरत आहेत. त्यात त्यांनी नुसती भाषणबाजी सुरू केली आहे, दुष्काळाने खचू नका, परिस्थितीवर मात करा, असे उपदेशाचे डोस पाजले. पण हेच उपदेशाचे डोस जर त्यांनी तातडीने उपाय करण्यासाठी प्रशासनाला पाजले असते, तर त्यांना गावोगाव फिरण्याची गरज भासली नसती.  एकही चारा छावणी नाही मंगळवेढा, सांगोला, अक्कलकोट भागातील जनावरांच्या चाऱ्याचे चित्र फारच गंभीर आहे. या भागात सध्या जनावरांची चारा-पाण्यासाठी नुसती तडफड सुरू आहे. चार वर्षांपूर्वी महाराष्ट्रात चारा छावण्यातील जनावरांची संख्या चार लाखापर्यंत होती, त्यात सर्वाधिक एक लाख जनावरे एकट्या सांगोल्यातील छावणीत होती, आजही तेवढीच किंबहुना त्यापेक्षा जास्त जनावरांना चाऱ्याची गरज आहे. चारा छावण्यासाठी सांगोल्यातून १३ प्रस्ताव प्रलंबित आहेत, तर मंगळवेढ्यातून ८ प्रस्ताव तहसीलला पोचले आहेत. पण त्यापैकी काही नियम-अटीत अडकलेत, तर काही जिल्हा स्तरावर मंजुरीसाठी पाठवल्याचे सांगण्यात येते. पण त्याच्या मंजुरीला अद्यापही मुहूर्त मिळालेला नाही. पण यामध्ये मुक्या जनावरांची मात्र तडफड सुरूच आहे.  दुष्काळाचे राजकारण की खरेच निवारण? गेल्या आठवड्यात युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी प्रत्यक्ष कृती करत शेतकऱ्यांना पशुखाद्य आणि पाण्यासाठी टाक्या देऊन मदत केली. मनसेने ठिया आंदोलन करून लक्ष वेधले. तर राष्ट्रवादी काँग्रेसने जवाब दो आंदोलन करून औपचारिकता पूर्ण केली. तर शेकापने राष्ट्रवादीच्या साह्याने सांगोल्यात दुष्काळी परिषद भरवली. पण त्यात शेतीप्रश्नापेक्षा लोकसभेच्या उमेदवारीवरच सर्वाधिक चर्चा रंगली. या सगळ्या घटनाक्रमावरून हे सगळे प्रयत्न, खरेच दुष्काळाचे निवारणासाठी की राजकारणासाठी, हा प्रश्न मात्र चर्चेला आला. फळबागांची होरपळ​ मंगळवेढा, सांगोला, अक्कलकोट भागातील जनावरांच्या चाऱ्याचे चित्र फारच गंभीर आहे. या भागात सध्या जनावरांची चारा-पाण्यासाठी नुसती तडफड सुरू आहे. चार वर्षांपूर्वी महाराष्ट्रात चारा छावण्यातील जनावरांची संख्या चार लाखापर्यंत होती, त्यात सर्वाधिक एक लाख जनावरे एकट्या सांगोल्यातील छावणीत होती, आजही तेवढीच किंबहुना त्यापेक्षा जास्त जनावरांना चाऱ्याची गरज आहे. चारा छावण्यासाठी सांगोल्यातून १३ प्रस्ताव प्रलंबित आहेत, तर मंगळवेढ्यातून ८ प्रस्ताव तहसीलला पोचले आहेत. पण त्यापैकी काही नियम-अटीत अडकलेत, तर काही जिल्हा स्तरावर मंजुरीसाठी पाठवल्याचे सांगण्यात येते. पण त्याच्या मंजुरीला अद्यापही मुहूर्त मिळालेला नाही. पण यामध्ये मुक्या जनावरांची मात्र तडफड सुरूच आहे.  प्रतिक्रिया दुष्काळावर उपायासाठी सरकार अजून वाटच पाहते आहे. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न आहे, फळबागा जळून चालल्या आहेत. शेतकऱ्यांनी कोणाकडे दाद मागावी, आमच्या ४४ गावांच्या पाण्यासाठी रस्तावर उतरुन आंदोलन केले, पण प्रशासनाला ना मंत्र्यांना त्याची फिकीर करूनही आम्ही आता थकलो आहोत. - अंकुश पडवळे,  शेतकरी तथा निमंत्रक, कोरडवाहू दुष्काळ गावे समिती, खुपसंगी, ता. मंगळवेढा 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com