नगर जिल्ह्यात दक्षिणेत दुष्काळ अन्‌ उत्तरेत सुकाळ

नगर जिल्ह्यात दक्षिणेत दुष्काळ अन्‌ उत्तरेत सुकाळ
नगर जिल्ह्यात दक्षिणेत दुष्काळ अन्‌ उत्तरेत सुकाळ

नगर ः उत्तरेतील भंडारदरा, मुळा, निळवंडे, आढळा धरणे तुडुंब भरली. मात्र, दक्षिणेतील मांडओहोळ, खैरी, सीना, घाटशीळ प्रकल्पांत अत्यल्प पाणी आहे. उत्तरेत पावसाने सरासरी ओलांडली. मात्र, दक्षिण पट्ट्यातील तालुक्‍यांत म्हणावे तसे पर्जन्यमान नाही.

चाराछावण्या, टॅंकरफेऱ्या भरपावसाळ्यातही सुरूच आहेत. हस्त नक्षत्राच्या उत्तरार्धात काही ठिकाणी चांगली बरसात झाली, तरीही ती सर्वत्र नाही. दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. 

गतवर्षी पावसाने हात आखडता घेतल्याने खरीप व रब्बीचा पेरा बुडाला. गावतळी, बंधारे आणि विहिरी कोरड्या पडल्या. पशुधन जगविण्यासाठी शेतकऱ्यांचा संघर्ष सुरू झाला. सरकारने २५ जानेवारीला चाराछावण्या सुरू करण्याची घोषणा केली. फेब्रुवारीपासून चार महिन्यांच्या कालावधीत जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी ५११ छावण्यांना मंजुरी दिली. त्यांपैकी ५०४ चाराछावण्या सुरू झाल्या होत्या. त्यात साडेतीन लाख पशुधन दाखल होते. पुष्य, आर्द्रा, उत्तरा, हस्त नक्षत्रात पाऊस झाल्याने आजअखेर ४८१ छावण्यांचा तळ मोडला आहे. मात्र, आजही कर्जत तालुक्‍यात २३ छावण्या सुरू आहेत. त्यात १२ हजार ४०६ पशुधन दाखल आहे. तीच परिस्थिती टॅंकरबाबत आहे. यंदा टॅंकरची संख्या ‘रेकॉर्ड ब्रेक’ ८७३ होती. 

टॅंकरच्या फेऱ्या सुरूच  आजअखेर जिल्ह्यातील पाथर्डी, कर्जत, जामखेड तालुक्‍यांत पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी प्रशासनाचे १६० टॅंकर सुरू आहेत. १३१ गावे, ५६६ वाड्या-वस्त्यांवरील दोन लाख ६१ हजार ८९४ नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. मागील वर्षी आजच्या तारखेस पावसाची सरासरी ६९.३२ होती. यंदा जिल्ह्यात झालेल्या पावसाची सरासरी ११२.८२ इतकी आहे. दक्षिणेत मात्र वानवा आहे. 

या गावांत छावण्या सुरूच  खांडवी, बाभूळगाव, चांदे बुद्रुक (दोन), नागापूर, मुळेवाडी, मिरजगाव (दोन), खुरंगेवाडी, कोकणगाव, घुमरी, निमगाव गांगर्डे, कापरेवाडी, मलठण, तरडगाव, नवसरवाडी, कौंडाणे, परीटवाडी, बिटकेवाडी, जळगाव, रेहकुरी, आनंदवाडी, तोरकडवाडी.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com