Agriculture news in marathi Drought spike in Jat East | Agrowon

जत पूर्व भागात दुष्काळाच्या झळा वाढल्या

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 10 एप्रिल 2020


सांगली : जत पूर्व भागात दुष्काळाच्या  झळा वाढू लागल्या आहेत. उन्हाचा पारा ३५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला आहे.  संख, दरीबडची, अंकलगी, सोन्याळ, सिध्दनाथ परिसरात पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. 

सांगली : जत पूर्व भागात दुष्काळाच्या  झळा वाढू लागल्या आहेत. उन्हाचा पारा ३५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला आहे. त्याची तीव्रता वाढत आहे. कमी झालेला पाऊस, परतीच्या अवकाळी पावसाने दिलेली दडी, कोरड्या पडलेल्या कूपनलिका, घटलेली पाण्याची पातळी, वाढत्या उन्हाची तीव्रता, यामुळे पूर्व भागातील संख, दरीबडची, अंकलगी, सोन्याळ, सिध्दनाथ परिसरात पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. विहिरीच्या पाण्याने तळ गाठला आहे. कूपनलिका, विहीरी कोरड्या पडल्या आहेत. लोकांना संचारबंदी लागू असल्याने बाहेर पडता येत नाही. पाण्यासाठी हाल होत असून द्राक्षबागांना टँकरने पाणी पुरविले जात आहे. 

तालुक्यात ‘कोरोना’च्या संकटाबरोबर दुष्काळाच्या झळा वाढत आहेत. यंदा परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावली. परंतु पूर्व भागातील संख , माडग्याळ, दरीबडची, सोन्याळ, उटगी, जाडरबोबलाद, गुड्डापूर, व्हस्पेठ, कुलाळवाडी, सिध्दनाथ, अंकलगी, गोंधळेवाडी, जालिहाळ खुर्द, आसंगी(जत), तिल्याळ, लमाणतांडा (दरीबडची लकडेवाडी, कुलाळवाडी या १७ गावांत पावसाने दडी दिली होती. त्यामुळे या भागात दुष्काळाची तीव्रता जाणवू लागली आहे. 

तालुक्यात या वर्षी समाधानकारक पाऊस झाला. मात्र, गेल्या चार वर्षांपासून जमिनीतील पाण्याची पातळी घटल्याने याचा परिणाम जाणवत आहे. पाण्याअभावी परिसरातील स्त्रोत आटू लागले आहेत. भूगर्भातील पाण्याच्या पातळीत घट झाली आहे. गोंधळेवाडी, अंकलगी, माडग्याळ सोन्याळ येथे पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. अंकलगी, सोन्याळ, गोंधळेवाडी या गावात टँकर सुरु आहेत. पाण्यासाठी ग्रामस्थांना अर्धा-एक किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे. 

दरम्यान, तालुक्यात २०२० मधील १ कोटी ६४ लाख रुपये खर्चाचा टंचाई आराखडा प्रशासनाने तयार केला आहे. यामध्ये जानेवारी ते मार्च महिन्यात १३ गावे ४५ वाड्या-वस्त्यांवर आवश्यकता भासेल. एप्रिल ते जून २० गावे १४४ वाड्या-वस्तीवर पिण्याचे पाणी पुरवावे लागेल, असा अंदाज आहे. माडग्याळ येथील वाड्या-वस्तीवर पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी याची पाहणी केली आहे. टँकर सुरु झाल्यास पाण्याची समस्या दूर होईल. 

डाळिंब, द्राक्ष बागेला पाण्यावर खर्च  

पाण्याची टंचाईमुळे डाळिंब व द्राक्ष बागा संकटात सापडणार आहेत. सध्या डाळिंब, द्राक्ष हंगाम शेवटच्या टप्प्यात आहे. त्यानंतर द्राक्ष बागेची खरड छाटणी सुरू होणार आहे. त्यानंतर पुढील हंगामाच्या फळासाठी द्राक्षाच्या काड्या तयार करणे गरजेचे आहे. त्यासाठी जास्त पाण्याची आवश्यकता भासेल. द्राक्षबागा कशा जगवायच्या ? हा प्रश्न उभा राहिला आहे. काड्या तयार करण्यासाठी टॅंकरने पाणी आणावे लागणार आहे. कूपनलिका, विहीर खुदाईवर शेतकरी खर्च करीत असल्याची स्थिती आहे. 
 


इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात दमदार पाऊस सोलापूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून...
नगर जिह्यात पावसाने पिकांचे अतोनात...नगर  : जिल्ह्याच्या बहुतांश भागात...
सोनी गावामध्ये आहेत २८८ शेततळीसोनी (ता. मिरज,जि.सांगली) या गावात  कृषी...
कर्नाळा बँकेत ३६ ग्रामपंचायतींचे पैसे...मुंबई : ‘शेकाप’चे माजी आमदार विवेक पाटील यांच्या...
मराठवाड्याच्या विकासासाठी शासन कटीबध्द...औरंगाबाद : मराठवाड्याच्या सर्वांगिण विकासासाठी...
केंद्राच्या कांदा निर्यातबंदी विरोधात...नाशिक : केंद्र सरकारने कुणाचीही ओरड नसताना, अन्न...
औरंगाबादमधील नुकसानग्रस्त पिकांचे...औरंगाबाद : ‘‘जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान...
खानदेशातील पपई पिकाला अतिपावसाचा फटकाजळगाव : खानदेशात पपई पिकाला अतिपावसाचा फटका बसला...
नांदेडमध्ये ३८ हजार हेक्टर पिकांचे...नांदेड : अतिवृष्टी व पूरामुळे जिल्ह्यातील ३८१...
‘म्हैसाळ’मधून पावणेदोन टीएमसी पाणी उचललेसांगली  ः कृष्णा नदीला आलेल्या पूराचे पाणी...
कांदा निर्यातबंदीविरूध्द कॉंग्रेसचे...रत्नागिरी : कांदा निर्यातीबाबतचा निर्णय...
मुसळधार पावसामुळे पिके भुईसपाटपुणे ः राज्यातील अनेक भागांत कमीअधिक स्वरूपात...
पानपिंपरी पिकाला विम्याचे कवच द्याअकोला ः जिल्ह्यात पानपिंपरी या वनौषधीवर्गीय...
सीमाभाग आणि बंदरातील कांदा सोडा; अन्यथा...नाशिक : टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर शेजारील...
कोल्हापुरात ‘गोकूळ’चे दूध रोखण्याचा...कोल्हापूर : मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याच्या...
शरद पवार यांनी ऊसतोड कामगारांची कोंडी...नगर ः ऊसतोडणी कामगारांच्या तोडणी दरात वाढ करावी...
फळबाग लागवडीसाठी जमिनीची निवड महत्त्वाचीसामान्यपणे फळबागा अयशस्वी होण्यामध्ये किंवा...
बियाणासाठी घरचे सोयाबीन ठेवताना...बियाण्यासाठी निवड करण्यात आलेल्या प्लॉटमध्ये...
महिला बचत गटांच्या माध्यमातून हळद...सहकाराच्या धर्तीवर संघटित झालेल्या राजापूर...
पुणे जिल्ह्यात दोन लाखावर शेतकऱ्यांना...पुणे : जिल्हा बॅंकेकडून खरीप हंगामासाठी गेल्या...