agriculture news in Marathi, Drought subsidy deposits to two lakh farmers' accounts | Agrowon

परभणी, नांदेड जिल्ह्यात २ लाख खात्यांवर दुष्काळी अनुदान जमा

टीम अॅग्रोवन
बुधवार, 20 फेब्रुवारी 2019

परभणी ः परभणी आणि नांदेड जिल्ह्यातील दुष्काळामुळे बाधित एकूण १ लाख ९४ हजार ३५ शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यांवर ७३ कोटी ७० हजार ६१३ रुपये एवढे अनुदान जमा करण्यात आले. या संदर्भात महसूल विभागाच्या सूत्रांनी माहिती दिली.

गतवर्षी (२०१८) च्या खरीप हंगामामध्ये दुष्काळामुळे बाधित परभणी आणि नांदेड जिल्ह्यातील एकूण ७८५ गावांतील ४ लाख ३१ हजार १३५ शेतकऱ्यांना मदत वितरित करण्यासाठी अनुक्रमे २६२ कोटी ५६ लाख रुपये आणि १२५ कोटी ७६ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. 

परभणी ः परभणी आणि नांदेड जिल्ह्यातील दुष्काळामुळे बाधित एकूण १ लाख ९४ हजार ३५ शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यांवर ७३ कोटी ७० हजार ६१३ रुपये एवढे अनुदान जमा करण्यात आले. या संदर्भात महसूल विभागाच्या सूत्रांनी माहिती दिली.

गतवर्षी (२०१८) च्या खरीप हंगामामध्ये दुष्काळामुळे बाधित परभणी आणि नांदेड जिल्ह्यातील एकूण ७८५ गावांतील ४ लाख ३१ हजार १३५ शेतकऱ्यांना मदत वितरित करण्यासाठी अनुक्रमे २६२ कोटी ५६ लाख रुपये आणि १२५ कोटी ७६ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. 

परभणी जिल्ह्यातील परभणी, सेलू, मानवत, पाथरी, सोनपेठ, पालम या ६ तालुक्यांतील ४७९ गावांतील २ लाख ६४ हजार ३६ शेतकऱ्यांच्या ३ लाख ४३ हजार ५८६ हेक्टरवरील जिरायती आणि बहुवार्षिक पिकांचे दुष्काळामुळे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले. दुष्काळ बाधित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मंजूर अनुदानापैकी एकूण १०७ कोटी ५४ लाख ४६ हजार रुपये निधी जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाला. एकूण दुष्काळी गावांपैकी ३०३ गावांतील १ लाख २१ हजार ७६२ शेतकऱ्यांच्या याद्या तयार करण्यात आल्या. पात्र शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यांवर ४८ कोटी ४६ लाख ५४ हजार रुपये (४५.०७ टक्के) अनुदान जमा करण्यात आले. 

यामध्ये परभणी तालुक्यातील २७ हजार ८४१ शेतकऱ्यांच्या खात्यांवर ११ कोटी ११ लाख ५ हजार रुपये, सेलू तालुक्यातील २३ हजार ८४० शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यांवर १० कोटी ४७ लाख रुपये, मानवत तालुक्यातील १७ हजार ४०७ शेतकऱ्यांच्या खात्यांवर ७ कोटी २० लाख ५३ हजार रुपये, पाथरी तालुक्यातील १९ हजार ५२९ शेतकऱ्यांच्या खात्यांवर ७ कोटी २० लाख ३७ हजार रुपये, सोनपेठ तालुक्यातील १७ हजार ६०० शेतकऱ्यांच्या खात्यांवर ७ कोटी १ लाख ९८ हजार रुपये, पालम तालुक्यातील १५ हजार ५४५ शेतकऱ्यांच्या खात्यांवर ५ कोटी ४५ लाख ६१ हजार रुपये अनुदान जमा करण्यात आले.

नांदेड जिल्ह्यातील देगलूर, मुखेड, उमरी या तीन तालुक्यांतील ३०६ गावांतील १ लाख ६७ हजार ९९ शेतकऱ्यांच्या १ लाख ५३ हजार ६८६ हेक्टरवरील मिळून जिरायती आणि बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीबद्दल एकूण १२५ कोटी ७६ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यापैकी ५१ हजार ५१ लाख १२ हजार ९६० रुपये एवढा निधी प्राप्त झाला आहे. आजवर एकूण ७२ हजार २७३ शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यांवर २५ कोटी ५४ लाख  १६ हजार ६१३ रुपये एवढे अनुदान जमा करण्यात आले आहेत.


इतर ताज्या घडामोडी
सोलापुरात नुसताच सोसाट्याचा वारा सोलापूर  ः निसर्ग चक्रीवादळामुळे मुंबई,...
कर्जमाफीच्या लाभार्थ्यांना तत्काळ पीक...परभणी : ‘‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
नाशिक जिल्ह्यातील ६५० विद्युत खांब...नाशिक : जिल्ह्यात जोरदार पाऊस आणि वादळी वाऱ्यासह...
जालन्यात कृषी विभागाच्या बांधावर खत...जालना : एकाच दिवशी शेतकऱ्यांना थेट बांधावर खत...
‘निसर्ग’च्या नुकसानग्रस्तांना...नाशिक : निसर्ग चक्रीवादळामुळे राज्यासह जिल्ह्याला...
अकलूजच्या शिवामृतकडून गाईच्या दूधाला २५...अकलूज, जि. सोलापूर : अकलूज येथील शिवामृत दूध...
सोलापूर जिल्ह्यात १३ टँकरद्वारे...सोलापूर : जिल्ह्यात आतापर्यंत ४० गावांमध्ये १३...
पीककर्ज द्या, वीजबिल माफ करा,...सोलापूर  ः शेतकऱ्यांची कर्जमाफी प्रक्रिया...
जालन्यात सव्वा लाख क्विंटलवर कापूस...जालना : जिल्ह्यात कापूस खरेदीची एकूण ८...
औरंगाबाद जिल्ह्यात मॉन्सूनपूर्व कपाशी...औरंगाबाद : जिल्ह्यात येत्या खरीप हंगामात...
पुणे बाजार समितीत शेतीमालाची आवक तुरळकचपुणे  ः ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर सुरु...
निसर्ग चक्रीवादळामुळे पुणे जिल्ह्यात...पुणे  ः निसर्ग चक्रीवादळ आणि अति पावसाचा...
नुकसानग्रस्तांना मदतीबाबत योग्य तो...पुणे  ः निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड आणि पुणे...
मंजुर येथील बंधाऱ्याचा भराव पहिल्याच...नगर  ः मंजुर (ता.कोपरगाव) येथील कोल्हापुर...
जत तालुक्‍याच्या पूर्व भागात चारा टंचाईसांगली  ः पावसाने दिलेली दडी, वाया गेलेला...
भुईबावडा परिसरातील तीन गावांना ...सिंधुदुर्ग ः जिल्ह्यातील भुईबावडा (ता.वैभववाडी)...
निसर्ग चक्रीवादळामुळे रत्नागिरी...रत्नागिरी  : निसर्ग चक्रीवादळामुळे झालेले...
अकोल्यात कंटेनमेंट झोन वाढणार नाहीत...अकोला  ः अकोल्यात कोरोना बाधितांची वाढत...
कर्नाटकी बेंदुरावर कोरोनाचे सावटकोल्हापूर:  कर्नाटकी बेंदूर उद्या (ता.७)...
अटींवरच शेतकऱ्यांना वर्ध्यात कापूस...वर्धा  ः वर्धा जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या...