agriculture news in marathi, Drought unemployment, increase in migration | Agrowon

गेल्या चार वर्षापासून दुष्काळ आहे...
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 7 डिसेंबर 2018

अमळनेर, जि. जळगाव : गेल्या चार वर्षापासून दुष्काळ आहे. पेरणी केली की पाऊस नसतो. दुबार, तिबार पेरणी करावी लागते. काहीच पिकत नाही. त्यामुळे कर्ज फेडू शकत नाही. चारा आणि पाणी नाही. पशुधन वाऱ्यावर सोडण्याची वेळ आली आहे, अशा व्यथा शेतकऱ्यांनी दुष्काळी पाहणीसाठी आलेल्या केंद्रीय पथकासमोर मांडल्या.

अमळनेर, जि. जळगाव : गेल्या चार वर्षापासून दुष्काळ आहे. पेरणी केली की पाऊस नसतो. दुबार, तिबार पेरणी करावी लागते. काहीच पिकत नाही. त्यामुळे कर्ज फेडू शकत नाही. चारा आणि पाणी नाही. पशुधन वाऱ्यावर सोडण्याची वेळ आली आहे, अशा व्यथा शेतकऱ्यांनी दुष्काळी पाहणीसाठी आलेल्या केंद्रीय पथकासमोर मांडल्या.

जुनोने (ता. अमळनेर, जि.जळगाव) येथे केंद्रीय पथकाने गुरुवारी (ता.६)  भेट देऊन दुष्काळाची पाहणी केली. पथकात जलआयोगाचे संचालक आर. डी. देशपांडे, सहसचिव छवी छा, डिपार्मेंट ऑफ पल्सेसचे संचालक ए. के. तिवारी, एमएनसीएफसीच्या सहायक संचालिका डॉ. शालिनी सक्‍सेना यांचा समावेश होता. त्यांच्यासोबत कृषी सचिव एकनाथ डवले, नाशिक विभागीय आयुक्‍त राजाराम माने, जिल्हाधिकारी किशोर राजेनिंबाळकर, प्रांताधिकारी संजय गायकवाड, तहसीलदार प्रदीप पाटील होते.

सहाशे जनावरांची विक्री
शेतकरी रमेश अमृत पाटील, निंबा नथ्थू धनगर यांच्या शेतात पथकातील सदस्यांनी पाहणी करून माहिती जाणून घेतली. चारा उपलब्ध नसल्याने बाहेरून चारा मागवावा लागत आहे. त्यामुळे आर्थिक झळ सोसावी लागत आहे. पाणी उपलब्ध असलेल्या ठिकाणी जनावरांची सोय करावी लागत आहे. काही जनावरे गोशाळेत पाठविली हेत. सुमारे ६०० जनावरे आतापर्यंत विकली गेली आहेत.

पाण्यासाठी विहीर अधिग्रहित
गावातील पाण्याची समस्या सोडविण्यासाठी बिलखेडा (ता. धरणगाव) येथील विहीर अधिग्रहित आहे. विहिरीत पाणीसाठा असेपर्यंतच गावाची तहान भागेल. त्यानंतर पाण्यासाठी भटकंती होईल. टॅंकरने पाणीपुरवठ्याची आवश्‍यकता भासेल. यासाठी वेळीच उपाययोजना होणे गरजेचे आहे. भर पावसाळ्यात पाच ते सात गावांना टॅंकरने पाणीपुरवठा सुरू होता. सद्यःस्थितीत ८८ ते ९० गावांत टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे, अशी माहिती गटविकास अधिकारी संदीप वायाळ यांनी पथकाला दिली.

रोजगारासाठी परराज्यात स्थलांतर

दुष्काळाने बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. मजुरीसाठी सुमारे २२ कुटुंबे परराज्यात स्थलांतरित झाली आहेत. सुमारे १५० ग्रामस्थ कामासाठी गुजरातमध्ये गेले आहेत. १५ ते २० कुटुंबे ऊसतोडणीसाठी परजिल्ह्यात गेली आहेत. त्यामुळे गाव ओसाड पडले असून, शासनाने गावातच रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांसह ग्रामस्थांनी पथकाकडे केली.

इतर ताज्या घडामोडी
औरंगाबादेत फ्लॉवर १८०० ते ३००० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
सांगली जिल्हा दुष्काळाच्या छायेतसांगली : पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी लोटला...
मराठवाड्यातील २६६ मंडळांमध्ये पाऊसऔरंगाबाद/नांदेड ः मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांतील ६३...
पावसाच्या आगमनाने नाशिकमधील शेतकरी...नाशिक : जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने...
पशुसंवर्धन विकासासाठी ७०० कोटींचा निधी...कोल्हापूर  : राज्यातील पशुसंवर्धन विकासाला...
मराठवाड्यातील पावणेनऊ लाखांवर शेतकरी...औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील...
विद्यार्थी, शेतकरीप्रश्नी ‘स्वाभिमानी’...बुलडाणा  : जिल्ह्यातील शेतकरी अनेक समस्यांना...
बारामतीत मुसळधार पाऊसपुणे  : जिल्ह्याच्या कोरडवाहू भागात असलेल्या...
नगर जिल्ह्यातील सहा महसूल मंडळांत...नगर : जिल्ह्यातील ३५ महसूल मंडळांत शनिवारी जोरदार...
कोणत्याही तंत्रज्ञानाचा डोळस स्वीकार...औरंगाबाद   : कोणत्याही तंत्रज्ञानाचा...
विधानसभा निवडणुकीत महायुतीने  २२० जागा...मुंबई  : आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीने...
सोलापूर जिल्ह्यात १७ हजार हेक्टर...सोलापूर ः गेल्या दोन वर्षांपासून सोलापूर जिल्हा...
नाशिक जिल्ह्यातील ४१ हजार हेक्टरवरील...नाशिक : जिल्ह्यात लष्करी अळीचा प्रादुर्भाव...
मराठवाड्यात ४१ हजार हेक्टरवरील मक्यावर...औरंगाबाद : अमेरिकन लष्करी अळीने औरंगाबाद व जालना...
सांगली जिल्ह्यात अमेरिकन लष्करी अळीने...सांगली ः जिल्ह्यात मक्यावर अमेरिकन लष्करी अळीचा...
लष्करी अळीच्या प्रादुर्भावाने नगर...नगर   ः गेल्या वर्षभरात दुष्काळाशी...
मोताळा, देऊळगावराजा तालुक्यात शंभर...बुलडाणा : खरिपात विदर्भात मका उत्पादनात...
साताऱ्यात अकराशे हेक्टरवरील मका पिकावर...सातारा : जिल्ह्यातील पूर्व भागात दुष्काळाची...
इंदापूर तालुक्यात अडीचशे हेक्टरवर...पुणे   ः गेल्या काही दिवसांपासून...
गुलटेकडीत टोमॅटोचे आवकेसह दरही वाढलेपुणे ः गेल्या आठ दिवसांत पावसाने दिलेल्या...