agriculture news in marathi drumstick leaves Nutritious fodder for goats | Agrowon

शेळ्यांसाठी पौष्टिक चारा - शेवगा पाला

डॉ. सं. सि. कदम, डॉ. ग. म. गादेगावकर
बुधवार, 27 मे 2020

शेळीपालन व्यवसायाचे यश हे मुख्यत्त्वे वापरलेल्या पशुखाद्य व वैरणीच्या प्रकारावर अवलंबून असते. पारंपारिक शेळीपालनामध्ये फिरून उपलब्ध असलेल्या कोणत्याही झाडपाल्यावर शेळ्यांची उपजिविका केली जाते.  पशुपालकांनी आपल्या पाळीव प्राण्यांसाठी आवश्यक पोषण मुल्ये पुरवणाऱ्या चारा व वृक्षांची लागवड करणे फायदेशीर ठरते.

शेळीपालन व्यवसायाचे यश हे मुख्यत्त्वे वापरलेल्या पशुखाद्य व वैरणीच्या प्रकारावर अवलंबून असते. पारंपारिक शेळीपालनामध्ये फिरून उपलब्ध असलेल्या कोणत्याही झाडपाल्यावर शेळ्यांची उपजिविका केली जाते.  पशुपालकांनी आपल्या पाळीव प्राण्यांसाठी आवश्यक पोषण मुल्ये पुरवणाऱ्या चारा व वृक्षांची लागवड करणे फायदेशीर ठरते.

शेळीपालन व्यवसायाचे यश हे मुख्यत्त्वे वापरलेल्या पशुखाद्य व वैरणीच्या प्रकारावर अवलंबून असते. पारंपारिक शेळीपालनामध्ये फिरून उपलब्ध असलेल्या कोणत्याही झाडपाल्यावर शेळ्यांची उपजिविका केली जाते. मात्र, त्यातून शेळ्यांच्या योग्य वाढ व उत्पादकतेसाठी आवश्यक पोषण मूल्ये मिळतीलच याची खात्री नसते. शक्यतो पशुपालकांनी आपल्या पाळीवर प्राण्यांसाठी आवश्यक पोषण मुल्ये पुरवणाऱ्या चारा व वृक्षांची लागवड करणे फायदेशीर ठरते. चाऱ्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकेल, अशा शेवगा झाडांची लागवड नक्की करावी. पी.के. एम.१ मोरिंगा ही चाऱ्यासाठी उपयुक्त जात आहे.

शेवग्याची वैशिष्ट्ये

  • शेळ्या, दुधाळ जनावरे आणि मानवी आहारामध्येही शेवगा उपयुक्त आहे. जनावरांसाठी तर हे एक सकस वैरणीचे पीक आहे.
  • जलद वाढ व जमिनीत खोलवर मुळे जात असल्यामुळे हा कमी पाण्यात तग धरणारा वृक्ष आहे.
  • अत्यंत पौष्टिक, तसेच पाने व खोड लुसलुशीत असल्याने जनावरे व शेळ्या त्याचा पाला आवडीने खातात.
  • याच्या वर्षभर अनेक कापण्या मिळतात, त्यामुळे वर्षभर हिरवा चारा उपलब्ध होतो.
  • यामध्ये कोणतेही विषारी घटक नसल्याने शेळ्यांना कोणताही अपाय होत नाही.

शेवग्यातील पोषणमूल्ये (शेकडा प्रमाण)

  • शुष्क पदार्थ १६.६३, कच्ची प्रथिने १५.८२, मेद २.३५, तंतुमय पदार्थ ३५.५४, एकूण रक्षा ७.६१, सिलिका १.०२, खनिजांमध्ये कॅल्शिअम ०.८०, स्फुरद ०.२८, पालाश १.४३, सोडीअम ०.२४.
  • या चार्‍यात जीवनसत्त्व अ, क आणि इ सुद्धा आढळतात, त्यामुळे असा चारा शेळ्यांसाठी व दुधाळ जनावरांसाठी अत्यंत पौष्टिक चारा म्हणून ओळखला जातो.

चाऱ्यासाठी शेवगा लागवडीचे तंत्र
जमीन

वालुकामय पोयट्याची, चांगला निचरा होणारी जमीन निवडावी. जमिनीचा सामू ६.५ ते ८.० इतका असावा. जमिनीची खोली ३० से.मी. पर्यंत असावी. पाणथळ अथवा दलदलीच्या जमिनीत या वृक्षाची लागवड करू नये.

लागवड
कमी ते मध्यम पर्जन्य मानाच्या भागात करावी. या वृक्षाची लागवड पावसाळ्यात सुद्धा करू शकतो. जादा पर्जन्य मानाच्या भागात याची लागवड शक्यतो खरीप हंगामात करू नये. लागवडीपूर्वी शेताची उभी आडवी नांगरणी वखरणी करून घ्यावी. शेत सपाट करून वाफे तयार करून ठेवावेत. जमीन तयार करताना प्रति हेक्‍टरी १० टन शेणखत जमिनीत मिसळून घ्यावे.

पेरणी
३० बाय १० से. मी. अंतरावर ओळीत करावी. पेरणीपूर्वी बियाणे एक रात्र पाण्यात भिजत ठेवल्यास उगवण उत्तम होते.

बीजप्रक्रिया
कार्बेन्डाझीम ५ ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणे चोळावे.

खत व्यवस्थापन
या चारा वृक्षाला प्रति हेक्‍टरी १५० किलो नत्र, ६० किलो स्फुरद, ४० किलो पालाश, ३० किलो गंधक आणि १० किलो झिंक सल्फेट ही खताची मात्रा देण्याची शिफारस आहे. प्रत्येक कापणीनंतर पिकाला हेक्‍टरी ३० किलो नत्र खात द्यावे.

कापणी
या वृक्षाची पहिली कापणी ८५ ते ९० दिवसांनी जमिनीपासून ३० सेंटीमीटर उंचीवर करावी. नंतरच्या कापण्या या साठ दिवसांच्या अंतराने घ्याव्यात.

उत्पादन
वर्षाला १०० ते १२० टन प्रति हेक्‍टरी हिरव्या चाऱ्याचे उत्पादन मिळते.

संपर्क- डॉ. ग. म. गादेगावकर , ९९३०९०७८०६/ ९८६९१५८७६०
(मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय परळ, मुंबई.)


इतर कृषिपूरक
जनावरांमध्ये दिसतोय स्नोअरिंग आजारमराठवाड्यातील काही भागांमध्ये (विशेषतः औंढा...
कोंबड्यांतील रोगप्रसार टाळाआजारी कोंबड्यांच्या व्यवस्थापनासाठी लागणारी भांडी...
विक्रमी दुग्धोत्पादन देणारी ‘जोगन'गायहरियानातील गालीब खेरी (कर्नाल) येथील पशूपालक...
जनावरांच्या आरोग्याकडे नको दुर्लक्षपावसाळ्यात हिरव्या चाऱ्याची उपलब्धता अधिक...
शाश्‍वत दूध उत्पादनासाठी ‘टीएमआर'गायीला शरीर वजन तसेच दूध उत्पादनासाठी आवश्यक...
जातिवंत वंशवृद्धीसाठी भ्रूण प्रत्यारोपण...साधारणपणे जातिवंत दुधाळू गाय एका वर्षात एकाच...
जनावरांच्या आहारात असावीत खनिज मिश्रणेखनिज मिश्रणाच्या अभावामुळे होणारे...
स्वच्छ दूध उत्पादनाची तत्त्वेदूध उत्पादनामध्ये भारताने आघाडी घेतली असली तरी...
संकरित गाईंची दूध उत्पादन वाढीची सूत्रेसद्यःस्थितीतील संकरित गाईंची दुसऱ्या-तिसऱ्या...
रेशीम कीटकांवर होणारा हवामानाचा परिणामरेशीम उत्पादनासाठी आवश्यक खर्चाचे प्रमाण अत्यल्प...
रानभाज्यांचे आहारातील महत्त्वशेती न करता नैसर्गिक स्थितीमध्ये उगवलेल्या...
दुधाळ जनावरांसाठी सॉर्डेड सीमेन...अलीकडच्या काळात पशुपालनामध्ये सेक्‍स ...
जनावरे, गोठ्याची ठेवा स्वच्छतापावसाळ्यात जनावरांच्या आरोग्याला असलेला धोका...
रेबीज’ची लक्षणे तपासा, उपाययोजना करामनुष्यामध्ये रेबीज विषाणू मध्यवर्ती मज्जासंस्थेला...
जनावरांमध्ये होणारा शिंगाचा कर्करोगशिंगाचा कर्करोग साधारणपणे ५ ते १० वर्षे वयोगटातील...
गवळाऊ संगोपनाचे पाऊल पडते पुढेविदर्भामध्ये गवळाऊ दुधाळ गाय आणि शेतीकामासाठी...
जनावरांच्या आहारात मूरघासाचा वापरमूरघासामुळे वर्षभर हिरव्या चाऱ्याचा पुरवठा करता...
गाई, म्हशींसाठी संतुलित आहारगाई, म्हशींच्या अवस्थेनुसार पाणी, खुराक मिश्रण,...
दूध व्यवसायाची नव्याने करा मांडणीदेशी गायीचे दूध, फार्म फ्रेश दूध, निर्जंतुक,...
गाई, म्हशीतील माज ओळखागाई, म्हशींचा माज ओळखणे ही अत्यंत महत्त्वपूर्ण...