पाऊस अन् धुक्यामुळे शेवग्याचा बहर अडचणीत

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर शेवगा लागवड झाली आहे. शेवग्याच्या हिवाळी बहरातून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळत असते.
पाऊस अन् धुक्यामुळे शेवग्याचा बहर अडचणीत
पाऊस अन् धुक्यामुळे शेवग्याचा बहर अडचणीत

नाशिक : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर शेवगा लागवड झाली आहे. शेवग्याच्या हिवाळी बहरातून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळत असते. मात्र गत सप्ताहात झालेल्या अवकाळी पाऊस व पडत असलेल्या धुक्यामुळे पिकाचा हिवाळी बहर अडचणीत सापडला आहे. प्रामुख्याने कसमादे भागात नुकसान अधिक असून, हे नुकसान ५० टक्क्यांवर असल्याने उत्पादनात घट होणार आहे. सध्या तयार होत असलेला माल जानवेरीच्या अखेर काढणीस येतो. मागणी असल्याने त्यास दरही चांगला मिळत असतो. मात्र या नैसर्गिक संकटामुळे शेवगा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान वाढले आहे. तमिळनाडू राज्यात अवकाळी पावसामुळे शेवगा नुकसान होऊन महाराष्ट्रातील शेवगा उत्पादकांना चांगले दर मिळण्याची अपेक्षा असताना त्यावर या अवकाळी पावसाने पाणी फिरवले आहे. प्रामुख्याने मालेगाव, सटाणा, देवळा या तालुक्यांसह लगतच्या साक्री तालुक्यात नुकसानीचा मोठा फटका आहे काही ठिकाणी फुलगळ होऊन फक्त पाला झाडांवर शिल्लक आहे. हिवाळी बहरात चांगला दर मिळत असल्याने उत्पन्न चांगले मिळते. मात्र अवकाळी पावसामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. पावसामुळे बहर लांबणीवर जाणार आहे. परिणामी, कसमादे भागातील फेब्रुवारीपासून मालाची आवक कमी होण्याची शक्याता आहे आहे. रोगांच्या प्रादुर्भावामुळे पीक संरक्षण खर्च वाढता  अवकाळी पावसामुळे बहर व तयार होत असलेल्या बारीक शेंगांची गळ होण्याचे प्रमाण वाढले. यासह हवामान बदलामुळे करपा व भुरी या बुरशीजन्य रोगांसह माव्याचा प्रादुर्भाव वाढताना दिसून येत आहे. त्यामुळे बुरशीनाशकांच्या फवारण्याचा अतिरिक्त खर्चाचा ताण शेतकऱ्यांवर आला आहे. परिणामी, हा पीक संरक्षण खर्च वाढणार असल्याने नियोजन कोलमडले. मात्र आर्थिक ताण पडणार असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.  नुकसानीचे स्वरूप असे

  • फुलगळ झाल्याने नुकसान वाढते 
  • तयार होणाऱ्या शेंगांच्या बारीक कळ्यांची गळ
  • पाने पिवळी पडल्याने बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढता
  • दव अधिक असल्याने तयार शेवग्याच्या शेंगा लाल होण्याची समस्या 
  • जिल्ह्यातील लागवडीखालील तालुकानिहाय अंदाजे क्षेत्र (एकर) मालेगाव : २५००  सटाणा : ११०० देवळा : २५० कळवण : १५० चांदवड : १०० नांदगाव : २०० येवला : १००

    प्रतिक्रिया अगोदरच्या अति पावसामुळे जमिनीत बुरशीची समस्या वाढली. त्यात अवकाळी पावसामुळे शेवगा लागवडींवर परिणाम झाला आहे. हे पीक कमी पाण्याचे असल्याने मुळ्यांची अन्नद्रव्य घेण्याची कार्यक्षमता घटली आहे. त्यामुळे एकंदरीत ढगाळ वातावरण व धुक्यामुळे बुरशीजन्य रोगांचे प्रमाण वाढल्याने फुलगळ समस्या वाढली आहे. ढगाळ वातावरण असल्याने जैविक कीडनाशके व खतांचा वापर करावा.  - विशाल चौधरी,  विषय विशेषज्ञ, पीक संरक्षण विभाग, कृषी विज्ञान केंद्र, मालेगाव, जि. नाशिक

    हवामानात बदल झाल्यास जोखीम अधिक असते. त्यामुळे फळ पीक विमा योजनेत हे पीक समाविष्ट करून राज्य सरकारने दिलासा द्यावा. सध्या नवीन पीकपर्याय म्हणून शेवगा पुढे येत आहे. त्याचा विचार शासनाने करावा. अन्यथा शेतकरी मोठ्या संकटात सापडणार आहेत. - महेश पवार, शेवगा उत्पादक, पवारवाडी, ता. मालेगाव

    हिवाळी बहरात नुकसान झाल्याने आगामी उत्पादनावर मोठा परिणाम होणार आहे. त्यामुळे मागणी व पुरवठा यावर परिणाम होणार आहे. अवकाळी पावसामुळे काढणीस आलेल्या शेंगा लाल झाल्याने प्रतवारी घटली आहे.   - नंदराज सूर्यवंशी,  शेवगा व्यापारी व उत्पादक, आघार, ता. मालेगाव 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com