मराठवाड्यातील ४ मध्यम, ५७ लघू प्रकल्प कोरडेच

मराठवाड्यातील ४ मध्यम, ५७ लघू प्रकल्प कोरडेच
मराठवाड्यातील ४ मध्यम, ५७ लघू प्रकल्प कोरडेच

औरंगाबाद : मराठवाड्यातील एकूण ८७३ प्रकल्पांपैकी ४ मध्यम व ५७ लघू प्रकल्प कोरडेठाक आहेत. १०६ लघू व ४ मध्यम प्रकल्प मिळून ११० प्रकल्पांमधील पाणीसाठा जोत्याखाली आहे. २९ मध्यम व २७५ लघू प्रकल्पांतच केवळ ७५ टक्‍क्‍यांपेक्षा जास्त पाणीसाठा असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या वतीने देण्यात आली. 

ऑक्‍टोबरमध्ये मॉन्सूनोत्तर बरसलेल्या जोरदार पावसामुळे मराठवाड्यातील पाणीसाठ्यांची स्थिती सुधारली. काही प्रकल्प तुडुंब, तर काही प्रकल्पात किमान पाणीसाठा होण्यास या पावसाची मदत झाली. जितक्‍या झपाट्याने पावसामुळे पाणीसाठा वाढला तितक्‍याच झपाट्याने आता मराठवाड्यातील उपयुक्‍त पाणीसाठा घटत असल्याची स्थिती आहे. 

मराठवाड्यातील ७५ मध्यम प्रकल्पांपैकी ४ मध्यम प्रकल्पांत पाण्याचा थेंब नाही. त्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील एक व जालना जिल्ह्यातील तीन प्रकल्पांचा समावेश आहे. आठ मध्यम प्रकल्पांतील पाणीसाठा जोत्याखाली आहे. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील २, बीड १, लातूर २, उस्मानाबाद जिल्ह्यातील ३ मध्यम प्रकल्पांचा समावेश आहे. 

७४९ लघू प्रकल्पांपैकी ५७ लघू प्रकल्पांत पाण्याचा थेंब नाही. त्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील २१, जालना २, बीड २२, लातूर ७, तर उस्मानाबाद जिल्ह्यातील ५ लघू प्रकल्पांचा समावेश आहे. १०६ लघू प्रकल्पांतील पाणीसाठा जोत्याखाली आहे. त्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील ६, जालना १६, बीड १५, लातूर ३४, उस्मानाबाद ३१, नांदेड ३, परभणी जिल्ह्यातील एका लघू प्रकल्पाचा समावेश आहे.

मराठवाड्यातील ८७३ लघू, मध्यम, मोठ्या प्रकल्पांसह बंधाऱ्यांमध्ये आजघडीला ६८ टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामध्ये ११ मोठ्या प्रकल्पांमधील ७९ टक्‍के, ७५ मध्यम प्रकल्पातील ५१ टक्‍के, ७४९ लघू प्रकल्पातील ४३ टक्‍के, १३ गोदावरील नदीवरील बंधाऱ्यांमध्ये ८२ टक्‍के तर तेरणा, मांजरा, रेणा नदीवरील २५ बंधाऱ्यांमधील ४० टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठ्याचा समावेश आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com