Agriculture news in marathi Dry the Five small irrigation pond in Parbhani district | Agrowon

परभणी जिल्ह्यातील पाच लघू सिंचन तलाव कोरडे

टीम अॅग्रोवन
शनिवार, 4 जुलै 2020

परभणी : जून महिन्यात पाणलोट क्षेत्रात मोठा पाऊस न झाल्यामुळे जिल्ह्यातील ५ लघू सिंचन तलाव अद्याप कोरडे आहेत. तर, ७ लघू तलावांतील पाणीसाठा जोत्याखाली आहे.

परभणी : जून महिन्यात पाणलोट क्षेत्रात मोठा पाऊस न झाल्यामुळे जिल्ह्यातील ५ लघू सिंचन तलाव अद्याप कोरडे आहेत. तर, ७ लघू तलावांतील पाणीसाठा जोत्याखाली आहे. या तलावांवर पाणीपुरवठ्यासाठी अवलंबून असलेल्या गावांतील पाणीटंचाईचे सावट अजून कायम आहे.

बेसुमार उपसा, बाष्पीभवन आदी काराणांमुळे जिल्ह्यातील २२ लघु सिंचन तलावांपैकी १२ तलावांतील उपयुक्त पाणीसाठा संपला होता. त्यानंतरही उपसा सुरु राहिल्याने ५ तलाव कोरडे पडले होते. तर, ७ तलावांतील पाणीसाठा जोत्याखाली गेला. यंदाच्या पावसाळ्यातील एक महिना संपला आहे. परंतु, पाणलोटक्षेत्रात मोठा पाऊस न झाल्यामुळे पेडगाव (ता.परभणी), जोगवाडा, बेलखेडा, वडाळी, चारठाणा (सर्व ता.जिंतूर) हे तलांव अद्याप कोरडे आहेत.

जोत्याखाली पाणीसाठा असलेल्या तलावांमध्ये आंबेगाव (ता.मानवत), चिंचोली, आडगाव, केहाळ, भोसी, मांडवी, दहेगाव (सर्व ता.जिंतूर) या तलावांतील पाणीसाठा जोत्याखाली आहे. उपयुक्त पाणीसाठा असलेल्या तलावांमध्ये झरी (ता.पाथरी) ९४ टक्के, नखातवाडी (ता. सोनपेठ) ३ टक्के, तांदुळवाडी (ता.पालम) १४ टक्के, राणीसावरगाव (ता.गंगाखेड) ४५ टक्के, टाकळवाडी (ता.गंगाखेड) १८ टक्के, पिंपळदरी (ता.गंगाखेड) ५० टक्के, देवगाव (ता.जिंतूर) १ टक्का या तलावांचा समावेश आहे. जिल्ह्यातील करपरा (ता.जिंतूर) आणि मासोळी (ता.गंगाखेड) या दोन प्रकल्पांतील पाणीसाठ्यात थोडी वाढ झाली आहे. या प्रकल्पांमध्ये अनुक्रमे १९ टक्के आणि ३० टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे.


इतर ताज्या घडामोडी
औरंगाबादमध्ये आज रानभाज्या महोत्सवऔरंगाबाद  ः ‘‘वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
सांगलीत ६८ हजार शेतकऱ्यांनी उतरवला...सांगली  ः जिल्ह्यातील ६८ हजार ०१८...
रिसोडमध्ये पावसाची उघडीपवाशीम  ः राज्यात बऱ्याच भागात पाऊस धुमाकूळ...
वाशीम जिल्ह्यात एक लाख ४२ हजार हेक्टर...वाशीम ः पंतप्रधान पीकविमा योजनेत जिल्ह्यातील...
खानदेशात ताग लागवडीला पसंतीजळगाव  ः कमी पाण्यात व उशिरा लागवड करूनही...
पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत घटकोल्हापूर : पश्चिम भागात पावसाचा जोर घटल्याने...
परभणी विभागात बिजोत्पादन होणार २७ हजार...परभणी : यंदा महाबीजच्या परभणी विभागातील परभणी,...
अकोल्यात पाऊस सुरुचनगर  ः अकोले तालुक्याच्या पश्चिम आदिवासी...
विदर्भातील पोल्ट्री व्यावसायिकांचे...अमरावती : विदर्भातील पोल्ट्री व्यावसायिकांना...
इगतपुरी, नाशिक तालुक्यात वाऱ्यामुळे...नाशिक : जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात झालेल्या...
विक्रीअभावी मालवंडीत लिंबू उत्पादकांना...मालवंडी, जि. सोलापूर ः बार्शी तालुक्यातील मालवंडी...
सफेद चिप्पी कांदळवन वृक्ष घोषितमुंबई: सफेद चिप्पी (sonneratia alba) या कांदळवन...
यंदा बैल पोळा उत्साहात साजरा होणार रोपळे बुद्रूक , ता.पंढरपूर , जि . सोलापूर...
हलक्‍या ते मध्यम स्वरूपात पावसाची शक्‍...महाराष्ट्रावरील हवेच्या दाबात बदल होत असून,...
औरंगाबादमध्ये बटाटे २००० ते २४०० रुपये...औरंगाबाद  : येथील कृषी उत्पन्न बाजार...
औसा तालुक्यात उडीद, मूग व्हायरसच्या...औसा, जि. लातूर : तालुक्यातील उडीद आणि मूग ही पिके...
शेतमजुरांसाठी कौशल्याधारीत प्रशिक्षण...नाशिक: बदलत्या पीक पद्धतीमध्ये कीडनाशक फवारणी,...
कोल्हापूर जिल्ह्यात वादळ, पुराचा उसाला...कोल्हापूर: जोरदार वाऱ्यासह सुरु असलेल्या पावसाने...
पुणे जिल्ह्यात पावसामुळे भात लागवडीला...पुणे ः गेल्या चार ते पाच दिवसांपासून पुणे...
पाथरूडच्या बंधाऱ्यांत मुबलक पाणीपाथरूड, जि. उस्मानाबाद : येथील दुधना नदीवर...