Agriculture news in marathi Dry over 100 small medium project in Marathwada | Agrowon

मराठवाड्यात १०० वर लघु मध्यम प्रकल्प कोरडे

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 7 एप्रिल 2020

औरंगाबाद : मराठवाड्यातील ८७३ लघु, मध्यम, मोठ्या प्रकल्पांसह बंधाऱ्यांमधील उपयुक्त पाणीसाठा ४५ टक्क्यांवर आला आहे. जवळपास १०१ लघु मध्यम प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत.

औरंगाबाद : मराठवाड्यातील ८७३ लघु, मध्यम, मोठ्या प्रकल्पांसह बंधाऱ्यांमधील उपयुक्त पाणीसाठा ४५ टक्क्यांवर आला आहे. जवळपास १०१ लघु मध्यम प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत. दुसरीकडे मध्यम प्रकल्पांतील उपयुक्त पाणीसाठा २२ टक्क्यांवर, तर लघु प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठा ३० टक्क्यांवर आल्याने चिंता वाढली आहे. 

मराठवाड्यातील ८७३ प्रकल्पांत ४५.९१ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. त्यामध्ये ११ मोठ्या प्रकल्पांत ५६.९५ टक्के, ७५ मध्यम प्रकल्पांत ३०.१४ टक्के, ७४९ लघु प्रकल्प २१.९५ टक्के, गोदावरी नदीवरील १३ बंधाऱ्यांत ५१.६८ टक्के तर, तेरणा, मांजरा व रेणा येईना नदीवरील पंचवीस बंधाऱ्यांत केवळ ८.६ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. 

मोठ्या ११ प्रकल्पांपैकी मांजरा व सीनाकोळेगाव प्रकल्पात उपयुक्त पाण्याचा थेंब नाही. दुसरीकडे पावसाळ्यात तुडुंब झालेले जायकवाडी जलाशय उपयुक्त पाण्याबाबत ६५ टक्क्यांवर आले आहेत. मोठ्या प्रकल्पांपैकी सिद्धेश्‍वर प्रकल्‍पात २२ टक्के, विष्णुपुरी ३५ टक्के, निम्न तेरणा ३५ टक्के, निम्न दुधना प्रकल्पात केवळ १ टक्केच उपयुक्त पाणी आहे. नांदेड जिल्ह्यातील नऊ मध्यम प्रकल्प वगळता काही मध्यम प्रकल्पांत पन्नास टक्केही उपयुक्त पाणी नाही. औरंगाबाद जिल्ह्यातील १६ मध्यम प्रकल्पांत केवळ २६ टक्के, जालना मधील ७ प्रकल्पांत २१ टक्के, बीड मधील १६ प्रकल्पांत ३३ टक्के, लातूरमधील आठ प्रकल्पांत १२ टक्के, उस्मानाबादमधील १७ प्रकल्पांत २२ टक्के, परभणीमधील दोन मध्यम प्रकल्पांत ४९ टक्केच उपयुक्त पाणी शिल्लक आहे. 

मध्यम प्रकल्पांपाठोपाठ लघु प्रकल्पांची स्थितीही समाधानकारक नाही. औरंगाबाद जिल्ह्यातील ९३ लघु प्रकल्प २३ टक्के, जालन्यातील ५३ प्रकल्पांत १३ टक्के, बीडमधील १२६ प्रकल्पांत २४ टक्के, लातूरमधील १३२ प्रकल्पांत २७ टक्के, उस्मानाबादमधील २०५ प्रकल्पांत १३ टक्के, नांदेडमधील ८८ प्रकल्पांत ३८ टक्के, परभणीमधील २२ प्रकल्पांत २१ टक्के, तर हिंगोली जिल्ह्यातील २६ लघु प्रकल्पांत केवळ ३१ टक्केच उपयुक्त पाणी आहे. 

१८५ प्रकल्प जोत्याखाली 

मराठवाड्यातील ७५ मध्यम प्रकल्पांपैकी आठ प्रकल्प कोरडे आहेत. यामध्ये औरंगाबाद व लातूरमधील प्रत्येकी दोन, तर बीडमधील चार मध्यम प्रकल्पांचा समावेश आहे. तेरा मध्यम प्रकल्पांतील पाणीसाठा जोत्याखाली आहे. त्यामध्ये औरंगाबाद व बीड मधील प्रत्येकी तीन, लातूरमधील दोन, उस्मानाबादमधील ४ व जालना जिल्ह्यातील एका मध्यम प्रकल्पाचा समावेश आहे. ७४९ लघु प्रकल्पांपैकी ९३ लघु प्रकल्प कोरडे आहेत. त्यात औरंगाबादमधील २६, जालना १२, बीड २७, लातूर १३, तर उस्मानाबाद जिल्ह्यातील १५ प्रकल्पांचा समावेश आहे. तब्बल १७२ लघु प्रकल्प जोत्याखाली आहेत. त्यामध्ये औरंगाबादमधील तीन, जालना १८, बीड ३०, लातूर ४४, उस्मानाबाद ६१, नांदेड ७, परभणी ८, तर हिंगोली जिल्ह्यातील १ लघु प्रकल्पाचा समावेश असल्याची माहिती जलसंपदा विभागातर्फे देण्यात आली. 
 

 
 


इतर अॅग्रो विशेष
मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधारपुणे : राज्यातील बहुतांशी भागातील पावसाचे...
राज्यात हलक्या पावसाची शक्यतापुणे : काही दिवस राज्यात मुसळधार पाऊस...
एक हजार प्राध्यापकांनी वयाची साठी...पुणे: राज्यातील कृषी विद्यापीठांमधील...
सूक्ष्म अन्न उद्योगांना मिळणार आता दहा...पुणे: राज्यात लवकरच पंतप्रधान सूक्ष्म अन्न उद्योग...
कृषी, कामगार विधेयकांची राज्यात...पुणे : केंद्र सरकारने घाईघाईत मंजूर करुन घेतलेली...
शेतकरी आंदोलनाचे सात राज्यांत पडसादचंडीगड ः केंद्र सरकारच्या कृषी विधेयकांना विरोध...
सोयाबीन बियाणे प्लॉटना फटकाऔरंगाबाद: सध्याचे पावसाचे प्रमाण व त्यामुळे...
केळी विमा निकषांबाबत उत्सुकताजळगाव ः राज्य सरकारच्या चुकांमुळे हवामानावर...
अडीच हजार हेक्टर भातशेती सततच्या...सिंधुदुर्ग ः हळवी आणि भिजवणीची लागवड केलेली...
कृषी विधेयकांविरोधात राज्यात शेतकरी...पुणेः केंद्र सरकारने नुकतेच मंजूर केलेल्या कृषी...
सेंद्रिय व्यवस्थापनाच्या बळावर रोखली...सर्वाधिक संत्रा लागवडीखाली क्षेत्र असल्यामुळे ‘...
ऑनलाइन शिक्षणात बरेच ऑफलाइन! पाऊस आणि शाळा, महाविद्यालयं सुरू होण्याचा काळ...
आता शेतमाल खरेदीचे बोला!ऑगस्ट २०२० च्या पहिल्या आठवड्यात देशभरातील खरीप...
उद्योजकांच्या कर्जमाफीवर सर्वांचीच...भारतात शेती आणि शेतकरी याला खूप महत्त्व आहे....
खरीप धान्योत्पादन १४४ दशलक्ष टनांवर नवी दिल्ली ः कोरोना पुणे मुंबई बातमी ...
ऊसतोड कामगार मंडळाची रचना, धोरण लवकरचः...मुंबई : ऊसतोड कामगारांचे विविध प्रश्न व समस्यांवर...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात हलक्या...पुणे ः राज्यातील पावसाचा जोर कमी झाला आहे. पुढील...
‘पोकरा’मधून फळबाग, वनशेती, बांबू, तुती...औरंगाबाद: नानाजी देशमुख कृषी संजीवनी...
पावसाळ्यापूर्वीच कापूस खरेदीचे नियोजन अमरावती : गेल्या हंगामात पावसामुळे कापसाचे नुकसान...
सुधारित शेती, पूरक व्यवसायाचा ‘निवजे...निवजे (ता.कुडाळ,जि.सिंधुदुर्ग) गावकऱ्यांनी शेती...