मेळघाटातील आदिवासींच्या घशाला कोरड 

अमरावती ः दुर्गम मेळघाटात उन्हाची तीव्रता वाढण्यासोबतच पाणीटंचाईचा प्रश्‍नही गंभीर झाला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाकडून लॉकडाऊनच्या काळात पूरक उपाययोजनांवर भर देत आठ गावांना नऊ टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
Dry throat of tribals in Melghat
Dry throat of tribals in Melghat

अमरावती ः दुर्गम मेळघाटात उन्हाची तीव्रता वाढण्यासोबतच पाणीटंचाईचा प्रश्‍नही गंभीर झाला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाकडून लॉकडाऊनच्या काळात पूरक उपाययोजनांवर भर देत आठ गावांना नऊ टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. 

दुर्गम मेळघाटात कुपोषणासोबतच दरवर्षी पाणी टंचाई प्रश्‍नही गंभीर होतो. राज्यकर्त्यांकडून गेल्या अनेक वर्षात या प्रश्‍नाची सोडवणूक न झाल्याने दरवर्षी मेळघाटातील आदिवासींवर पाण्यासाठी पायपीट करण्याची वेळ येते. यावर्षी देखील उन्हाचा पारा चढताच पाणी समस्येनेही उग्ररुपधारण केले आहे. 

चिखलदरा तालुक्‍यात सर्वाधीक प्रमाणात टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. त्यानुसार आकी, बगदरी, सोनापूर, सोमवारखेडा, एकझिरा, खंडुखेडा, तारुबादा, मलकापूर या आठ गावांमध्ये नऊ टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. सोनापूर येथे दोन तर उर्वरित गावांमध्ये प्रत्येकी एक टॅंकर लावण्यात आला आहे. हतरु येथील दोन व कोरडा येथील एक विहीर पाणी समस्येच्या पार्श्‍वभूमीवर अधिग्रहीत करण्यात आली आहे. 

धरमडोह, बहाद्दूरपूर, कोयलारी, मनभंग या गावांमध्येही पाणी प्रश्‍न तीव्र झाल्याने या गावांमध्ये देखील टॅंकरने पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे पाठविण्यात आल्याची माहिती गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी दिली. 

पाणी समस्येकरिता सोशल मीडियाचा वापर  दुर्गम भागातील पाणी समस्यांची माहिती मिळावी याकरीता पंचायत समितीचे गटविकास अधिकाऱ्यांनी व्हॉटसअप ग्रुप तयार केला आहे. त्यावर सरपंच, ग्रामसचिव, पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्यांचा समावेश आहे. त्या माध्यमातून गावखेड्यातील समस्यांची माहिती तत्काळ होत त्यांच्या सोडवणुकीसाठी पुढाकार घेतला जातो. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com