कोरड्या हवामानाचा अंदाज

किमान तापमानात घट झाल्याने राज्यात थंडीची चाहूल लागली आहे. तर कमाल तापमानात वाढ झाली आहे. दुपारी उन्हाचा चटका जाणवत असून, पहाटे गारठा जाणवत आहे.
Dry weather forecast
Dry weather forecast

पुणे : किमान तापमानात घट झाल्याने राज्यात थंडीची चाहूल लागली आहे. तर कमाल तापमानात वाढ झाली आहे. दुपारी उन्हाचा चटका जाणवत असून, पहाटे गारठा जाणवत आहे. आज (ता. २८) राज्यात मुख्यत: कोरड्या हवामानाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

नैॡत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) सोमवारी (ता. २५) संपूर्ण देशाचा निरोप घेतल्यानंतर राज्यात मुख्यत: कोरडे हवामान आहे. तर कोकणात पावसाला पोषक हवामान होत आहे. राज्याच्या कमाल तापमानात वाढ झाली असून, उकाड्यातही वाढ झाली आहे.

बुधवारी (ता. २७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये रत्नागिरी येथे उच्चांकी कमाल ३५.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. बहुतांशी ठिकाणी कमाल तापमान ३२ अंशांच्या पुढेच आहे. तर कमान तापमानात चढ- उतार होत असून, बहुतांश ठिकाणी तापमानाचा पारा १५ ते २० अंशांदरम्यान आहे. महाबळेश्‍वर येथे नीचांकी १४.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

कमी दाब क्षेत्राची निर्मिती बंगालच्या उपसागरातील चक्राकार वाऱ्यांमुळे बुधवारी (ता. २७) उपसागराच्या मध्य भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. ही प्रणाली तीन दिवस पश्‍चिमेकडे सरकणार आहे. तर पूर्वेकडून वाहणाऱ्या वाऱ्यामुळे केरळ किनाऱ्यालगत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. त्यामुळे दक्षिण भारतात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे.

बुधवारी (ता. २७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३१.८ (१५.६), नगर ३२.० (-), जळगाव ३३ (१६.८), कोल्हापूर ३२.२ (१९.६), महाबळेश्‍वर २६.१( १४.३), मालेगाव ३० (१८.४), नाशिक ३१.१ (१५.६), सांगली ३३.५ (१८), सातारा ३१.७ (१५.७), सोलापूर ३३.६ (१७.१), सांताक्रूझ ३४.४ (२२.४), अलिबाग ३३.२ (२१.९), डहाणू ३३.२ (२२.८), रत्नागिरी ३५.१ (२१), औरंगाबाद ३०.६ (१५.५), नांदेड ३३ (१८), उस्मानाबाद - (१९), परभणी ३४.४ (१७.६), अकोला ३३.२ (१८.५), अमरावती ३२.२ (१७.३), ब्रह्मपुरी ३३.९ (१६.३), बुलडाणा २९.६ (१७.६), चंद्रपूर ३३ (२०), गडचिरोली ३० (१९.४), गोंदिया ३२ (१८.२), नागपूर ३२.२ (१८.७), वर्धा ३२.२(१९.०), वाशीम ३३(२१.०), यवतमाळ ३१.५ (१७.५).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com