कोरड्या हवामानाचा अंदाज, गारठाही वाढणार

राज्यात पावसाने उघडीप दिली असून, आकाश निरभ्र झाल्याने स्वच्छ सूर्यप्रकाश जमिनीवर येऊ लागला आहे. शनिवारी (ता. ४) रात्री आणि रविवारी (ता. ५) पहाटे राज्याच्या अनेक भागांत दाट धुक्याचे अच्छादन होते.
Dry weather forecast, hail will also increase
Dry weather forecast, hail will also increase

पुणे : राज्यात पावसाने उघडीप दिली असून, आकाश निरभ्र झाल्याने स्वच्छ सूर्यप्रकाश जमिनीवर येऊ लागला आहे. शनिवारी (ता. ४) रात्री आणि रविवारी (ता. ५) पहाटे राज्याच्या अनेक भागांत दाट धुक्याचे अच्छादन होते. आज (ता. ६) राज्यात कोरड्या हवामानाचा अंदाज असून, हळूहळू गारठा परतण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 

ढगाळ हवामानामुळे कमी झालेले कमाल तापमान पुन्हा वाढू लागले आहे. तसेच उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे किमान तापमानात घट होऊन, राज्यात हळूहळू गारठा वाढण्याची शक्यता आहे. रविवारी (ता. ५) महाबळेश्‍वर येथे नीचांकी १२.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. तर सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सांताक्रूझ येथे उच्चांकी ३२.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. 

‘जवाद’ चक्रीवादळ ओसरले  बंगालच्या उपसागरातील ‘जवाद’ चक्रीवादळाची तीव्रता ओसरली आहे. रविवारी (ता. ५) या वादळी प्रणालीचे अतितीव्र कमी दाब क्षेत्रात रूपांरण झाले. हे क्षेत्र पश्‍चिम बंगालच्या किनारपट्टीकडे जाताना आणखी निवळून जाण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.

रविवारी (ता. ५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे २४.५ (१५.६), नगर २६.२ (-), जळगाव २९.६ (१८.५), कोल्हापूर २६.६ (१८.८), महाबळेश्‍वर -(१२.६), मालेगाव २१.० (१६.०), नाशिक २६.५ (१७.९), निफाड २८.१ (१६.५), सांगली २६.८ (१९.१), सातारा २४.५ (१८.९), सोलापूर ३०.८ (१९.०), सांताक्रूझ ३२.५ (२२.०), डहाणू २९.९ (२०.७), रत्नागिरी ३१.५ (२०.९), औरंगाबाद २६.२ (१५.४), नांदेड २८.८ (१७.६), उस्मानाबाद २८.३ (१८.४), परभणी २४.८ (१५.९), अकोला ३१.० (१८.०), अमरावती २९.६ (१६.०), ब्रह्मपुरी - (१५.८), बुलडाणा ३० (१७.२), चंद्रपूर २८.८ (१७.२), गडचिरोली २९ (१६.४), गोंदिया २९.५ (१३.८), नागपूर २८.८ (१५.८), वर्धा ३० (१६.४), वाशीम २९.५ (१९), यवतमाळ ३०  (१५.५).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com