Agriculture news in Marathi Dry weather forecast, hail will also increase | Page 2 ||| Agrowon

कोरड्या हवामानाचा अंदाज, गारठाही वाढणार

टीम अॅग्रोवन
सोमवार, 6 डिसेंबर 2021

राज्यात पावसाने उघडीप दिली असून, आकाश निरभ्र झाल्याने स्वच्छ सूर्यप्रकाश जमिनीवर येऊ लागला आहे. शनिवारी (ता. ४) रात्री आणि रविवारी (ता. ५) पहाटे राज्याच्या अनेक भागांत दाट धुक्याचे अच्छादन होते.

पुणे : राज्यात पावसाने उघडीप दिली असून, आकाश निरभ्र झाल्याने स्वच्छ सूर्यप्रकाश जमिनीवर येऊ लागला आहे. शनिवारी (ता. ४) रात्री आणि रविवारी (ता. ५) पहाटे राज्याच्या अनेक भागांत दाट धुक्याचे अच्छादन होते. आज (ता. ६) राज्यात कोरड्या हवामानाचा अंदाज असून, हळूहळू गारठा परतण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 

ढगाळ हवामानामुळे कमी झालेले कमाल तापमान पुन्हा वाढू लागले आहे. तसेच उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे किमान तापमानात घट होऊन, राज्यात हळूहळू गारठा वाढण्याची शक्यता आहे. रविवारी (ता. ५) महाबळेश्‍वर येथे नीचांकी १२.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. तर सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सांताक्रूझ येथे उच्चांकी ३२.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. 

‘जवाद’ चक्रीवादळ ओसरले 
बंगालच्या उपसागरातील ‘जवाद’ चक्रीवादळाची तीव्रता ओसरली आहे. रविवारी (ता. ५) या वादळी प्रणालीचे अतितीव्र कमी दाब क्षेत्रात रूपांरण झाले. हे क्षेत्र पश्‍चिम बंगालच्या किनारपट्टीकडे जाताना आणखी निवळून जाण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.

रविवारी (ता. ५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे २४.५ (१५.६), नगर २६.२ (-), जळगाव २९.६ (१८.५), कोल्हापूर २६.६ (१८.८), महाबळेश्‍वर -(१२.६), मालेगाव २१.० (१६.०), नाशिक २६.५ (१७.९), निफाड २८.१ (१६.५), सांगली २६.८ (१९.१), सातारा २४.५ (१८.९), सोलापूर ३०.८ (१९.०), सांताक्रूझ ३२.५ (२२.०), डहाणू २९.९ (२०.७), रत्नागिरी ३१.५ (२०.९), औरंगाबाद २६.२ (१५.४), नांदेड २८.८ (१७.६), उस्मानाबाद २८.३ (१८.४), परभणी २४.८ (१५.९), अकोला ३१.० (१८.०), अमरावती २९.६ (१६.०), ब्रह्मपुरी - (१५.८), बुलडाणा ३० (१७.२), चंद्रपूर २८.८ (१७.२), गडचिरोली २९ (१६.४), गोंदिया २९.५ (१३.८), नागपूर २८.८ (१५.८), वर्धा ३० (१६.४), वाशीम २९.५ (१९), यवतमाळ ३० 
(१५.५).


इतर अॅग्रो विशेष
गहू तांदूळ, कारळासह ओट्सच्या नव्या जाती...वृत्तसेवा - मध्य प्रदेशातील जबलपूर येथील राज्य...
इतर क्षेत्रांच्या तुलनेत कृषी...यंदाच्या आर्थिक वर्षात कृषी क्षेत्राने इतर...
गायीचे मायांग तिरके का होते?गाय किंवा म्हैस माजावर आल्यानंतर सोट टाकण्याचे...
महाविकास आघाडी सरकाचा निर्णय...महाविकास आघाडी सरकारने भुमी अधिग्रहण कायद्याला (...
युवा शेतकऱ्याचे अभ्यासपूर्ण प्रिसिजन...शेतीतील विज्ञानाचा अभ्यास, विविध देशांतील...
जातिवंत पैदाशीसह आदर्श गोठा व्यवस्थापनमाणकापूर (जि. बेळगाव, कर्नाटक) येथील प्रफुल्ल व...
खतांचे वाढीव दर कमी करा मुंबई : अनुदान मिळणाऱ्या खत पुरवठादारांनी...
तापमानात वाढ, गारठा होतोय कमी पुणे : राज्यात अशंतः ढगाळ हवामान असले तरी,...
पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या ...मुंबई : राज्यातील जिल्हा परिषदा आणि सरकारच्या...
‘सहकार’ला पुन्हा हवे  लेखापरीक्षणाचे...पुणे ः राज्याच्या सहकार चळवळीतील गैरप्रकार...
बदलत्या वातावरणाचे बेदाणा निर्मितीवर...सांगली ः जिल्ह्यात बेदाणा निर्मितीला गती आली आहे...
तुरीच्या दरात काहीशी सुधारणा पुणे ः आठवडाभरात तुरीची आवक काहीशी मंदावली होती....
ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत  डॉ. एन. डी...  कोल्हापूर ः ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत,...
विद्यापीठांमधील कर्मचाऱ्यांचे ...पुणेः कृषी विद्यापीठांमध्ये रोजंदारीवर लागलेल्या...
पपईला मिळेना किलोला ४.७५ रुपयांचाही...जळगाव ः  खानदेशात पपई दर शेतकऱ्यांना...
तूर डाळ शंभरी गाठणार नागपूर ः खरीप पिकांना अवेळी आलेल्या पावसाचा फटका...
बीटी वांगी लागवडीसाठी १७...पुणे ः जनुकीय परावर्तित (जीएम) बियाणे बंदी...
हवामानशास्त्र विभागाचा अंदाज, पारा...  पुणे - दक्षिण कोकणावर गेल्या तीन...
भारतातून सोयापेंड निर्यात घसरली, जाणून...१) दक्षिण कोकणावर गेल्या तीन ते चार दिवसांपासून...
शेळ्या-मेंढ्यातील अतिसंसर्गजन्य पीपीआर...पीपीआर म्हणजे पेस्टी-डेस पेटीटस रुमीनन्ट्स....