राज्यात कोरड्या हवामानाचा अंदाज

नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) परतीच्या प्रवासाला वेग घेत निम्म्या महाराष्ट्रातून माघार घेतली आहे. राज्याच्या अनेक भागांत पावसाने उघडीप दिली असून, आज (ता. १४) बहुतांशी भागांत हवामान मुख्यत: कोरडे राहण्याची शक्यता आहे.
Dry weather forecast in the state
Dry weather forecast in the state

पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) परतीच्या प्रवासाला वेग घेत निम्म्या महाराष्ट्रातून माघार घेतली आहे. राज्याच्या अनेक भागांत पावसाने उघडीप दिली असून, आज (ता. १४) बहुतांशी भागांत हवामान मुख्यत: कोरडे राहण्याची शक्यता आहे. दक्षिण कोकणात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

बंगालच्या उपसागरात समुद्र सपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. आज (ता. १४) या भागात कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याचे संकेत आहेत. उद्या (ता. १५) ही प्रणाली ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याकडे येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. अरबी समुद्रात कर्नाटकच्या किनाऱ्यालगत चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. त्यापासून तेलंगणापर्यंत एक आणि बंगालच्या उपसागरापर्यंतील चक्राकार वाऱ्यांच्या स्थितीपर्यंत एक कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. त्यामुळे दक्षिण भारतातील राज्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. 

महाराष्ट्राच्या आणखी काही भागांतून माघार शक्य नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी संपूर्ण विदर्भासह उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्याच्या काही भागासह निम्म्या महाराष्ट्रातून माघार घेतली आहे. देशाच्या बहुतांश भागातून मॉन्सून परतला असून, महाराष्ट्राचा आणखी काही भाग, तेलंगणा आणि कर्नाटकच्या काही भागांतून आज (ता. १४) मॉन्सून परतण्यास पोषक हवामान असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

विजांसह पावसाची शक्यता  कोकण : रत्नागिरी, सिंधुदुर्ग.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com