Agriculture news in Marathi Dry weather forecast in the state | Agrowon

राज्यात कोरड्या हवामानाचा अंदाज

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 14 ऑक्टोबर 2021

नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) परतीच्या प्रवासाला वेग घेत निम्म्या महाराष्ट्रातून माघार घेतली आहे. राज्याच्या अनेक भागांत पावसाने उघडीप दिली असून, आज (ता. १४) बहुतांशी भागांत हवामान मुख्यत: कोरडे राहण्याची शक्यता आहे.

पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) परतीच्या प्रवासाला वेग घेत निम्म्या महाराष्ट्रातून माघार घेतली आहे. राज्याच्या अनेक भागांत पावसाने उघडीप दिली असून, आज (ता. १४) बहुतांशी भागांत हवामान मुख्यत: कोरडे राहण्याची शक्यता आहे. दक्षिण कोकणात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

बंगालच्या उपसागरात समुद्र सपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. आज (ता. १४) या भागात कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याचे संकेत आहेत. उद्या (ता. १५) ही प्रणाली ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याकडे येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. अरबी समुद्रात कर्नाटकच्या किनाऱ्यालगत चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. त्यापासून तेलंगणापर्यंत एक आणि बंगालच्या उपसागरापर्यंतील चक्राकार वाऱ्यांच्या स्थितीपर्यंत एक कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. त्यामुळे दक्षिण भारतातील राज्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. 

महाराष्ट्राच्या आणखी काही भागांतून माघार शक्य
नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी संपूर्ण विदर्भासह उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्याच्या काही भागासह निम्म्या महाराष्ट्रातून माघार घेतली आहे. देशाच्या बहुतांश भागातून मॉन्सून परतला असून, महाराष्ट्राचा आणखी काही भाग, तेलंगणा आणि कर्नाटकच्या काही भागांतून आज (ता. १४) मॉन्सून परतण्यास पोषक हवामान असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

विजांसह पावसाची शक्यता 
कोकण :
रत्नागिरी, सिंधुदुर्ग.
 


इतर बातम्या
अन्नधान्य भाववाढीच्या चर्चा निराधारपुणे : सध्या अन्नधान्य महागाईच्या चर्चांना ऊत आला...
राज्यात थंडीची चाहूलपुणे : नैऋत्य मोसमी वारे (मॉन्सून)...
इंधन दरवाढ, महागाई दिसत नाही, कांद्याची...नाशिक : एकीकडे इंधन खर्च, निविष्ठांचे वाढते दर,...
पावसामुळे द्राक्ष हंगामात अडचणी वाढल्यानाशिक : सप्टेंबर महिन्यापासून द्राक्ष उत्पादक...
सरासरी ते सरासरीपेक्षा कमी तापमानाचा...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) १४...
महाराष्ट्राच्या समृद्ध पीकसंपदेचा...संगमनेर, जि. नगर ः ‘‘महाराष्‍ट्रात पिकांची मोठी...
सांगली जिल्ह्यात ५० टक्के द्राक्ष...सांगली : जिल्ह्यात द्राक्ष पिकाच्या फळछाटणीची गती...
आता तुम्हीच शोधा  कुठला कारखाना कुणी... पुणे : गेल्या पंधरा वर्षांत ६५ सहकारी साखर...
स्वाभिमानी-कारखानदार संघर्ष अटळ;  ‘...सांगली : कोल्हापूर जिल्ह्यातील शाहू, गुरुदत्त,...
पुणे जिल्ह्यातील आठवडे बाजार  सुरू...पुणे : कोरोना मार्गदर्शक सूचनांचे पालन करून...
सोयीच्या लोकांची प्रकरणे  सोमय्या झाकून...पुणे : राज्यात एकूण ४३ कारखान्यांची विक्री...
लखीमपूर खेरी घटनेतील  शेतकऱ्यांच्या...वर्धा : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे भाजप...
नगर जिल्ह्यात रब्बीची  सहा टक्के पेरणी  नगर ः जिल्ह्यात यंदा आतापर्यंत रब्बीची ६...
रब्बीत यंदाही राहणार  हरभऱ्याचाच...अकोला : लवकरच रब्बीची लागवड सुरू होत आहे. या...
राज्यभरात निघणार लखीमपूर खेरी  किसान...  नाशिक : उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी...
धुळे जिल्हा बँकेत तिघे जण बिनविरोधधुळे ः धुळे-नंदुरबार जिल्हा बँकेची १७ जागांसाठी...
सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या ...बुलडाणा : विदर्भ, मराठवाडा, खानदेशातील कापूस,...
`तंत्रज्ञान पोहोचविण्यात कृषी...हिंगोली  ः ‘‘कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान...
नांदेड जिल्ह्यात ग्रामबीजोत्पादनात सात...नांदेड : जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी सहा हजार ३१...
यवतमाळ :नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या ...आर्णी, यवतमाळ : परतीच्या पावसाने खरीप पिकांची...