Agriculture News in Marathi Dry weather forecast in the state | Page 3 ||| Agrowon

राज्यात कोरड्या हवामानाचा अंदाज 

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 25 नोव्हेंबर 2021

राज्यात गेल्या आठवडाभरापासून कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाने हजेरी लावली आहे. ढगाळ हवामानामुळे थंडी कमी झाली आहे. आजपासून (ता. २५) राज्याच्या अनेक भागांत मुख्यत: कोरड्या हवामानाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. 

पुणे : राज्यात गेल्या आठवडाभरापासून कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाने हजेरी लावली आहे. ढगाळ हवामानामुळे थंडी कमी झाली आहे. आजपासून (ता. २५) राज्याच्या अनेक भागांत मुख्यत: कोरड्या हवामानाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. 

मंगळवारी (ता. २३) राज्याचा अनेक भागांत अंशत: ढगाळ हवामान होते. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हलक्या ते मध्यम पावासाने हजेरी लावली आहे. बुधवारी (ता. २४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोल्हापुरातील चंदगड येथे ३० मिलिमीटर, सोलापूरमधील मोहोळ आणि लातूर निलंगा येथे प्रत्येकी १० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. 

पावसाने उघडीप देताच राज्यात अनेक ठिकाणी कमाल तापमानात वाढ झाली आहे. अनेक ठिकाणी तापमान ३२ अंशांच्या पुढे गेले आहे. दुपारी उन्हाचा चटका आणि उकाड्यातही वाढ झाली आहे. बुधवारी (ता. २४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये परभणी आणि यवतमाळ येथे उच्चांकी ३५.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. बहुतांशी ठिकाणी किमान तापमानाचा पारा २० अंशांच्या पुढेच असून, निफाड येथे नीचांकी १८.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. 

बुधवारी (ता. २४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३३.७ (२१.२), नगर -(२२.२), जळगाव ३४.२ (२१), कोल्हापूर ३१.७ (२२.२), महाबळेश्‍वर २४.७ (१८.४), मालेगाव ३०.४ (२४), नाशिक ३२.४ (२१.५), निफाड ३० (१८.२), सांगली ३१.३ (२२.२), सातारा २८.६(२३.३), सोलापूर ३४.२ (२०.५), सांताक्रूझ ३३.२ (२६.२), अलिबाग ३०.८ (२५.४), डहाणू ३२.२ (२६.३), रत्नागिरी ३२.९ (२५.१), औरंगाबाद ३४ (२१.८), नांदेड - (२३), उस्मानाबाद - (२१.२), परभणी ३४.८ (२२.७), अकोला ३४ (२२.६), अमरावती ३२ (१९.१), ब्रह्मपुरी ३४.८ (२०.८), बुलडाणा ३२ (२०.९), चंद्रपूर ३१.४ (२१.६), गडचिरोली ३२ (२०.८), गोंदिया ३० (१९.६), नागपूर ३२ (१९.६), वर्धा ३२.६ (२१), वाशीम ३३.५ (१९), यवतमाळ ३५.५ (२०). 

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे संकेत 
बंगालच्या उपसागरामध्ये असलेल्या चक्राकार वाऱ्यांच्या स्थितीमुळे या भागात आज (ता. २५) कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. ही प्रणाली तमिळनाडू आणि श्रीलंकेच्या किनाऱ्याकडे सरकण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.  


इतर बातम्या
पुणे जिल्हा परिषदेवर प्रशासक?पुणे ः जिल्हा परिषदेसह जिल्ह्यातील विविध पंचायत...
गाव कोरोनामुक्त ठेवून ५० लाख जिंकापुणे ः कोरोनाच्या प्रादुर्भावापासून गावमुक्तीसाठी...
सोलापूर जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीची...सोलापूर ः सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक...
वीज प्रश्नांवर मार्ग काढू : भुजबळनाशिक : ‘‘शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी...
तूर डाळ शंभरी गाठणार नागपूर ः खरीप पिकांना अवेळी आलेल्या पावसाचा फटका...
पाच जिल्ह्यांत १४ लाख हेक्‍टरवर रब्बीची...लातूर : विभागातील लातूर, उस्मानाबाद, परभणी,...
जळगाव, अमळनेर, चोपडा बाजारात मक्याचे दर...जळगाव ः  जिल्ह्यातील जळगाव, चोपडा व...
बीटी वांगी लागवडीसाठी १७...पुणे ः जनुकीय परावर्तित (जीएम) बियाणे बंदी...
मनमाडमध्ये वाढत्या थंडीमुळे दूध...मनमाड, ता. नांदगाव : गेल्या काही दिवसांपासून...
सोलापूर जिल्ह्यात पीककर्जाची मर्यादा...सोलापूर ः शेतीचे अपेक्षित उत्पन्न आणि हवामानाचा...
जळगावात ‘वाळू माफियाराज’जळगाव ः जिल्ह्यात विशेषतः जळगाव तालुक्यातील सर्वच...
जळगाव जिल्ह्यात ओल्या दुष्काळाच्या...जळगाव ः  अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांचे...
दुधाला भाव व बाजारपेठ मिळवून देणार :...वर्धा : ग्रामीण भागातील आर्थिक व्यवस्था ही...
कोल्हापूर : ‘एफआरपी’चा वाढीव रक्कम न...कोल्हापूर : गेल्या हंगामात तोडणी वाहतूक खर्च कमी...
अकोलाः करपा रोगाचा केळीला फटका पणज, जि. अकोलाः जिल्ह्यात पणज, बोचरा, शहापूर,...
नागपूर : महाज्योतीमार्फत करडईचे ५०...नागपूर : ‘‘महाज्योतीच्या माध्यमातून ओबीसी...
खतांचे वाढीव दर कमी करा मुंबई : अनुदान मिळणाऱ्या खत पुरवठादारांनी...
भारताच्या फिर्यादीस ऑस्ट्रेलियाकडून...देशांतर्गत ऊस आणि साखर उत्पादकांना करण्यात...
हवामानशास्त्र विभागाचा अंदाज, पारा...  पुणे - दक्षिण कोकणावर गेल्या तीन...
भारतातून सोयापेंड निर्यात घसरली, जाणून...१) दक्षिण कोकणावर गेल्या तीन ते चार दिवसांपासून...