Agriculture News in Marathi Dryport boosts orange exports | Page 2 ||| Agrowon

ड्रायपोर्टमुळे संत्रा निर्यातीला चालना

टीम अॅग्रोवन
रविवार, 24 ऑक्टोबर 2021

वर्धा जिल्ह्यातील सिंधी रेल्वे येथे ड्रायपोर्ट अंतर्गत मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्कच्या निर्मितीमुळे स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.

नागपूर : वर्धा जिल्ह्यातील सिंधी रेल्वे येथे ड्रायपोर्ट अंतर्गत मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्कच्या निर्मितीमुळे स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. या भागातील मुख्य फळपीक असलेल्या संत्र्याच्या निर्यातीला चालना मिळेल तसेच प्रकल्पाच्या माध्यमातून कंटेनर निर्मितीसह लॉजिस्टिक व्यवसाय वृद्धिंगत होऊन माल वाहतुकीवरचा खर्च कमी होणार असल्याचे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. 

हॉटेल सेंटर पॉइंट येथे जेएनपीटी व राष्ट्रीय महामार्ग रसद व्यवस्थापन यांच्यात या संबंधी शुक्रवारी (ता. २२) सामंजस्य करार करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. राज्याचे पशुसंवर्धन मंत्री तथा वर्ध्याचे पालकमंत्री सुनील केदार, नागपूरचे महापौर दयाशंकर तिवारी, खासदार रामदास तडस, वर्धा जि. प. अध्यक्षा सरिता गाखरे, जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी, एनएचएलएमएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश गौड, संचालक के. सत्यनाथन, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाच्या लॉजिस्टिक विभागाचे संयुक्त सचिव सुमन प्रसाद सिंग, मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापक रिचा खरे या वेळी उपस्थित होते.

सिंधी येथील मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्कच्या माध्यमातून निर्यातीच्या संधी उपलब्ध होणार आहेत. देशातील ३५ मल्टी मॉडेल पार्कपैकी नागपूर महत्वपूर्ण असून, येथे स्थापन होणाऱ्या विविध उद्योग व्यवसायांच्या माध्यमातून भविष्यात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. या प्रकल्पासाठी आवश्यक पायाभूत यंत्रणा उभारण्यात आली असून, त्या सोबत जेएनपीटी काम करणार आहे. त्यामुळे येथून देशभरात‍ निर्यातीवर होणारा वाहतूक खर्च कमी होईल, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला. रेल्वे, समृद्धी महामार्ग आणि नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग या मल्टी मॉडेल पार्कला जोडला आहे. तसेच शीतगृह कंटेनरची या ठिकाणी व्यवस्था असल्यामुळे निर्यात योग्य शेतीमाल व फळांची नासाडी होणार नाही. परिणामी, वाहतूक खर्चात बचत होईल.

विदर्भातील उद्योग व्यापार संघटना, लघू उद्योग असो.,चेंबर ऑफ कॉमर्स, विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशन या सर्व उद्योग संघटनांनी यावर परिसंवाद घ्यावा. येथे राज्य शासनाने औद्योगिक क्षेत्र स्थापन करावे, असे सांगून महाराष्ट्र गृहनिर्माण महामंडळ, महाराष्ट्र औद्योगिक गुंतवणूक महामंडळ-सीकॉम यांच्या माध्यमातून सिंधीला स्मार्ट बनवून स्थानिकांना रोजगारामध्ये प्राधान्य देण्याबात नियोजन करावे. पूर्व विदर्भात मत्स्य शेतीला वाव असल्यामुळे निर्यातीच्या संधी उपलब्ध होतील. त्यासाठी संबंधित विभागाने पुढाकार घ्यावा. विदर्भात संत्रा उत्पादकांनाही याचा फायदा होईल, असेही गडकरी म्हणाले.


इतर बातम्या
नवीन ११४० कृषिपंपांना जोडण्या ः पडळकरनांदेड : ‘‘राज्य शासनाने सुरू केलेल्या कृषिपंप...
नाशिक: किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत...नाशिक: खरीप पणन हंगाम २०२१-२२ मध्ये केंद्र...
सांगली जिल्ह्यात बाधित पिकांचे पंचनामे...सांगली ः जिल्ह्यात गेल्या पाच ते सहा दिवसांपूर्वी...
जळगाव : नावासह पत्ता दुरुस्तीसाठी  ६५...जळगाव : जिल्ह्यात मतदार यादी विशेष संक्षिप्त...
खानदेशात रब्बी पिकांची पेरणी रखडत जळगाव ः खानदेशात रब्बी पिकांची पेरणी रखडतच सुरू...
नाशिक : दुधाळ जनावरांच्या गटवाटप ...नाशिक : पशुसंवर्धन विभागामार्फत नावीन्यपूर्ण...
सोलापूर :सिद्धेश्‍वर कारखान्याला...सोलापूर ः कुमठे येथील श्री सिद्धेश्‍वर सहकारी...
राज्यामध्ये थंडीत वाढ होण्याची शक्यतापुणे : राज्याच्या किमान तापमानात घट होऊ लागली आहे...
मराठवाड्यात रब्‍बीत कपाशीची लागवडऔरंगाबाद : मराठवाडा म्हणजे कपाशीचा पट्टा. या...
मर रोगामुळे तुरीचे उभे पीक वाळू लागलेनांदेड : जिल्ह्यात अतिवृष्टीच्या तडाख्यातून...
बळिराजासाठी पोलिस आले धावूनसिरोंचा, गडचिरोली : शेतात पांढरे सोने, अर्थात...
आंदोलनातील शहिदांना आर्थिक भरपाई द्यावी...नवी दिल्ली ः कृषी कायद्यांविरोधातील शेतकरी...
आरक्षण नाही, तर मतदान नाही; ओबीसींचा...भंडारा : २७ टक्के ओबीसी आरक्षणाबाबत राज्य सरकारने...
सोयाबीन बाजारात हेलकावेपुणे ः पंधरा दिवसांपासून सोयाबीन बाजारात चढ-उतार...
नांदेड जिल्ह्यात फळपीक विमा मंजुरीची...नांदेड : मागील वर्षी मृग तसेच आंबिया बहरासाठी...
औरंगाबाद : जमिनीवरील अत्याचार थांबवू;...औरंगाबाद : आम्ही आमच्या गावातील जमिनीवर होणारे...
प्रोग्रेसिव्ह पॅनेलला  काठावरचे बहुमत पुणे ः पुणे बाजार समितीमधील भुसार व्यापाऱ्यांची...
उत्पादन खर्च वाढल्याने येवल्याची पैठणी...येवला, जि. नाशिक : राजवस्त्र, अर्थात येवल्याची...
रेशीम कोषाला सोनेरी दिवसपुणे : चालू वर्षी रेशीम कोषाला सोन्याचे दिवस आले...
पुणे :एकवीस जागांसाठी २९९ अर्जपुणे : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या...