जायकवाडीत दुपटीने आवक सुरू

जायकवाडीत दुपटीने आवक वाढली
जायकवाडीत दुपटीने आवक वाढली

औरंगाबाद : नाशिक, नगर जिल्ह्यातील घाटमाथा आणि पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या जोरदार पावसाने जायकवाडी प्रकल्पात होणारी पाण्याची आवक दुप्पट झाली आहे. नागमठाण प्रकल्पामधील पाण्याचा विसर्ग दुपटीने वाढला आहे. नांदूर मध्यमेश्वरमधून ८२७७३ क्यूसेकने सुरू असलेला विसर्ग सकाळी ७ च्या सुमारास कायम असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी दिली. नांदूर मधमेश्वर मधून ८३ हजार ७७३ क्युसेक, नागमठाण मधून ७५७५० क्यूसेकवर विसर्ग गोदावरीत पोहोचला आहे, तर भंडारदरामधून ६१५१क्युसेक, भावली मधून २१५२ क्युसेक, दारणामधून २६ हजार १५० क्युसेक, गंगापूर मधून ४५४६ क्युसेक, वालदेवीमधून ५०२ क्युसेक, कडवामधून ७ हजार ६५६ क्युसेक  तर ओझर वेअर मधून ४५७ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. वरच्या भागातील प्रकल्पांमधून सुरू असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे जायकवाडी प्रकल्पातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. 

शनिवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास जायकवाडी प्रकल्पात ३६९३३ क्यूसेकने आवक सुरू होती. ही आवक रविवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास  ५९ हजार १२६ क्युसेकवर पोहचली होती. १ जून पासून आजपर्यंत जायकवाडी प्रकल्पात ५४३.३७१ दलघमी (१९. १८ टीएमसी) पाण्याची आवक झाली. या आवकेमुळे जायकवाडीचा एकूण पाणीसाठा १०४५.९१८ दलघमी (३६.९३ टीएमसी ) वर पोहोचला. तर ३०७. ८१२ दलघमी ( १०.८६ टीएमसी)  प्रकल्पात जिवंत पाणीसाठ्याची साठवणूक झाल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी दिली. 

नाशिक भागात सुरू असलेला पाऊस पाहता नांदूर मध्यमेश्वर मधून पाण्याच्या विसर्गात वाढीची शक्यता आहे.त्यामुळे गोदावरीच्या पात्रातील पाण्यातही वाढीची शक्यता असल्याने वैजापूर, गंगापूर, पैठण तालुक्यातील गोदावरी काठच्या गावांमध्ये सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील कायगाव टोका परिसरात गोदावरीच्या पात्रात वाढलेल्या पाण्याचे परिणाम रविवारी सकाळीच पाहायला मिळाले. परिसरातील गोदावरीला मिळणार एक ओढा पात्र सोडून जवळपास बाराशे मीटर बाहेर सरकला होता. चाऱ्यासाठी गाळपेरा केलेली पीक पाण्याखाली येणे सुरू झाले होते. नदीपात्रातून सिंचन करणारे शेतकरी आपले मोटरपंप तर मच्छीमारही आपले साहित्य सुरक्षित स्थळी हलवीत होते.    

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com