Agriculture news in marathi Dudhna river floods, water in crops | Agrowon

दुधना नदीला पूर, पिकांत पाणीच पाणी

टीम अॅग्रोवन
बुधवार, 23 सप्टेंबर 2020

परभणी : सेलू तालुक्यातील ब्रम्हवाकडी येथील निम्न दुधना धरणात पाणलोट क्षेत्रातून आवक वाढल्यामुळे सोमवारी (ता.२२) धरणाच्या १४ दरवाजाव्दारे २५ हजारांवर क्युसेक्सने विसर्ग सुरु केला.

परभणी : सेलू तालुक्यातील ब्रम्हवाकडी येथील निम्न दुधना धरणात पाणलोट क्षेत्रातून आवक वाढल्यामुळे सोमवारी (ता.२२) धरणाच्या १४ दरवाजाव्दारे २५ हजारांवर क्युसेक्सने विसर्ग सुरु केला. त्यामुळे नदीला आलेल्या महापूराचे पाणी शेतात शिरले. परिणामी, सेलू, मानवत, जिंतूर, परभणी तालुक्यातील पिकांचे मोठे नुकसान झाले.

पाण्याची आवक कमी झाल्यामुळे १२ दरवाजे बंद करुन मंगळवारी (ता.२२) दुपारी दोन दरवाजांव्दारे ३ हजार क्युसेक वेगाने विसर्ग सुरु होता, असे सूत्रांनी सांगितले.
जालना जिल्ह्यातील परतूर, मंठा तालुक्यातील अनेक मंडळांमध्ये गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरु आहे.

विसर्ग सोडल्याने केदार वाकडी, मोरेगाव, खुपसा, ब्राम्हणगाव, राजवाडी, वलंगवाडी, डुगरा, सोन्ना, खादगाव,  टाकळी निलवर्ण, मंगरुळ, सावंगी मगर, इरळद,कोथाळा,राजुरा, शेवडी, वडगाव ईक्कर, दुधनगाव, काष्टगाव, पिंपळगाव गायके,कुंभारी , कुंभारी बाजार, जवळा, मांडवा गावांत शेतामध्ये पाणी शिरले. त्यामुळे पिके पाण्याखाली गेली. शेतकऱ्यांनी भरपाईची मागणी केली.

पुराच्या पाण्याच्या प्रवाहाचा वेग खूप होता. त्यामुळे नदी काठच्या शेतातील जमिनी खरडून गेल्या. त्यामुळे सोयाबीन, कपाशी, तसेच अन्य पिकांचे शंभर टक्के नुकसान झाले. पंचनामे करुन तत्काळ नुकसान भरपाई द्यावी.
- ज्ञानेश्वर सिध्दनाथ, शेतकरी, कोथाळा, ता. मानवत, जि. परभणी

पुराच्या पाण्यामुळे फळबागा, पिके पाण्याखाली गेल्यामुळे मोठी हानी झाली. आता भरपाई द्यावी.
- प्रभारकर चव्हाळ, मोरेगाव, ता. सेलू, जि. परभणी


इतर ताज्या घडामोडी
किसान रेल्वेने सांगलीतून हळद जाणार इतर...सांगली ः किसान रेल्वेतून शेतकऱ्यांसह, उद्योग आणि...
वऱ्हाडात पीएम किसानचे साडे तेरा कोटी...अकोला ः पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेच्या मदतीस...
चिपळूणात साडेसात हजार शेतकऱ्यांना...रत्नागिरी ः परतीच्या पावसाने चिपळूण तालुक्यातील...
रिसोड बाजारात सोयाबीनची विक्रमी आवकवाशीम ः रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सोलापूर जिल्ह्यात मदतीसाठी ३३५ कोटींची...सोलापूर : अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे जिल्ह्यातील...
अकोल्यात शेतकरी करणार दोन लाख क्विंटल...अकोला ः गेल्या काही हंगामापासून सोयाबीन...
संत गाडगेबाबा सूतगिरणी सुरू करावी ः...अमरावती : कापूस उत्पादकांना दिलासा देण्यासाठी...
पुणे जिल्ह्यातील सगळी धरणे तुडूंबपुणे ः चालू वर्षी ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये...
भंडाऱ्यात ७९ धान खरेदी केंद्रांना मंजुरीभंडारा ः केंद्र सरकारच्या किमान आधारभूत खरेदी...
सोलापूर जिल्ह्यात रास्त भाव दुकानांना...सोलापूर : ‘‘जिल्ह्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा...
खानदेशात ३१ हजार हेक्टरवर गव्हाची पेरणी...जळगाव ः खानदेशात यंदा गव्हाची पेरणी सुमारे दोन...
परभणी जिल्ह्यात सतरा हजार क्विंटल...परभणी : ‘‘यंदाच्या रब्बी हंगामातील पेरणीसाठी...
शेतकऱ्यांना सरकारकडून मदतीची प्रतीक्षातऱ्हाडी, जि. धुळे : वरुणराजाच्या लहरीपणामुळे पिके...
नाशिक जिल्ह्यात लिलाव बंदमुळे शेतकरी...नाशिक : मागील वर्षी हवामान बदल, अवकाळी पाऊस व...
‘कृषी स्वावलंबन योजनेसाठी ऑनलाइन अर्ज...परभणी : ‘‘बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना आणि डॉ....
सोयाबीन बियाणे विक्रेत्यांविरुध्द ...अकोला ः यंदाच्या खरिपात सोयाबीन बियाणे उगवले...
शोषणाविरोधात एकवटले संत्रा उत्पादक अमरावती : व्यापाऱ्यांचा शोषणाविरोधात एल्गार...
कांदा साठा मर्यादा वाढविण्याची मागणी नाशिक: कांदा साठा मर्यादा घालून दिल्याने...
दुधाळ जनावरांच्या व्यवस्थापनाची सूत्रेगोठ्याच्या भोवतालच्या परिसरात दलदल आणि जास्त गवत...
पौष्टिक चाऱ्यासाठी बरसीम लागवड ठरते...द्विदल हिरव्या चाऱ्याची उपलब्धता हा...