पाण्याच्या उपलब्धतेमुळे उन्हाळी पिकांच्या क्षेत्रात वाढ

गेल्या वर्षी झालेल्या चांगल्या पावसामुळे पुणे विभागात अजूनही पाण्याची उपलब्धता चांगली आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांनी उन्हाळी हंगामातील पिकांवर भर दिला आहे.
पाण्याच्या उपलब्धतेमुळे उन्हाळी पिकांच्या क्षेत्रात वाढ Due to the availability of water Increase in summer crop area
पाण्याच्या उपलब्धतेमुळे उन्हाळी पिकांच्या क्षेत्रात वाढ Due to the availability of water Increase in summer crop area

पुणे : गेल्या वर्षी झालेल्या चांगल्या पावसामुळे पुणे विभागात अजूनही पाण्याची उपलब्धता चांगली आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांनी उन्हाळी हंगामातील पिकांवर भर दिला आहे. चालू वर्षी उन्हाळी हंगामातील सरासरी क्षेत्राच्या १९ हजार २७३ हेक्टरपैकी २८ हजार ७६७ हेक्टर म्हणजेच १४९ टक्के पेरण्या झाल्या आहेत. यात प्रामुख्याने उन्हाळी बाजरी, मका, भुईमूग या पिकांच्या समावेश असल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

 यंदा अवकाळी व पूर्वमोसमी पावसाचा फटका रब्बी हंगामातील पिकांना बसला आहे. त्यामुळे उत्पादनात काही प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे. त्यातच गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये झालेल्या परतीच्या जोरदार पावसामुळे पाणीपातळीत चांगलीच वाढ झाली आहे. यामुळे विहिरीची व बोअरवेलची पाणीपातळी चांगलीच वाढली होती. एप्रिलचे १५ दिवस ओलाडून गेले असले तरी अजूनही टँकर सुरू झालेले नाही. त्यामुळे उन्हाळ्यातील पिके घेणे सहज शक्य लक्षात आल्याने शेतकऱ्यांनी उन्हाळी पिकांवर भर दिला आहे.  

रब्बी हंगामात काहीसा कमी झालेला उपशामुळे अजूनही पाण्याची चांगली आहे. दुष्काळी भागातही काही प्रमाणात टंचाई भासू लागली आहे. मात्र, तिथे शेतकरी पिके घेतली नसल्याचे चित्र आहे. पाण्याची सुविधा असलेल्या भागात शेतकऱ्यांनी काही प्रमाणात पिकांच्या पेरण्या केल्या आहेत. विभागात उन्हाळी मक्याची दहा हजार ३०५, बाजरी ३६७०, उन्हाळी मूग २४४, भुईमूग ९१५७ हेक्टरवर पेरणी  केली आहे.

विभागात गेल्या काही वर्षांपासून उन्हाळ्यात चारा टंचाईचा मोठा प्रश्न उद्भवत आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात चारा पिकांची पेरण्याकडे वळू लागले आहे. नगर जिल्ह्यामध्ये उन्हाळी हंगामातील उन्हाळी मका व भुईमूग पिकांच्या अल्प पेरण्या झाल्या असून, पेरणी झालेली पिके वाढीच्या अवस्थेत आहे.

पुणे जिल्ह्यामध्ये उन्हाळी हंगामातील उन्हाळी बाजरी व भुईमूग पिकांच्या थोड्याफार प्रमाणात पेरण्या झाल्या आहेत. बाजरी, भुईमूग पिके वाढीच्या अवस्थेत आहे. जिल्ह्यात हवेली, भोर, जुन्नर, खेड, आंबेगाव, शिरूर, बारामती, इंदापूर, दौड या तालुक्यात पेरणी झाली आहे. सोलापूरमध्ये उन्हाळी हंगामातील उन्हाळी मका व भुईमूग पिके वाढीच्या अवस्थेत आहे. जिल्ह्यात उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, बार्शी, पंढरपूर, माळशिरस  तालुक्यात काही प्रमाणात पेरण्या झाल्या आहेत.

जिल्हानिहाय झालेली पेरण्या (हेक्टरमध्ये)     

        जिल्हा   सरासरी क्षेत्र पेरणी झालेले क्षेत्र टक्के
नगर   ४४७१  ८१८४ १८३
पुणे ८५७३ ८१५१ ९५
सोलापूर  ६२३० १२,४३  २००
एकूण  १९,२७३ २८७६७ १४९

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com