agriculture news in marathi, Due to the closure of the auction, market committees inward pausing | Agrowon

लिलाव बंदमुळे बाजार समित्यांतील आवक ठप्पच
टीम अॅग्रोवन
बुधवार, 5 सप्टेंबर 2018

बाजार समित्या सुरू कराव्यात. व्यापारी बांधवांनीदेखील अधिकाधिक दर शेतकऱ्यांना कसे मिळतील, यासाठी कार्यवाही करावी. बाजार समित्या सुरू ठेवाव्यात, अन्यथा दर कमी होतील. शेतकऱ्यांचे नुकसान होईल.
- एस. बी. पाटील, कृती समिती, चोपडा (जि. जळगाव)

जळगाव : कडधान्याला जे हमीभाव केंद्राने जाहीर केले, तेवढे दर खासगी बाजारात कुठेही नाहीत. त्या दरात खरेदी शक्‍यच नाही. हमीभावापेक्षा कमी दरात खरेदीसंबंधी हमीपत्र लिहिणे आणि कमी दरात खरेदीसाठी स्पष्ट सूचनांचे परिपत्रक शासनाने जारी करावे, असा मुद्दा बाजार समित्यांमधील अडतदार, व्यापारी उपस्थित करीत आहेत. परिणामी जिल्ह्यातील बहुतांश बाजार समित्यांमध्ये लिलावही बंद आहेत. त्यामुळे धान्याची आवक पूर्णपणे ठप्प आहे.  

जळगाव, पाचोरा, अमळनेर, चोपडा, चाळीसगाव, जामनेर या प्रमुख बाजार समित्या बंद अवस्थेत आहेत. लिलाव सुरू केव्हा होतील, याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे. जिल्ह्यात मुगाची मळणी जवळपास आटोपली आहे. त्याचे उत्पादन कमी असून हा माल अधिक दिवस घरात साठविता येणार नाही. हा शेतमाल कुठे विकायचा, असा मुद्दा शेतकरी उपस्थित करीत आहेत.

मूग, उडदाची खेडा खरेदी होत नाही. कारण या कडधान्याची फारशी मागणी देशातील बाजारात नसल्याचे अडतदारांचे म्हणणे आहे. पाच-सहा दिवसांपूर्वी मुगाची भुसावळ, जामनेर बाजारात आवक झाली होती. लिलावही सुरू झाले. पाच हजार रुपये प्रतिक्विंटलने खरेदीही झाली. परंतु हमीभावापेक्षा कमी दरात खरेदी केल्यास दंड व कैदेची शिक्षा होईल, अशी भीती व्यापाऱ्यांमध्ये वाढली. शिक्षेबाबत आदेश वा परिपत्रक निघालेले नाही, असे जळगाव बाजार समितीने व्यापाऱ्यांना सांगितले. पण तरीही व्यापाऱ्यांनी खरेदी सुरू केलेली नाही. चोपडा, जळगाव, पाचोरा, अमळनेर येथे लिलाव ठप्प आहेत. आता उडदाची मळणी सुरू झाली आहे. त्याची आवक पोळा सणानंतर वाढेल. तोपर्यंत बाजार समित्या सुरळीत झाल्या नाहीत, तर शेतमालाच्या दरांवरील दबाव वाढू शकतो, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

इतर बातम्या
बटाटा, टोमॅटोतील उशिरा येणाऱ्या करपा...बटाटा आणि टोमॅटो यांसारख्या पिकांमध्ये प्रचंड...
राज्यातील ३४ जिल्हा परिषद अध्यक्षपदाची...मुंबई ः राज्यातील ३४ जिल्हा परिषद अध्यक्षपदाची...
भारत 'या' देशाला देणार कापूस...नागपूर ः मुस्लिम बहूल असलेल्या अझरबैजान देशातील...
कांदा घेऊन जाणाऱ्या ट्रक ड्रायव्हरची...नाशिक : परराज्यांत होणाऱ्या कांद्याच्या...
हमीभाव खरेदी केंद्रावर आली वजनकाटे...अकोला ः शासनाने या हंगामात सुरु केलेल्या आधारभूत...
मराठवाड्यात रब्बी पेरणीला मिळेना गती लातूर : मराठवाड्यातील रब्बी पेरणीची गती...
परभणी जिल्ह्यात कापूस वेचणीसाठी...परभणी : जिल्ह्यात यंदाच्या हंगामात सद्य:स्थितीत...
अरुणा प्रकल्पग्रस्तांनी मांडले...सिंधुदुर्ग : आयुक्त कार्यालयावर ‘दे धडक बेधडक’...
पाण्याच्या निचऱ्यासाठी गादीवाफ्यावर धान...भंडारा ः‘पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा...
अस्मानीमुळे नुकसान सोसवेना, चालविली...नाशिक : अगदी प्रतिकूल परिस्थितीत भांडवल जमा करून...
अचूक सांख्यिकीमुळे शेती उत्पन्न वाढविणे...नवी दिल्ली: बदलत्या हवामानाच्या आव्हानावर...
साखर उद्योगाने मूल्यपदार्थांकडे वळणे...पुणे: देशाच्या ग्रामीण अर्थकारणात मोलाचा वाटा...
पुणे जिल्हा परिषदेत येणार ‘महिला राज’पुणे  : जिल्हा परिषदेच्या नवीन अध्यक्ष...
पुणे बाजार समितीत रताळ्यांची २० टन आवक...पुणे  ःकार्तिकी एकादशीनिमित्ताने पुणे बाजार...
देशात कापूस उत्पादन घटणारजळगाव ः देशात सर्वाधिक कापूस उत्पादित करणाऱ्या...
कशामुळे घटले साताऱ्यातील स्ट्राॅबेरीचे...सातारा  ः जिल्ह्यात अतिपावसाचा फटका...
राष्ट्रीय कृषिमुल्य आयोगासमोर ऊस...पुणे : कायद्यातील उणिवांचा फायदा घेत ऊस उत्पादक...
साताऱ्यात पुढील वर्षी सहकारी संस्थांची...सातारा  : आगामी वर्ष हे सहकारातील विविध...
नगर जिल्हा परिषदेतही वाहताहेत...नगर ः राज्यात एकीकडे भाजपला सत्तेपासून दूर...
नुकसानग्रस्तांसाठीचे दोन हजार कोटी...मुंबई: राज्यातील ३४ जिल्ह्यांतील ३२५ तालुक्‍...