Agriculture news in marathi Due to cloudy weather Decrease in temperature in Solapur | Agrowon

ढगाळ वातावरणामुळे सोलापुरात तापमानात घट

टीम अॅग्रोवन
सोमवार, 12 एप्रिल 2021

यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वाधिक ४१.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद ५ एप्रिलला झाली. उन्हाचा कडाका वाढला की ढगाळ वातावरण होत असल्याचा आजपर्यंतचा अनुभव आहे.

सोलापूर  : यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वाधिक ४१.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद ५ एप्रिलला झाली. उन्हाचा कडाका वाढला की ढगाळ वातावरण होत असल्याचा आजपर्यंतचा अनुभव आहे. आज सोलापूर शहर व परिसरात ढगाळ वातावरण राहिल्याने कमाल तापमानात घट झाली. आज सोलापूर शहर व परिसरात ३८ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.

गेल्या काही दिवसांपासून सोलापूर शहर व परिसरातील तापमानाची कमालीचा चढउतार होत आहे. एप्रिलमध्ये आतापर्यंत सर्वात कमी ३४.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद ८ एप्रिलला झाली तर सर्वाधिक ४१.७ अंश सेल्सिअसची नोंद ५ एप्रिलला झाली. अवघ्या दहा दिवसांमध्ये सोलापूर शहर व परिसरातील वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. सोलापूर शहर व परिसरात १४ एप्रिलपर्यंत ढगाळ वातावरण राहिल. या दरम्यान मध्यम ते हलका पाऊस होईल, असा अंदाजही भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे. काही शेतकऱ्यांची द्राक्ष अद्यापही काढायची शिल्लक आहेत. ढगाळ वातावरण व अवकाळी पावसाच्या शक्‍यतेने द्राक्ष उत्पादकांची चिंता वाढली आहे.

एप्रिलमध्ये ४२ ते ४३ अंश सेल्सिअस
सोलापूर शहर व परिसरात एप्रिलमध्ये सरासरी ४२ ते ४३ अंश सेल्सिअस दरम्यान, कमाल तापमान रहात असल्याचा आजपर्यंतचा अनुभव आहे. एप्रिलमध्ये सर्वाधिक ४४.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद २२ एप्रिल २०१६ मध्ये झालेली आहे. एप्रिलमध्ये पाऊसही झाल्याच्या नोंदी आहेत. एप्रिलमध्ये एकाच दिवशी सर्वाधिक ५२.४ मिलीमीटर पाऊस १३ एप्रिल १९९६ रोजी झाल्याचीही नोंद आहे.


इतर ताज्या घडामोडी
सोयाबीन पेंडची आयात शुल्काविना करावीनागपूर : भारतात सोयाबीन पेंडचे दर गगनाला...
दूधदरात पुन्हा दोन रुपयांची कपातनगर ः कोरोना संसर्ग वरचेवर वाढत असल्याने लॉकडाउन...
देशातील पहिले कृषी निर्यात मार्गदर्शन...पुणे ः राज्यातील शेतकरी व उदयोन्मुख...
उत्तर भारतातील कापूस लागवड पूर्णत्वाकडेजळगाव ः देशात उत्तर भारतातील कापूस लागवडीने वेग...
कृषी खात्यातील बदल्या लांबणीवरपुणे ः ऐन कोरोना कालावधीत बदल्यांचा घाट रचलेल्या...
खाद्यतेल दरात गतवर्षीपेक्षा ८० टक्के वाढनागपूर : शेंगदाण्याची निर्यात तसेच पाम तेलावरील...
पूर्व विदर्भात ४५ लाख क्विंटल धान खराब...गोंदिया : भात उत्पादक पूर्व विदर्भातील पाच...
पशुवैद्यक करणार घरपोच सेवा बंदनागपूर : पशुवैद्यकांना फ्रंटलाइन वर्कर्स व कोरोना...
सोयाबीन बियाणे निर्बंध मध्य प्रदेशकडून...पुणे ः परराज्यांत सोयाबीन बियाणे विक्रीवर निर्बंध...
‘महाबीज’चे सोयाबीन बियाणे दर ‘जैसे थे’अकोला : खरीप हंगामासाठी ‘महाबीज’ने सोयाबीन...
देशाच्या तुलनेत निम्मी साखर एकट्या...कोल्हापूर : देशाच्या साखरनिर्यात कोट्यापैकी जवळ...
‘गोकुळ’चा कल सत्तांतराकडेकोल्हापूर : अत्यंत चुरशीने झालेल्या कोल्हापूर...
‘सह्याद्री’च्या पर्वतरांगेमधून...नाशिक : सह्याद्रीच्या पर्वतरांगेत पश्‍चिम घाट...
राज्यात आंब्याचा हंगाम ऐन बहरातअकोल्यात बदाम आंबा ४००० ते ४५०० रुपये क्विंटल...
सोशल मीडियाद्वारे ६५ टन कलिंगड विक्रीपुणे : कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी एप्रिल...
मध्य प्रदेश सरकारकडून बियाणे विक्रीवर...पुणे ः सोयाबीन बीजोत्पादनात देशात सर्वात मोठा...
पशुखाद्य निर्मितीचा कच्चा माल दुपटीने...सांगली : पशुखाद्य तयार करण्यासाठी लागणाऱ्या...
दक्षिण भागात गारपिटीची शक्यतापुणे :  गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा चटका...
परभणी जिल्ह्यात कडक निर्बंध लागूपरभणी ः  कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी...
परभणी जिल्ह्यात लघु तलावांत सरासरी १९...परभणी ः वाढते तापमान, बाष्पीभवनाचा वाढलेला वेग,...