Agriculture News in Marathi Due to continuous rain Soybean crisis in Risod | Page 2 ||| Agrowon

सततच्या पावसामुळे  रिसोडमध्ये सोयाबीन संकटात 

टीम अॅग्रोवन
शनिवार, 25 सप्टेंबर 2021

तालुक्यात २० सप्टेंबरपासून सतत पाऊस पडत असल्याने काढणीला आलेले सोयाबीन पीक संकटात सापडले आहे. त्यामुळे यंदाही मागील वर्षासारखी पिकाची नासाडी होण्याची शक्यता आहे. 

रिसोड, जि. वाशीम : तालुक्यात २० सप्टेंबरपासून सतत पाऊस पडत असल्याने काढणीला आलेले सोयाबीन पीक संकटात सापडले आहे. त्यामुळे यंदाही मागील वर्षासारखी पिकाची नासाडी होण्याची शक्यता निर्माण झाली असल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. पेरणीचा खर्चही निघणे कठीण झालेले असल्याचे काही शेतकरी सांगत आहेत. 

जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पेरणी केलेले सोयाबीन सध्या काढणीला आले असून, काही ठिकाणी सोयाबीन सोंगणीचे काम सुरू झालेले आहे. परंतु ऐन काढणीच्या हंगामात गेल्या तीन दिवसांपासून सतत सुरू असलेल्या पावसामुळे व शेतात पाणी साचल्यामुळे काढणीला आलेले सोयाबीन खराब होण्याच्या मार्गावर आहे. मागील वर्षीही काढणीच्या हंगामात पावसाने धुमाकूळ घातल्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. मे महिन्याच्या शेवटी व जून महिन्यात सोयाबीनच्या भावाने दहा हजारांचा टप्पा गाठला होता.

यंदा तालुक्यात सोयाबीनचा पेरा मोठ्या प्रमाणात असून, सोयाबीनची पीकही चांगले आले आहेत. भावही चांगला मिळणार असल्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. परंतु पावसाने धुमाकूळ घातल्यामुळे काढणीला आलेले पीक संकटात सापडले आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. 

प्रतिक्रिया

मागील वर्षीप्रमाणे यंदाही सोयाबीन काढणीला सुरुवात होताच पाऊस धुमाकूळ घालत आहे. हातातोंडाशी आलेले सोयाबीन खराब झाले आहे. काही शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाचा विमा काढला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीबाबत काही तासांत संबंधित कंपनीला कळवायचे असते. परंतु ग्रामीण भागात भ्रमणध्वनीमध्ये प्रचंड अडचणी येत आहेत. त्यामुळे शेतकरी अगदी मेटाकुटीस आलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट पीकविमा द्यावा अशी, मागणी राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली आहे. 
-घनश्याम मापारी, सचिव, सरपंच संघटना, रिसोड 

प्रतिक्रिया

दहा एकरांमधील सोयाबीन काढणीला आले आहे. दोन एकर सोयाबीनची काढणी झाली आहे. पावसामुळे शेतात पाणी साचले आहे. पावसाने उघडीप दिली नाही, तर उपटून ठेवलेले सोयाबीनही खराब होणार आहे. 
-बद्री रंजवे, शेतकरी, भोकरखेडा  


इतर बातम्या
पावसाला पोषक हवामानामुळे किमान तापमानात...पुणे : पावसाने उघडीप दिल्यानंतर राज्याच्या किमान...
वीजप्रश्नी संतप्त शेतकरी  महावितरण...नाशिक : महावितरण कंपनीकडून सटाणा तालुक्यात थकीत...
कापूस खेडा खरेदी करणाऱ्या ...बुलडाणा ः खेडा खरेदीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना...
कडुलिंबाची झाडे वाळू लागली पुणे नगर ः नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील...
राज्यातील १२१ आदिवासी  आश्रमशाळा होणार...पुणे ः शिक्षण व्यवस्थेमधील बदलांना सामोरे जात...
लाल कांद्याला उन्हाळच्या  तुलनेत मिळतोय...नाशिक : दिवाळीनंतर जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार...
नगर पंचायतींच्या निवडणुकांची रणधुमाळी...पुणे नगर ः राज्यातील मुदत संपलेल्या परंतु,...
सत्तावीस हजार सहकारी संस्थांच्या ...पुणे ः राज्यातील कृषी पतसंस्था, बहुउद्देशीय...
‘बेरीज् एक्सलन्स सेंटर’ उभारणीसाठी ...सातारा ः स्ट्रॅाबेरी मातृ रोपांवरील आयात शुल्क...
शेतकरी उत्पन्न दुपटीच्या बैठकीला २३... नवी दिल्ली ः संसदेच्या कृषी विषयक स्थायी...
दिवाळी सुटीनंतरच्या बेदाणा  सौद्यात...सांगली ः दिवाळीच्या सुटीनंतर सांगली कृषी उत्पन्न...
स्टॉक लिमिटला नकार;  सोयाबीन बाजाराला...पुणे ः राज्य सरकारने सोयाबीनवर स्टॉक लिमिट लावणार...
भात खरेदीच्या जाचक अटीतून शेतकऱ्यांना...सिंधुदुर्गनगरीः ज्या शेतकऱ्यांच्या सात-बारामध्ये...
बीज प्रक्रियेसाठी यंत्राचा वापर वाढलावाशीम : शेतकऱ्यांमध्ये बीजप्रक्रियेचे महत्त्व...
सांगलीत कृषिपंपांची वीजजोड तोडणी सुरुसांगली ः कृषिपंपांच्या वीज बिल वसुलीसाठी...
सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचे तीन...पुणे ः सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या...
फेरफार नोंदीत पुणे जिल्हा आघाडीवरपुणे ः शेत जमिनी खरेदी विक्री दरम्यान अंत्यत...
सोलापूर जिल्ह्यात खरिपातील पीक ...सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात यंदाच्या खरीप...
पुसदमध्ये ५००० क्विंटल कापसाचीच खरेदीआरेगाव, जि. यवतमाळ : यंदा सुरवातीपासूनच कापसाला...
धुळे : सोयाबीन बीजोत्पादनात सहभाग...धुळे : ‘‘उन्हाळी हंगाम २०२१-२२ मध्ये महाबीज...