Agriculture news in marathi Due to corona restrictions Obstacles to peak debt allocation | Page 2 ||| Agrowon

कोरोनाच्या निर्बंधांमुळे पीककर्ज वाटपात अडथळे

टीम अॅग्रोवन
बुधवार, 12 मे 2021

आगामी खरीप हंगामासाठी आता अवघे काही दिवसच शिल्लक राहिलेले असताना पीककर्ज मिळण्याच्या मार्गात मोठ्या प्रमाणात अडथळे तयार होत आहेत.  बँकांही बंद ठेवण्यात आल्याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसू लागला आहे.

अकोला : आगामी खरीप हंगामासाठी आता अवघे काही दिवसच शिल्लक राहिलेले असताना पीककर्ज मिळण्याच्या मार्गात मोठ्या प्रमाणात अडथळे तयार होत आहेत. कोरोना रोखण्यासाठी लावलेल्‍या कडक निर्बंधांमुळे आता तर बँकांही बंद ठेवण्यात आल्याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसू लागला आहे.

वऱ्हाडात अकोला, वाशीम जिल्ह्यात ९ ते १५ मे या काळात हे निर्बंध लावण्यात आले. तर बुलडाणा जिल्हयात २० मे पर्यंत संचारबंदी लावण्यात आली. प्रशासनाने या वेळी केवळ निर्बंध जाहीरच केलेले नसून, त्याची कठोर अंमलबजावणी सुरू केली. या काळात शासकीय कार्यालये जनतेसाठी बंद ठेवण्यात आली आहेत. या तुघलकी निर्णयांचा त्रास शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे.

येत्या हंगामासाठी पीककर्ज काढण्यासाठी शेतकऱ्यांना कागदपत्रे हवी असतात. आता गावागावांत महसूल, ग्रामपंचायत विभागांचे अधिकारी, कर्मचारी कोरोना उपाययोजनांच्या अंमलबजावणीला लागलेले आहेत. शेतकऱ्यांना या काळात कुठलाही दाखला सध्या उपलब्ध होत नाही. शिवाय बँकांमध्येही सामान्य नागरिकांना प्रवेश बंद करण्यात आलेले आहेत. अशा परिस्थितीत पीककर्जासाठी किमान १५ दिवस आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्यातच कोरोनाचे हे निर्बंध वाढविल्या गेल्यास आणखी परिस्थिती चिंता वाढविणारी ठरणार आहे. 

पीककर्ज काढण्यासाठी काही बँकांकडून शेतकऱ्याला कर्ज नसल्याचे दाखले, सातबारा, नमुना आठ, लाखावरील रक्कम असेल तर स्टॅम्प पेपर, आधार व इतर कागदपत्रे मागितली जातात. ही कागदपत्रे मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना एक-दोन वेळा तालुक्यांना गेल्याशिवाय पर्याय नाही. सध्या शासकीय कार्यालये तर बंद आहेतच शिवाय संचारबंदी असल्याने फिरणेही बंद झालेले आहे. या उपाययोजना पीककर्ज काढण्यासाठी कागदपत्रे गोळा करणाऱ्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने मारक बनलेल्या आहेत.

अकोला, वाशीममध्ये जिल्हा बँकेने पीककर्ज वाटपात आघाडी घेतली. मात्र, राष्ट्रीयकृत बँकांच्या वाटपाला गती आलेली नाही. बुलडाणा जिल्ह्यात तर पीककर्ज वाटपाचा सर्वच भार हा राष्ट्रीयकृत बँकांवर अधिक असल्याने तेथे अधिक बिकट परिस्थिती आहे. यातून प्रशासनाने योग्य मार्ग काढण्याची गरज शेतकरी व्यक्त करीत आहेत.


इतर बातम्या
सोमवारपासून पावसाचा प्रभाव कमी होणार पुणे : दक्षिण कोकण व मध्य महाराष्ट्रात पावसाने...
कृषी परिषदेत संचालक नेमण्यासाठी मुहूर्त...पुणे ः राज्याच्या कृषी संशोधनाला चालना देण्यासाठी...
कोकणात जोरदार पाऊसपुणे : कोकणातील बहुतांशी भागांत पावसाने चांगलेच...
अमरावती विभागात कर्जवाटपात...यवतमाळ : पीककर्ज वाटपासाठी शासनाने बँकांना...
आदिवासींच्या जमिनींचा शोध घेण्यासाठी ‘...बुलडाणा : संग्रामपूर तालुक्यातील चिचारी येथील...
‘एफआरपी’चा अभ्यास सुरू पुणे ः राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिल्या...
‘क्रॉपसॅप’ प्रकल्पात १७ पिकांचा समावेश पुणे ः राज्यात यंदा पिकांवरील कीड-रोग सर्वेक्षण व...
यवतमाळमध्ये ६५ लाखांचे बोगस बीटी...यवतमाळ : जिल्ह्यात खरिपाची लगबग सुरू आहे. याचा...
काळ्याफिती लावून किसानपुत्रांचे आंदोलनआंबेजोगाई, जि. बीड : किसानपुत्र आंदोलनाच्या...
हमीभावाने एक हजार क्विंटल मका खरेदीऔरंगाबाद : आधारभूत किमतीने शेतीमाल खरेदी...
नांदेडमध्ये खरीप पेरणी सुरूनांदेड : जिल्ह्यात जून महिन्याच्या प्रारंभापासून...
‘पशुसंवर्धन’च्या योजनांसाठी केंद्राकडून...पुणे ः पशुसंवर्धनाबरोबरच दूध आणि प्रक्रिया उद्योग...
पीककर्ज व्याज सवलत योजनेस ३० जूनपर्यंत...अकोला : शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी पेरणीच्या आधी...
पुणे जिल्ह्यातील आठवडी बाजार बंदचपुणे : ग्रामीण भागातील अर्थ व्यवस्थेचा कणा असलेले...
औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यांत तीन...औरंगाबाद : यंदाच्या खरीप हंगामात १५ जून...
जळगाव जिल्ह्यातील कृषी केंद्रांची तपासणीजळगाव ः जिल्ह्यात कृषी केंद्रांमधील बियाणे साठा,...
नगरमध्ये साडेपाच हजार हेक्टरवर फळबाग... नगर : नगर जिल्ह्यात गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही...
मराठवाड्यात पीककर्ज वाटप धीम्या गतीनेच औरंगाबाद : मराठवाड्यात यंदाच्या खरीप हंगामासाठी...
कोल्हापुरात पाऊस सुरूच; नद्यांच्या...कोल्हापूर : जिल्ह्याच्या बहुतांशी भागात पावसाच्या...
साखर कारखान्यांच्या कर्जांची चौकशी करानगर : शेतकऱ्यांना पीककर्ज द्यायचे झाल्यास अत्यंत...