नुकसानीमुळे पीककर्जाकडे शेतकऱ्यांचा कल 

Due to crop loss, farmers continue to take loans
Due to crop loss, farmers continue to take loans

पुणे ः अतिपावसामुळे खरीप पिकांचे नुकसान झाल्यामुळे शेतकरी चांगलाच अडचणीत आला आहे. यामुळे शेतकरी पुन्हा कर्ज घेऊन रब्बीची तयारी करू लागला आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने आत्तापर्यंत ६१५ कोटी १६ लाखांपैकी १९५ कोटी १९ लाख रुपयांचे वाटप केले आहे. सुमारे ३७ हजार १४१ शेतकऱ्यांना ३१ टक्के वाटप केले आहे, अशी माहिती बॅंकेच्या सूत्रांनी दिली. 

गेल्या वर्षी बॅंकेने ६५८ कोटी ८५ लाख ९६ हजार रुपयांचे उद्दिष्ट ठेवले होते. त्यापैकी ३३ हजार ९९५ शेतकऱ्यांना १८४ कोटी २१ लाख म्हणजेच २७ टक्के पीककर्जाचे वाटप केले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत चालू वर्षी दहा कोटी ९८ लाख १८ हजार रुपयांनी पीककर्जात वाढ झाली आहे. 

सध्या पुणे जिल्ह्यात सहकारी बॅंकेच्या सुमारे २५० हून अधिक अधिक शाखा आहेत. या शाखा गावपातळीवरील सहकारी सोसायट्यांना जोडल्यामुळे अनेक शेतकरी शाखामार्फत पीककर्ज घेतात. त्यातच पुणे जिल्हा सहकारी बॅंकेकडून तीन लाख रुपयांपर्यत शून्य टक्के व्याजदर, तर त्यापुढील रकमेस सहा टक्के व्याजदर आकारला जात आहे. मात्र, शून्य टक्के व्याजदराने कर्ज घेतल्यानंतर एक वर्षाच्या आतमध्ये फेडणे गरजेचे आहे. 

तीन लाख रुपयांहून अधिक कर्ज घेण्याकडे शेतकऱ्यांच प्रामुख्याने कमी असतो. बॅंकेकडून ऊस आणि टोमॅटो या पिकांसाठी शेतकरी मोठ्या प्रमाणात पीककर्ज घेतात. त्या तुलनेत कांदा, बटाटा, द्राक्षे, केळी, डाळिंब, आंबा, गुलाब, जरबेरा, कार्नेशन, ढोंबळी मिरची, बाजरी, भुईमूग या पिकांसाठी कर्ज घेण्याचे प्रमाण कमी असते.

तालुकानिहाय पीककर्जाचे उद्दिष्ट व झालेले वाटप, लाखात रुपये 
तालुका उद्दिष्ट वाटप टक्के 
आंबेगाव ४३४४.७६ ४५९६.७४ १०५ 
बारामती ७२६०.८८ ९२३.४१ १२ 
भोर २१६३.९९ ५२४.४६ २४ 
दौंड ९०४३.७२ ६३३.४९ ७ 
हवेली २२१९.५६ ४२२.११ १९ 
इंदापूर ९८४६.२४ ८६०.५८ ८ 
जुन्नर ५१३९.६१ ३७९२.६६ ७३ 
खेड ४७७२.६३ ४५४९.१३ ९५ 
मावळ २२०९.१५ १०७६.७९ ४८
मुळशी २१९४.४४ ८१४.९५ ३७ 
पुरंदर ३६८३.५२ ६९७.२३ १८ 
शिरूर ७५८०.८६  ५२२.०८ ६ 
वेल्हा १०५६.६४ १६०.९३ १५ 
एकूण ६१५१५.०० १९५१९.८५ ३१

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com