‘बीबीएफ’वरील लागवडीमुळे  पिकले १७ क्विंटल सोयाबीन 

अकोटपासून जवळच असलेल्या काळगव्हाण शिवारात संजय निचळ यांनी यंदाच्या हंगामात बीबीएफवर सोयाबीनची लागवड करून एकरी १७ क्विंटलपर्यंत उत्पादन काढले आहे.
 ‘बीबीएफ’वरील लागवडीमुळे  पिकले १७ क्विंटल सोयाबीन  Due to cultivation on ‘BBF’ Pickled 17 quintals of soybeans
‘बीबीएफ’वरील लागवडीमुळे  पिकले १७ क्विंटल सोयाबीन  Due to cultivation on ‘BBF’ Pickled 17 quintals of soybeans

अकोला ः अकोटपासून जवळच असलेल्या काळगव्हाण शिवारात संजय निचळ यांनी यंदाच्या हंगामात बीबीएफवर सोयाबीनची लागवड करून एकरी १७ क्विंटलपर्यंत उत्पादन काढले आहे. यंदा पावसाचे प्रमाण अधिक असूनही बीबीएफ तंत्रज्ञानामुळे पीक वाचले व चांगले उत्पादन झाले, असे निचळ यांनी सांगितले.  संजय निचळ यांनी सोयाबीनची १७ जूनला लागवड केली होती. लागवडीच्या वेळी बुरशीनाशक, कीटकनाशक व पीएचबीची बीज प्रक्रिया केली. पेरणीसोबतच तणनाशकाची फवारणी केली. त्यानंतर कंपोस्ट खत एकरी ५ बॅग, २०.२०.० एकरी एक बॅग, अशी खतमात्रा दिली. पिकाला दोन वेळा डवरणी आणि चार वेळा फवारण्या घेतल्या. प्रत्येक फवारणीमध्ये कीटकनाशकासह बुरशीनाशक तसेच सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर केला. सरी वरंबा पद्धतीमुळे जास्त पाऊस होऊनही पिकाचे नुकसान टाळता आले. पावसाचे अतिरिक्त पाणी वाहून गेले. ताणाच्या काळात बेडमुळे जमिनीतील ओलाव्याचा फायदा झाला. पिकाला हवा खेळती मिळाल्याने पोषण चांगले झाले. परिणामी, मोठ्या प्रमाणात शेंगा धरल्या. यामुळे सोयाबीनचा एकरी १७ क्विंटलपर्यंत उतारा लागल्याची माहिती निचळ यांनी दिली. (संजय निचळ, मो. ९४२३७६२६०१) 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com