Agriculture news in Marathi Due to declining production, the price of marigold flowers has gone up | Agrowon

उत्पादन घटल्याने झेंडूच्‍या फुलांनी खाल्ला भाव

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 27 ऑक्टोबर 2020

दसरा सणाच्या पार्श्वभूमीवर झेंडू फुलांना मोठी मागणी असते. मात्र, वादळी वाऱ्यासह झालेल्या परतीच्या पावसामुळे झेंडूच्या लागवडीचे नुकसान झाले. त्यामुळे दसरा बाजारात अपेक्षित आवक झाली नव्हती. परिणामी मागणी असल्याने झेंडू फुलांची उपलब्धता कमी असल्याने दरात तेजी असल्याचे पाहायला मिळाले.

नाशिक : दसरा सणाच्या पार्श्वभूमीवर झेंडू फुलांना मोठी मागणी असते. मात्र, वादळी वाऱ्यासह झालेल्या परतीच्या पावसामुळे झेंडूच्या लागवडीचे नुकसान झाले. त्यामुळे दसरा बाजारात अपेक्षित आवक झाली नव्हती. परिणामी मागणी असल्याने झेंडू फुलांची उपलब्धता कमी असल्याने दरात तेजी असल्याचे पाहायला मिळाले. मागील वर्षीच्या तुलनेत दर दुपटीने वाढले.

जिल्ह्यात चांदवड, नाशिक, इगतपुरी व सिन्नर तालुक्यातील शेतकरी झेंडूची लागवड करतात. मात्र, चालू वर्षी परतीच्या पावसाचा फटका बसला आहे. ऐन दसरा दिवाळीच्या तोंडावर झेंडू फुले खराब झाली. त्यामुळे हे नुकसान वाढून उत्पादन ९० टक्क्यांपर्यंत उत्पादन घटले. त्यामुळे बाजारात विक्रीसाठी शेतकऱ्यांनी स्वतः विक्री केल्याचे पाहायला मिळाले.

दसऱ्याला तोरण, वाहनांना माळ तसेच पूजा विधीसाठी फुलांना विशेष मागणी असल्याने उत्‍सवाच्‍या पूर्वसंध्येलाच शहरातील रविवार कारंजा, अशोकस्‍तंभ, पंचवटीतील गोदाकाठ परिसर, गाडगे महाराज पूल, द्वारका, आडगाव नाका, पेठ नाका अशा विविध भागांमध्ये फूलविक्रेत्‍यांची वर्दळ असते. मात्र, यंदा कमी दिसली. मागणीपेक्षा आवक  कमी असल्‍याने झेंडूसह अन्‍य विविध फुलांची दरात तेजीने विक्री सुरू होती. दरवर्षीच्‍या तुलनेत दरात वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दर अधिक मिळाला असला तरी नुकसान वाढल्याने आर्थिक गणित बिघडले आहे.

परतीच्या पावसाचा परिणाम
मागील पंधरवड्यात परतीच्या पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतमालाचे मोठे नुकसान झाले आहे.त्याचा फटका फुल शेतीदेखील झाल्याने नुकसान वाढले आहे. शहराप्रमाणे ग्रामीण भागातील बाजारात फुलांच्‍या किंमती अधिक राहिल्या. त्यामुळे फुलांच्या हारांचे व तोरणाचे दर अधिक असल्याने फुले खरेदीला पसंदी दिसून आली.

फुलांची आवक कमी होती. परिणामी दर अधिक होते. त्यात फुले खराब झाल्याने हार चढ्या दराने खरेदी करावे लागले.
- अमोल संगेवार, ग्राहक, नाशिक

दरात तेजी दिसून येत असली तरी नुकसान मोठे आहे. जे नियोजन दसरा बाजारासाठी केले होते. ते पावसामुळे नियोजन कोलमडले. त्यामुळे खर्चही वसूल होणार नाही, अशी स्थिती आहे.
- सुदाम काटे, झेंडू उत्पादक, मोह, ता. सिन्नर

असे मिळाले दर
फुले प्रतिशेकडा १५० ते ३०० रुपये
प्रतिक्रेट ४०० ते ७०० रुपये

 


इतर ताज्या घडामोडी
नाशिकमध्ये ‘स्वाभिमानी’चा रात्रभर...नाशिक  : दिल्लीत गेल्या सात दिवसांपासून...
सोलापूर जिल्ह्यातील ६५८...सोलापूर : जिल्ह्यातील मुदत संपलेल्या ६५८...
कसमादेत बायोगॅस संयंत्र उभारण्यास पसंती देवळा, जि. नाशिक : मृत कोंबडी पक्षांची...
नांदेडमध्ये ‘पणन’कडून कापसाची २६ हजार...नांदेड : महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक...
कृषी कायद्यांविरोधात जागरण आंदोलनपुणे ः केंद्र सरकारच्या नवीन कृषी आणि पणन...
परभणीत केंद्र सरकारविरुद्ध निदर्शनेपरभणी : शेतकरीविरोधी कायदे रद्द करण्याच्या...
निम्न दुधनाच्या दोन्ही कालव्यात पाणीपरतूर, जि. जालना ः ‘‘रब्बी हंगामातील...
औरंगाबादमध्ये `स्वाभिमानी’चे...औरंगाबाद : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा...
सोलापुरात ‘स्वाभिमानी’चा जागर सोलापूर : दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी...
धुळे- नंदुरबार मतदारसंघात पटेलांपुढे...धुळे ः विधान परिषदेच्या धुळे- नंदुरबार...
आश्वासनानंतर शेतकरी संघटनेचे आंदोलन...पुणे ः राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये...
साताऱ्यात स्वाभिमानी संघटनेचे रात्रभर...सातारा : कृषी विधेयकाविरोधात पंजाब आणि हरियाना...
सिंचनासाठी ‘वान’वरून जलवाहिनी उभारावीतेल्हारा, जि. अकोला ः शासनाने अगोदर सिंचनासाठी...
वहितीदारांना ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी...नांदेड : ‘‘शेती करताना विविध कारणांनी शेतकऱ्यांचा...
बीड जिल्ह्यात अडीच लाखांवर शेतकरी...बीड ः महाविकास आघाडी सरकारच्या महत्वकांक्षी...
काँग्रेसने ५८ वर्षांनी भेदला भाजपचा गडनागपूर : नागपूर पदवीधर मतदारसंघात ५८ वर्षांनी...
लाडांच्या घरात ५८ वर्षांनंतर आमदारकीसांगली : तास धरून काम करणाऱ्या हाडाच्या...
जमिनीची सुपीकता जपण्यासाठी जैवविविधतेचे...परभणी ः मातीची पर्यायाने शेत जमिनीची सजीवता,...
आघाडीने चारली भाजपला धूळपुणे ः महाविकास आघाडी म्हणून एकत्रित लढलेल्या...
रत्नागिरीत जमिनीमध्ये नत्र, स्फुरदचे...रत्नागिरी ः जिल्ह्यातील जांभ्या जमिनीत नत्रासह...