Agriculture news in Marathi Due to district blockade, 15,000 sugarcane laborers got stuck in Satara | Agrowon

जिल्हाबंदीमुळे १५ हजार ऊसतोड मजूर साताऱ्यात अडकले

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 17 एप्रिल 2020

सातारा : जिल्ह्यात प्रत्येक वर्षी ऊस गळीत हंगामासाठी येणारे ऊस तोडणी कामगार आता हंगाम संपत आल्याने परत जाण्याची तयारी करीत आहेत. पण, सध्या ‘कोरोना’मुळे लॉकडाऊन सुरू आहे. तसेच जिल्हाबंदी असल्याने या कामगारांना परत आपल्या घरी जाता येत नाही. त्यांचा मुक्काम कारखाना कार्यस्थळावरच आहे. जिल्ह्यात १५ हजार ऊसतोडणी कामगार अडकून पडले आहेत. काहींनी आपापल्या जिल्ह्यातील आमदारांशी संपर्क करून आम्हाला घरी येण्याची सोय करा, अशी विनंती करण्यास सुरुवात केली आहे. 

सातारा : जिल्ह्यात प्रत्येक वर्षी ऊस गळीत हंगामासाठी येणारे ऊस तोडणी कामगार आता हंगाम संपत आल्याने परत जाण्याची तयारी करीत आहेत. पण, सध्या ‘कोरोना’मुळे लॉकडाऊन सुरू आहे. तसेच जिल्हाबंदी असल्याने या कामगारांना परत आपल्या घरी जाता येत नाही. त्यांचा मुक्काम कारखाना कार्यस्थळावरच आहे. जिल्ह्यात १५ हजार ऊसतोडणी कामगार अडकून पडले आहेत. काहींनी आपापल्या जिल्ह्यातील आमदारांशी संपर्क करून आम्हाला घरी येण्याची सोय करा, अशी विनंती करण्यास सुरुवात केली आहे. 

जिल्ह्यातील ऊस गळीत हंगामात यावर्षी १४ साखर कारखान्यांनी सहभाग घेतला. यामध्ये सात सहकारी व सात खासगी कारखान्यांचा समावेश होता. ऊस तोडणीसाठी हंगाम सुरू होण्यापूर्वीच कामगारांचे करार होतात. या वर्षी जिल्ह्यात तब्बल ५० हजारांवर ऊसतोडणी कामगार विविध कारखान्यांच्या कार्यस्थळावर आले होते. यावर्षी ऊस गळीत हंगाम लांबला नाही. तरीही थोडाफार शिल्लक असलेल्या ऊस तोडणीचे काम करून सध्या ऊसतोडणी कामगार कारखाना कार्यस्थळावरच थांबले आहेत. 

सध्या ‘कोरोना’ची साथ असून, देशभर लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाता येत नाही. त्यामुळे हंगाम संपत आला तरी जिल्ह्यात सध्या शिल्लक राहिलेल्या १५ हजार ऊसतोडणी कामगारांना त्यांच्या जिल्ह्याकडे जाणे अवघड झाले आहे. सध्या जिल्हा प्रशासनाने ऊसतोडणी कामगारांची सर्व व्यवस्था त्या-त्या कारखान्याने करावी, अशी सूचना केली आहे. त्यामुळे हे कामगार कारखाना कार्यस्थळावरच थांबून आहेत. 

सध्या तीनच कारखान्यांचे गळीत सुरू आहे. त्यात अजिंक्‍यतारा, कृष्णा आणि सह्याद्री कारखान्यांचा समावेश आहे. पाच हजारांपेक्षा अधिक क्षमता असलेल्या साखर कारखान्यांकडे पाच ते सहा हजार ऊसतोडणी मजूर असतात. तर त्या आतील क्षमता असलेल्या कारखान्यांकडे तीन ते चार हजार मजूर तोडणीसाठी येतात. यावर्षी साधारण ५० हजार ऊसतोडणी मजूर जिल्ह्यात आले होते. आता त्यापैकी १५ हजारावर ऊस तोड कामगार जिल्ह्यात आहेत. 

राज्यभरातून येतात मजूर
थोड्या प्रमाणात ऊस शिल्लक असल्याने तो तोडणी झाल्यावर या मजुरांना घराकडे जायचे आहे. पण, लॉकडाऊनमुळे त्यांना त्यांच्या जिल्ह्यात जाता येत नाही. अशा वेळी काही कामगारांच्या मुकादमांनी आपल्या जिल्ह्यातील आमदारांशी संपर्क करून आमची घरी येण्याची सोय करा, अशी विनवणी करत आहेत. सातारा जिल्ह्यात ऊस तोडणीसाठी मुख्यत्वेकरून बीड जिल्ह्यातून कामगार येतात. त्यासोबतच नगर, जालना, यवतमाळ जिल्ह्यांतूनही ऊसतोडणी मजूर येतात. 
 


इतर ताज्या घडामोडी
बार्शी बाजार समितीत उडीद, मूग हमीभाव...सोलापूर : बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे दाणादाणनाशिक : पावसाळा सुरू झाल्यानंतर अनेक ठिकाणी...
पीक कर्जासाठी बँकेत मुक्कामाची वेळ येऊ...बुलडाणा ः खरीप हंगामातील पिकांच्या काढणीची वेळ...
पाथरूड परिसरातील प्रकल्प तुडुंबपाथरूड, जि. उस्मानाबाद : पाथरूडसह परिसरात...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ९० टक्के...सिंधुदुर्ग ः जिल्ह्यातील ९० टक्के भातपिकांना...
परभणी, हिंगोलीत अतिवृष्टीमुळे पिकांवर...परभणी : खरीप हंगामातील सोयाबीन काढणीच्या, कापूस...
हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनच्या शेंगांना...हिंगोली : गतवर्षी प्रमाणे यंदाही सोयाबीनचे पीक ऐन...
‘जायकवाडी’तील विसर्गात घटऔरंगाबाद : जिल्ह्यातील जायकवाडी प्रकल्पातून...
निम्न दुधनातून ७१९० क्युसेकने विसर्गपरभणी : सेलु तालुक्यातील ब्रम्हवाकडी येथील दुधना...
अनुदानाअभावी मर्यादित लाभार्थ्यांना...सिंधुदुर्ग ः कोरोनामुळे शासनाने जिल्हा परिषदेच्या...
ऊसतोडणीच्या तिढ्यावर आज चर्चापुणे : दहा लाख ऊस तोडणी कामगारांच्या मागण्यांबाबत...
यवतमाळ जिल्ह्यात सोयाबीन शेंगांना फुटले...यवतमाळ : खोडकीड, चक्रीभुंगा त्यानंतर आता परिपक्व...
संत्रा उत्पादकांना हेक्टरी लाखाची भरपाई...नागपूर : विदर्भात नैसर्गिक आपत्तीमुळे संत्रा,...
पुण्यात विशिष्ट ठिकाणीच लिंबे विक्रीला...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने...
गाय एका आठवड्यात दोनदा व्यायली नाशिक ः येथील डॉ. इरफान खान हे व्यवसायाने डॉक्टर...
हवामान बदलाचे सेंद्रिय कर्बावरील परिणामजागतिक हवामान बदल आणि जागतिक तापमान वाढ हे शब्द...
पुण्यात भाजीपाल्याच्या आवकेत घटपुणे : गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
काही भागात पावसाच्या उघडिपीची शक्यता महाराष्ट्रावर बुधवार (ता.२३) पर्यंत  १००४...
राज्य द्राक्ष बागायतदार संघाची ...नाशिक: महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार...
पांगरी परिसरात पिकांवर आस्मानी संकटपांगरी, जि. सोलापूर ः पांगरी (ता. बार्शी) परिसरात...