शेतीमाल भिजल्याने पुणे बाजारात आवक घटली

शेतीमाल भिजल्याने पुणे बाजारात आवक घटली
शेतीमाल भिजल्याने पुणे बाजारात आवक घटली

पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. २) भाजीपाल्याची सुमारे १६० ट्रक आवक झाली हाेती. पावसामुळे अनेक राज्याच्या विविध भागांत शेतीमाल भिजल्याने आवक घटली असून, यामध्ये फ्लाॅवर व पावट्याचा समावेश आहे. यामुळे या भाज्यांच्या दरात वाढ झाली असून, इतर भाजीपाल्याचे दर स्थिर आहेत.

परराज्यांतून हाेणाऱ्या आवकेमध्ये कर्नाटक आणि गुजरात येथून ६ ट्रक कोबी, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश येथून सुमारे २० टेंपो हिरवी मिरची, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू येथून ५ टेंपो शेवगा, इंदूर येथून ४ टेंपो गाजर, बंगलाेर येथून एक टेंपाे आले, मध्य प्रदेश आणि गुजरातमधून लसणाची सुमारे ५ हजार गोणी आवक झाली हाेती.

स्थानिक भागातून सातारी आले सुमारे दीड हजार पोती, टॉमेटोे ५ हजार क्रेट्स, फ्लॉवर १० टेंपो, कोबी १५ टेंपो, गवार ५ टेंपो, भेंडी १० टेंपो, शेवगा ४ टेंपो, ढोबळी मिरची १२ टेंपो, हिरवी मिरची ६ टेंपो, मटार सुमारे २५० गोणी, काकडी १० टेंपो, कारली ८ टेंपो, पावटा ४ टेंपो, भुईमूग १०० पोती, कांदा सुमारे ८० ट्रक, आग्रा, इंदूर आणि तळेगाव येथून बटाट्याची सुमारे ६० ट्रक आवक झाली हाेती.

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव : कांदा : ८०-१२०, बटाटा : १४०-१७०, लसूण : १५०-३००, आले : सातारी : ४५०-४००, भेंडी : २००-३००, गवार : गावरान : सुरती ३००-४००, टोमॅटो : ४०-८०, दोडका : २००-३०० हिरवी मिरची : २५०-३००, दुधी भोपळा : ७०-१५०, चवळी : १५०-२०० काकडी : ८०-१२०, कारली : हिरवी २००-२५० पांढरी : १८०-२००, पापडी : २००-२२०, पडवळ : १४०-१५०, फ्लॉवर : १४०-१८०, कोबी : ३०-८०, वांगी : १००-२००, डिंगरी : १५०-२००, नवलकोल : ८०-१०० ढोबळी मिरची : १५०-२००, तोंडली : कळी २५०-३००, जाड : १००-१२०, शेवगा : २००-४००, गाजर : १२०-१६०, वालवर : २५०-३००, बीट : ८०-१००, घेवडा : १००-२०० कोहळा : १००-२००, आर्वी : २५०-३००, घोसावळे : १४०-१६०, ढेमसे : २००-२२०, भुईमूग : २५०-३५०, पावटा : २००-२२०, मटार : ४००-४५०, तांबडा भोपळा : ६०-१०० सुरण : २४०-२६०, मका कणीस : ६०-१२० नारळ (शेकडा) : १०००-१६००.

पालेभाज्या पालेभांज्यामध्ये कोथिंबीर सुमारे दीड लाख, तर मेथी सुमारे ६० हजार जुड्या आवक झाली हाेती. पालेभाज्यांचे भाव (शेकडा जुडी) : कोथिंबीर : ५००-१०००, मेथी : ५००-८००, शेपू : ४००-६००, कांदापात : ४००-६०० चाकवत : ४००-५००, करडई : ४००-५००, पुदिना : २००-३०० अंबाडी : ५००-६००, मुळे : ५००-८००, राजगिरा : ४००-५००, चुका : ४००-७००, चवळई : ४००-६००, पालक : ४००-६००.

फुलबाजार फुलांचे प्रति किलोचे दर पुढीलप्रमाणे : झेंडू : ५-२०, गुलछडी : ८०-१५०, बिजली : ३०-६०, कापरी : १०-४०, शेवंती ४०-६०, ॲस्टर : १०-१५, गुलाब गड्डी (गड्डीचे भाव) : १०-२५, गुलछडी काडी : १०-५०, डच गुलाब (२० नग) : ७०-१२०, लिली बंडल : ८-१२ जरबेरा : ५०-८०, कार्नेशियन : ८०-१२०.

फळबाजार रविवारी (ता. २) येथील फळबाजारात   मोसंबी सुमारे ७० टन, संत्री १० टन, डाळिंब ३०० टन, पपई २५ टेंपोे, लिंबे सुमारे ४ हजार गोणी, चिकू ५०० गाेणी आणि बॉक्स, पेरू ३०० क्रेट्स, कलिंगड २० टेंपो, खरबूज १० टेंपो, सफरचंद सुमारे ८ हजार पेटी, सीताफळ १०  टन आवक झाली हाेती.

फळांचे दर पुढीलप्रमाणे : लिंबे (प्रति गोणी) : १५०-४००, मोसंबी : (३ डझन) : १००-२००, (४ डझन ) : ३०-८०, संत्रा : (३ डझन) १२०-२५०, (४ डझन) : ४०-१००, डाळिंब (प्रति किलोस) : भगवा : २०-६०, गणेश १०-२५, आरक्ता १०-४०. कलिंगड : ५-१०, खरबूज : १०-२०, पपई  : ५-२०, चिकू : १००-७००, पेरू (२० किलो) : ४००-८००, सीताफळ : १०-१६०, सफरचंद - सिमला (२५ ते ३० किलो) १४००-२६००, पिअर (१४ ते १५ किलो) १०००-१४००, प्लम (५ ते ६ किलो) ६००-७००, आंबा : चौसा (५ किलो) १५००-१६००.

मटण मासळी श्रावण महिन्यामुळे मासळीची मागणी अद्याप घटलेलीच आहे. गणेश पेठ येथील मासळी बाजारात रविवारी (ता. २) खोल समुद्रातील मासळी सुमारे ६ टन, खाडीची ३०० किलो, नदीची ३०० किलो आवक झाली हाेती. तर आंध्र प्रदेश येथून रहू, कतला आणि सिलनची मिळून सुमारे ६ टन आवक झाली हाेती.

खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे भाव) : पापलेट : कापरी : १२००, मोठे : १४०० , मध्यम : ९०० लहान : ५५०, भिला : ४५०, हलवा : ४८०, सुरमई : ४००, मोठे ४८० रावस-लहान : ४८०, मोठे ५५० घोळ : ४८०, करली : २८०, भिंग : ३००, पाला : ७०० वाम १२००, पिवळी लहान २०० मोठे ३२०, काळी : २००, ओले बोंबील : लहान ६०, मोठे १००

कोळंबी ः लहान : २००, मोठी : ४८० जंबो प्रॉन्स : १४००, किंग प्रॉन्स : ७५०, लॉबस्टर : १२००, मोरी : लहान १६०, मोठे २६०, मांदेली : ८०-१०० राणीमासा : १६०, खेकडे : १६०, चिंबोऱ्या : ३६०-४००.

खाडीची मासळी : सौंदाळे : २००, खापी : २००, नगली : लहान ३२० मोठी ४००, तांबोशी : ३६०, पालू : २००, लेपा : १८०-२४०, शेवटे : लहान १२० मोठे २४० बांगडा : १००-१६० ,पेडवी : ४०, बेळुंजी : १०० तिसऱ्या : १४० खुबे : १००, तारली : ८०-१००

नदीची मासळी : रहू : १००-१२०, कतला : १२०-१४०, मरळ : लहान २८० मोठी ३२०, शिवडा : १२० चिलापी : ३०, मागुर : ८०, खवली :१४० आम्ळी : ६० खेकडे : १२०, वाम : ४००.

मटण : बोकडाचे : ४६०, बोल्हाईचे : ४६०, खिमा : ४६०, कलेजी : ५००.चिकन : चिकन : १३०, लेगपीस : १७०, जिवंत कोंबडी : १००, बोनलेस : २४०. अंडी : गावरान : शेकडा : ५८०, डझन : ७८ प्रति नग : ६.५. इंग्लिश : शेकडा : ३४२ डझन : ४८ प्रतिनग : ४.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com