agriculture news in marathi Due to Diwali in Khandesh, banana cultivation has been given a temporary 'break' | Page 2 ||| Agrowon

खानदेशात दिवाळीमुळे केळी लागवडीला तात्पुरता ‘ब्रेक`

टीम अॅग्रोवन
रविवार, 15 नोव्हेंबर 2020

जळगाव ः खानदेशात कांदेबाग केळीची रखडत सुरू असलेली लागवड या आठवड्याच्या अखेरीस तात्पुरती थांबली आहे. दिवाळीनिमित्त कंद काढणी, त्याचा पुरवठा व लागवड ही कामे बंद आहेत. 

जळगाव ः खानदेशात कांदेबाग केळीची रखडत सुरू असलेली लागवड या आठवड्याच्या अखेरीस तात्पुरती थांबली आहे. दिवाळीनिमित्त कंद काढणी, त्याचा पुरवठा व लागवड ही कामे बंद आहेत. 

कांदेबाग केळी लागवड यंदा वाढेल, अशी अपेक्षा होती. ही लागवड सुरू झाली. पण, ऑक्टोबरमध्ये पाऊस आला. यामुळे लागवड रखडली. कांदेबाग केळी लागवड ऑक्टोबरमध्ये बंद होते. काही शेतकरी उशिरा लागवडीच्या बागांबाबत कार्यवाही करतात. परंतु, पावसामुळे पूर्वमशागत व इतर कामे ठप्प होती.

कंद काढता येत नव्हते. लागवड ऑक्टोबरच्या अखेरीस वेगात सुरू झाली. ही लागवड लांबली आहे. आता दिवाळी सणानिमित्त लागवडीसाठी आवश्यक कंद काढणीचे काम ठप्प आहे. 

शेतकरी रावेर, यावल, मुक्ताईनगर, औरंगाबाद नंदुरबार जिल्ह्यातूनही कंद आणतात. कांदेबाग केळीची लागवड चोपडा, जळगाव, पाचोरा, भडगाव या भागात केली जाते. ही लागवड खानदेशात सुमारे १० ते ११ हजार हेक्टरवर अपेक्षित आहे. यातील सुमारे ७५ टक्के लागवड पूर्ण झाली आहे. तर, उर्वरित लागवड रखडली आहे. आता पुढील आठवड्यात ही लागवड पूर्ण होईल, अशी स्थिती आहे. कारण, दिवाळीमुळे कंदांची वाहतूकही खोळंबली आहे. 

लागवडीसाठी प्रतिकंद एक रूपया

लागवड गेल्या आठवड्यात वेगात सुरू होती. अशातच कंदांचे दरही वाढले. सुरवातीला शेतकरी कंद मोफत देत होते. परंतु, या आठवड्यात लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रतिकंद एक रुपया द्यावा लागत आहे, अशी माहिती मिळाली. 


इतर ताज्या घडामोडी
शाश्‍वत कापूस उत्पादन तंत्रज्ञान अवगत...अकोला ः कापूस हे विदर्भातील प्रमुख पीक आहे. या...
अकोल्यात ५५ हजार हेक्टरला तडाखाअकोला ः गेल्या आठवड्यात जिल्ह्यात ५२ पैकी ३५...
रत्नागिरीत हजार हेक्टर भातक्षेत्र...रत्नागिरी : अतिवृष्टीमुळे मोठ्या नद्यांना आलेल्या...
सांगलीत ३३ हजार हेक्टर पिकांचे नुकसानसांगली : जिल्ह्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून...
खानदेशात पंधरा हजार हेक्टर बाजरीची...जळगाव : खानदेशात यंदा पाऊस लांबल्याने आणि...
नाशिक बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांचे...नाशिक : नाशिक बाजार समितीसंदर्भात शासनाकडे...
खानदेशात हलक्या सरी; जोरदार पावसाचा अभावजळगाव : खानदेशात यंदा पाऊसमान अद्याप कमी आहे....
नांदेड जिल्ह्यात पीकविमा योजनेत नऊ लाख...नांदेड : पंतप्रधान पीक विमा योजनेत शेतकऱ्यांनी...
मराठवाड्यातील पशुविज्ञान केंद्राचे घोडे...परभणी ः भारतीय कृषी संशोधन परिषदेने महाराष्ट्र...
परभणी जिल्ह्यात भाजीपाला पिकांची नासाडीपरभणी ः अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेकडो एकरवरील...
पैसे थकवणाऱ्या व्यापाऱ्यांचे लिलाव बंद...सोलापूर ः शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या पट्ट्या...
पुण्यात लाख हेक्टरवर खरिपाच्या पेरण्या पुणे : जिल्ह्यात जुलै महिन्याच्या तिसऱ्या...
पीकविम्यासाठी स्वाभिमानीचा कृषी...पुणे : पीकविमा योजनेतील गेल्या खरिपाची नुकसान...
नगरमध्ये खरीप पेरण्यांनी सरासरी ओलांडली नगर : नगर जिल्ह्यात खरिपाच्या पेरण्यांनी सरासरी...
`लातूरला शेतकऱ्यांनी भरला २३ कोटीचा...लातूर : ‘‘पंतप्रधान खरीप पीक विमा २०२१...
नियमित कर्जदार शेतकऱ्यांना  मिळणार...गोंदिया : राज्य सरकारने नियमित कर्ज परतफेड...
सातारा : पाच हजार हेक्टर क्षेत्र ...सातारा : जिल्ह्यात मागील आठवड्यात झालेल्या...
सांगलीतील पूर ओसरू लागला  सांगली : कृष्णा नदीला आलेल्या महापुराचा सांगली...
सिंधुदुर्गमध्ये नुकसानीचे पंचनामे सुरू सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात अतिवृष्टीने झालेल्या...
पुराचा वारंवार फटका बसणाऱ्या घरांच्या...सांगली : ज्या भागातील घरांना आणि रहिवाशांना...