agriculture news in marathi, Due to drought on eight talukas of Parbhani | Agrowon

परभणीतील आठ तालुक्यांवर दुष्काळाची छाया
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 11 ऑक्टोबर 2018

परभणी ः केंद्र आणि राज्य शासनाच्या दुष्काळ जाहीर करण्याच्या निकषांनुसार परभणी जिल्ह्यातील ९ पैकी ८ तालुक्यांमध्ये दुष्काळाची प्रथम कळ (ट्रिगर-१) लागू होत आहे. त्यासाठी अनिवार्य आणि प्रभावदर्शक निर्देशांकानुसार अपेक्षित पावसाच्या सरासरी टक्केवारीपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे पीक उत्पादन नुकसान; तसेच पाणीटंचाईची माहिती सादर करावी. टंचाई आराखडे तयार करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांनी दिले.

परभणी ः केंद्र आणि राज्य शासनाच्या दुष्काळ जाहीर करण्याच्या निकषांनुसार परभणी जिल्ह्यातील ९ पैकी ८ तालुक्यांमध्ये दुष्काळाची प्रथम कळ (ट्रिगर-१) लागू होत आहे. त्यासाठी अनिवार्य आणि प्रभावदर्शक निर्देशांकानुसार अपेक्षित पावसाच्या सरासरी टक्केवारीपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे पीक उत्पादन नुकसान; तसेच पाणीटंचाईची माहिती सादर करावी. टंचाई आराखडे तयार करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांनी दिले.

जिल्ह्यात उद्भवलेल्या दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी (ता. ९) आयोजित बैठकीत श्री. शिवाशंकर बोलत होते. या वेळी अपर जिल्हाधिकारी अण्णासाहेब शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, उपजिल्हाधिकारी विश्वांभर गावंडे, स्वाती सूर्यवंशी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे आदी उपस्थित होते.

यंदा परभणी जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या कालावधीत ७५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झालेल्या परभणी, जिंतूर, सेलू, मानवत, पाथरी, सोनपेठ, गंगाखेड, पालम या ८ तालुक्यांसह पूर्णा अशा एकूण ९ तालुक्यांतील दुष्काळ मूल्यांकनासाठी सत्यमापन अहवाल; तसेच दुष्काळ व्यवस्थापन उपाययोजनांसाठी जिल्हा प्रशासनाकडून प्रस्ताव सादर करण्यात येणार आहेत.

प्रस्तावासाठी विविध प्रकारच्या ५ मुद्यांच्या परिस्थितीचा आधार घेतला जाणार आहे. यातील जलसाठे, पीक क्षेत्रीय सर्व्हेक्षण, मृदा आर्द्रता आदी महत्त्वाचे मुद्दे आहेत. यासाठी सर्व संबंधितांनी दोन दिवसांत पीक सर्व्हेक्षण अहवाल मोबाईल ॲपद्वारे अपलोड करावेत. नापेर क्षेत्राची माहिती द्यावी. दुष्काळाची कळ लागू झालेल्या तालुक्यातील गावांची निवड जिल्हास्तरावर होईल. सर्व्हेक्षण, सत्यमापन करण्यासाठी तालुका, क्षेत्रीय स्तरावर समिती नेमली जाणार आहे.

हंगामातील पिकांची सद्यस्थिती दर्शविणारे छायाचित्रे जीपीएस लोकेशनसह अपलोड करण्यात येतील. पिकांच्या उगवणीवर वाढीवर कमी पावसाचा झालेला परिणाम, उत्पादनात येणारी तुट यांची माहिती नोंदवली जाणार आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर आणि जानेवारी ते मार्च कालावधीसाठीचे टंचाई आराखडे तयार करून २० ऑक्टोबरपूर्वी सादर करावेत.

दुष्काळासाठी दक्ष राहण्याच्या सूचना
पाण्याचे स्राेत निश्चित करून पाणीटंचाई परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी पूर्वतयारी करावी. विहीर अधिग्रहणे करणे, सार्वजनिक पाणी स्राेतांच्या परिसरातील पाणीउपसा बंद करावा. या वेळी चाराटंचाईसाठी चारा नियोजन, जलयुक्त शिवारमधील कामांचा आढावा घेण्यात आला. दुष्काळी परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी दक्ष राहण्याचा सूचना या वेळी देण्यात आल्या.

इतर बातम्या
नांदेड, परभणी, हिंगोलीत पाऊसनांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील २८...
सांगली जिल्ह्यातील ४६८ गावांमधील...सांगली  : जिल्ह्यात ४६८ गावांमधील गावठाणांचा...
यवतमाळ जिल्ह्यातील सात दुष्काळग्रस्त...यवतमाळ ः जनरेट्यामुळे दुष्काळ यादीत नव्याने...
लातूर, उस्मानाबाद, जालना, बीड...लातूर : लातूर, उस्मानाबाद, जालना आणि बीड...
अकोला जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकटअकोला ः पावसाचा खंड आणि त्यातच दिवसाचे...
जलसंधारण कामासाठी जलशक्ती योजना :...वाल्हे, जि. पुणे  : राज्यात जलयुक्त...
अनधिकृत बंधारे काढण्यासाठी ‘स्वाभिमानी’...नगर  : भंडारदरा धरणापासून ते ओझर...
बचत गटांना प्रोत्साहनासाठी ‘हिरकणी...सोलापूर  : राज्याच्या औद्योगिक आणि आर्थिक...
केरळच्या धर्तीवर काजू प्रक्रिया ...रत्नागिरी  ः परदेशी चलन मिळवून देणाऱ्या काजू...
`गोकुळ` मल्टिस्टेटमुळे शेतकऱ्यांचा...मुंबई : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक...
संगमनेर तालुक्यातील लिंबू बागांना घरघर संगमनेर, जि. नगर : दर्जेदार कागदी लिंबांच्या...
दूध वाहतुकीतून रेल्वेला ६ कोटी १२ लाख...दौंड, जि. पुणे  : दौंड रेल्वे स्थानकावरून...
कृषक विकिरण केंद्रातून अमेरिका, ...नाशिक  : जिल्ह्यातील लासलगाव येथील कृषक...
आसाम, बिहारमध्ये पुराचे ११४ बळीनवी दिल्ली: आसाम आणि बिहारमध्ये पुराचे थैमान...
सौरऊर्जेमुळे शेतकऱ्यांना मुबलक वीज...कोल्हापूर ः शेतकऱ्यांना दिवसा व उद्योगांना स्वस्त...
परीक्षा शुल्क परतीचा खर्च सात लाख रुपयेयवतमाळ ः परीक्षा रद्द झाल्यानंतर उमेदवारांचे पैसे...
दुबार पेरणीसाठी सरकारची तयारीः डाॅ....पुणे: पावसाचा काही प्रमाणात खंड पडला आहे....
डोणगावात होणार खजूर लागवडअकोला ः पारंपरिक पिकांना पर्याय शोधण्यासाठी...
रक्तक्षय दूर करण्यासाठी लोहयुक्त तांदूळनाशिक : दैनंदिन आहारातून अत्यल्प प्रमाणात लोह...
असंमत बियाणे लागवडीला बोंडअळी कारणीभूत...नवी दिल्ली : देशात २०१८ मध्ये गुलाबी...