हिंगोलीत अतिवृष्टीमुळे पाच हजार हेक्टर पिकांचे नुकसान

हिंगोलीत अतिवृष्टीमुळे पाच हजार हेक्टर पिकांचे नुकसान
हिंगोलीत अतिवृष्टीमुळे पाच हजार हेक्टर पिकांचे नुकसान

हिंगोली ः अतिवृष्टीमुळे तसेच पुराचे पाणी शेतामध्ये शिरल्यामुळे कळमनुरी (जि. हिंगोली) तालुक्यातील २६ गावांतील ५ हजार ४६२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

या संदर्भात तहसीलदार डॉ. प्रतिभा गोरे यांनी माहिती दिली. कळमनुरी तालुक्यात गेल्या आठवड्यामध्ये अतिवृष्टी झाली. त्यामुळे अनेक गावशिवारातील ओढे, नाल्यांना पूर लोटले. तालुक्यातून वाहणाऱ्या कयाधू नदीला देखील पूर आला होता. नदी, ओढे, नाल्या काठच्या शेतातील पिकांमध्ये पुराचे पाणी शिरल्यामुळे काढणीस आलेल्या मूग, उडिद या पिकांसह सोयाबीन, कापूस, ज्वारी, तूर आदी पिकांचे मोठे नुकसान झाले.

शेतामध्ये पाणी साचून राहिल्याने कपाशीच्या पिकांमध्ये मर सुरू झाली आहे. अनेक ठिकाणी जमिनी खरडून गेल्या आहेत. मुळ्या तुटल्यामुळे उभी पिके आडवी झाली आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतावर जाऊन नुकसानीचे सर्वेक्षणासाठी तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक यांना आदेशित केले आहे, असे गोरे यांनी सांगितले.

नुकसानग्रस्त गावातील क्षेत्र हेक्टरमध्ये असे ः नांदापूर २८०, टाकळगव्हाण ८०, पिंपरी खुर्द १८०, डोंगरगांव २२५, कस्बेधावडा २८०, शेवाळा २८०, देवजना २२०, चिखली ३००, कोंढूर ३४५, बिबधर ८०, डिग्रस २००, येगांव २२०, कवडी १६१, कान्हेगांव २००, हारवाडी ५१, चिंचोटी ४५, सावंगी भु. १५०, सापळी २६०, येलकी ४७५, धारधावंडा १३०, किल्लेवडगांव १७०, सोडेगांव ३००, सालेगांव ३२५, रुपुर ३००, गोलेगांव ८०.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com