अमरावती : अतिवृष्टीमुळे ८७ गावांतील तीन हजार हेक्‍टरवर नुकसान

अमरावती जिल्ह्यात सुरुवातीला खंड देणाऱ्या पावसाने पुन्हा जोरदार कमबॅक केले आहे. चार तालुक्‍यांना रविवारच्या (ता.१८) पावसाचा तडाखा बसला. चार महसूल मंडळात अतिवृष्टी झाल्याने ८७ गावे बाधित आहेत.
अतिवृष्टीमुळे ८७ गावांतील  तीन हजार हेक्‍टरवर नुकसान Due to heavy rains in 87 villages Damage to three thousand hectares
अतिवृष्टीमुळे ८७ गावांतील तीन हजार हेक्‍टरवर नुकसान Due to heavy rains in 87 villages Damage to three thousand hectares

अमरावती : जिल्ह्यात सुरुवातीला खंड देणाऱ्या पावसाने पुन्हा जोरदार कमबॅक केले आहे. चार तालुक्‍यांना रविवारच्या (ता.१८) पावसाचा चांगलाच तडाखा बसला. चार महसूल मंडळात अतिवृष्टी झाल्याने ८७ गावे बाधित झाली आहेत. ३५६३ हेक्‍टरवरील पिके खरडून गेली आहेत. दोन युवक वाहून गेले आहेत. २६५ घरांची पडझड झाली आहे.    जिल्ह्यात रविवारी धारणी तालुक्‍यात साद्राबाडी, अमरावती तालुक्‍यात वलगाव व आसरा तसेच चांदूर बाजार तालुक्‍यात बेलोरा या महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झाली. या भागातील नदी-नाल्यांना पूर आल्याने पिके वाहून गेली, जमीन खरडून गेली आहे. सुमारे ६४६ हेक्‍टरमधील पिके खरडून गेल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या शिवाय शेतात पाणी साचल्याने २,९१७ हेक्‍टरमधील पेरणी व पिकांचे नुकसान झाले आहे. भातकुली तालुक्‍यात ६९ गावे बाधित झाली आहेत.  खारतळेगाव येथे दोघे युवक नाला पार करताना वाहून गेले. या दोघांचे मृतदेह शोधण्यात आपत्ती निवारण पथकाला यश आले आहे. १४५ घरांचे नुकसान झाले तसेच ६४६ हेक्‍टरमधील जमीन खरडून गेली आहे. चांदूर बाजार तालुक्‍यात २४ घरांची पडझड झाली. चिखलदरा तालुक्‍यातही पिकांचे व घरांचे नुकसान झाल्याची नोंद आहे. नुकसानीचे परिपूर्ण, सविस्तर व गतीने पंचनामे करण्याचे निर्देश पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी दिले आहेत. सर्व्हेक्षणाच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे.  

 भरपाई मिळवून देणार : ठाकूर जिल्ह्यातील अतिवृष्टी व त्यामुळे झालेल्या नुकसानीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच मदत, पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांच्याशी महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी चर्चा केली. शेतकऱ्यांना योग्य भरपाई मिळवून देण्यात येईल, अशी ग्वाही या दोघांनी दिल्याचे ॲड. ठाकूर यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com