Agriculture news in marathi Due to heavy rains in 87 villages Damage to three thousand hectares | Page 2 ||| Agrowon

अमरावती : अतिवृष्टीमुळे ८७ गावांतील तीन हजार हेक्‍टरवर नुकसान

टीम अॅग्रोवन
बुधवार, 21 जुलै 2021

अमरावती जिल्ह्यात सुरुवातीला खंड देणाऱ्या पावसाने पुन्हा जोरदार कमबॅक केले आहे. चार तालुक्‍यांना रविवारच्या (ता.१८) पावसाचा तडाखा बसला. चार महसूल मंडळात अतिवृष्टी झाल्याने ८७ गावे बाधित आहेत.

अमरावती : जिल्ह्यात सुरुवातीला खंड देणाऱ्या पावसाने पुन्हा जोरदार कमबॅक केले आहे. चार तालुक्‍यांना रविवारच्या (ता.१८) पावसाचा चांगलाच तडाखा बसला. चार महसूल मंडळात अतिवृष्टी झाल्याने ८७ गावे बाधित झाली आहेत. ३५६३ हेक्‍टरवरील पिके खरडून गेली आहेत. दोन युवक वाहून गेले आहेत. २६५ घरांची पडझड झाली आहे. 

  जिल्ह्यात रविवारी धारणी तालुक्‍यात साद्राबाडी, अमरावती तालुक्‍यात वलगाव व आसरा तसेच चांदूर बाजार तालुक्‍यात बेलोरा या महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झाली. या भागातील नदी-नाल्यांना पूर आल्याने पिके वाहून गेली, जमीन खरडून गेली आहे. सुमारे ६४६ हेक्‍टरमधील पिके खरडून गेल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या शिवाय शेतात पाणी साचल्याने २,९१७ हेक्‍टरमधील पेरणी व पिकांचे नुकसान झाले आहे. भातकुली तालुक्‍यात ६९ गावे बाधित झाली आहेत. 

खारतळेगाव येथे दोघे युवक नाला पार करताना वाहून गेले. या दोघांचे मृतदेह शोधण्यात आपत्ती निवारण पथकाला यश आले आहे. १४५ घरांचे नुकसान झाले तसेच ६४६ हेक्‍टरमधील जमीन खरडून गेली आहे. चांदूर बाजार तालुक्‍यात २४ घरांची पडझड झाली. चिखलदरा तालुक्‍यातही पिकांचे व घरांचे नुकसान झाल्याची नोंद आहे. नुकसानीचे परिपूर्ण, सविस्तर व गतीने पंचनामे करण्याचे निर्देश पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी दिले आहेत. सर्व्हेक्षणाच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे.
 

 भरपाई मिळवून देणार : ठाकूर
जिल्ह्यातील अतिवृष्टी व त्यामुळे झालेल्या नुकसानीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच मदत, पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांच्याशी महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी चर्चा केली. शेतकऱ्यांना योग्य भरपाई मिळवून देण्यात येईल, अशी ग्वाही या दोघांनी दिल्याचे ॲड. ठाकूर यांनी सांगितले.


इतर ताज्या घडामोडी
देवसंस्थांच्या जमिनीवर वहिवाटदारांचा...जेजुरी, जि. पुणे : देवसंस्थानच्या मालकीच्या...
पुरस्कारांच्या प्रस्तावावरून कृषी...अकोला : विविध पुरस्कारांसाठी शेतकऱ्यांनी दाखल...
कोयना धरणात १०१ टीएमसीवर पाणीसाठाकोयनानगर, जि. सातारा : शंभर दिवस ओलांडलेल्या...
उजनी धरणात उपयुक्त साठा ६४ टक्केच;...सोलापूर : उजनी धऱणाच्या पाणलोट क्षेत्रात अद्यापही...
अकोला जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा...अकोला ः जिल्ह्यात अतिपावसाने धुमाकूळ घातला असून...
राज्यात तीन अन्न प्रक्रिया प्रकल्पांचे...नाशिक : राज्यातील तीन अन्न प्रक्रिया प्रकल्पांचे...
वाशीम झेडपी निवडणुकीचा चेंडू पुन्हा...वाशीम : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रिक्त...
‘एफआरपी’च्या तुकड्यांनी शेतकरी...कऱ्हाड, जि. सातारा : एकरकमी ‘एफआरपी’चे तीन तुकडे...
हिंगोलीत मुहूर्ताच्या सोयाबीनला ११ हजार...हिंगोली : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...
पीक नुकसान नोंदीसाठी विमा कंपन्यांच्या...परभणी : ७२ तासांच्या आत पीक नुकसानीची नोंद...
राज्यसभेच्या एका जागेसाठी ४ ऑक्टोबरला...नवी दिल्ली : महाराष्ट्रातून राज्यसभेवर रिक्त...
गणेशोत्सवासाठी सिंधुदुर्ग सज्ज; तीन...सिंधुदुर्गनगरी : घरोघरी गणेशोत्सव साजरा करण्याची...
ई-पीक पाहणीसाठी सोलापुरचे जिल्हाधिकारी...सोलापूर ः माढा तालुक्यात सुरू असलेल्या ई-पीक...
परभणी जिल्ह्यात १२७ गावे बाधितपरभणी ः जिल्ह्यात सोमवार (ता. ६) ते मंगळवार (ता....
हतनूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूभुसावळ, जि. जळगाव : तालुक्यातील हतनूर धरणात...
संगणकीय सातबारावर कुळांची नावे नोंद करागडहिंग्लज, जि. कोल्हापूर : हस्तलिखित सातबारा...
पावसाचा २७ हजार हेक्टरला फटकानाशिक : नांदगाव तालुक्यातील झालेल्या...
सहा हजार क्विंटल धान्याचे होणार कंपोस्ट...भंडारा : वैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे गेल्या...
शेतकरी पुरस्कारासाठी दाखल केलेले...अकोला : शेतीत विविध प्रयोग करणाऱ्या, उत्पादन...
एकरकमी ‘एफआरपी’साठी ‘मिस कॉल’ मोहीमकोल्हापूर : केंद्र सरकारने ‘एफआरपी’चे तुकडे...